Ads

06 December 2019

ठामपाच्या अग्निशमन दलात दिसणार महिला ब्रिगेड..

🔰ठाणे महापालिकेच्या आकृतीबंधाला शासनाने मंजुरी दिल्याने आता त्यानुसार टप्प्याटप्प्याने महापालिकेने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या अग्निशमन दलात आता 435 पदांची भरती केली जाणार आहे.

🔰तर त्यानुसार, पहिल्या टप्प्यात 250 पदे भरण्यात येणार असून त्यात महिलांना 30 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, सुमारे 81 महिलांचीही भरती केली जाणार आहे.

🔰तसेच यासंदर्भातील जाहिरात येत्या 15 दिवसांच्या आत प्रसिद्ध होणार असून त्यानंतर पुढील सोपस्कारानंतर साधारणपणे चार महिन्यांच्या आत त्या अग्निशमन दलात सामील होणार आहेत.
अग्निशमन दलात महिलांना स्थान देणारी ठाणे ही देशातील पहिलीच महापालिका ठरणार आहे.

No comments:

Post a Comment