1) पृथ्वीच्या वयमापनासाठी खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य वापरतात ?
1) युरेनिअम 2) केशिअम 3) थोरिअम 4) रेडिअम
उत्तर :- 1
2) अ) डी.एन.ए. व आर.एन.ए. यामध्ये नुक्लीक आम्ले व कार्बनी संयुगे असतात.
ब) टेरिलीन वस्त्राचे धागे कार्बन संयुगापासून निर्माण होते.
वरील विधानांपैकी योगय विधान / ने ओळखा.
1) फक्त अ 2) फक्त ब 3) अ व ब दोन्ही 4) अ व ब दोन्हीही नाहीत
उत्तर :- 3
3) खालील विधानांचा विचार करा.
अ) प्रथिने तसेच विकरांचे स्त्रावांच्या स्वरूपात उत्सर्जन करून वहनाचे काम करतात.
ब) पीटिका व रिक्तीकांच्या निर्मिती सहभागी असतात.
क) पेशी भित्तीका, लयकारिका आणि प्रद्रव्यपटल यांच्या निर्मितीत सहभाग घेतात.
1) केंद्रक 2) तंतुकणिक 3) गॉल्गी संकुल 4) यापैकी नाही
उत्तर :- 3
4) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
1) सिझिअम – 137 - कर्करोगावर उपचारासाठी
2) सेलेनिअम – 75 - रक्तप्रवाहाचा अभ्यास करण्यासाठी
3) स्ट्रॉन्शिअम – 85 - हाडांची निर्मिती व चयापचाय अभ्यास
4) कोबाल्ट – 57 - ॲनिमियाचे निदान
उत्तर :- 2
5) अ) मालिका बंधन हा कार्बनचा एकमेव व्दितीय गुणधर्म आहे.
ब) हा गुणधर्म कार्बन फक्त कार्बन मूलद्रव्याशी पाळतो.
वरील विधानांपैकी अयोग्य विधान / ने ओळखा.
1) फक्त अ 2) फक्त ब 3) अ व ब दोन्ही 4) अ व ब दोन्हीही नाहीत
उत्तर :- 2
No comments:
Post a Comment