- सायबर गुन्हे रोखण्याच्या उद्देशाने एक आंतरराष्ट्रीय संधी करण्यासाठी त्याचा मसुदा तयार करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेनी त्यासंबंधी एक ठराव मंजूर केला आहे.
- हा ठराव रशियाने मांडला. आता सर्व जगाचे प्रतिनिधित्व करणारी एक तज्ञ समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी देशांमध्ये माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानात मदत व्हावी यासाठी पाळावयाच्या शिष्टाचारांचे विस्तृत वर्णन करणार.
- युरोपीय संघ (EU), अमेरिका आणि इतर देशांच्या आक्षेपांवरून संयुक्त राष्ट्रसंघाकडे यासंदर्भात वारंवार मागणी होत आली आहे.
▪️संयुक्त राष्ट्रसंघाची महासभा (UNGA)
- आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना करण्यात आली.
- दुसर्या महायुद्धानंतर दिनांक 24 ऑक्टोबर 1945 रोजी या संघटनेची स्थापना करण्यात आली. UNचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे.
- सध्या या संघटनेचे जगभरात 193 सदस्य देश आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाची महासभा (UNGA) हे संयुक्त राष्ट्रसंघामधल्या सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्वाचा हक्क दिला गेला आहे.
------------------------------------------------
No comments:
Post a Comment