०२ डिसेंबर २०१९

विधानसभा अध्यक्षपदासाठी नाना पटोले यांची बिनविरोध निवड

◾️महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे.

◾️भाजपकडून किसान कथोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पटोले
यांची बिनविरोध निवड झाली आहे.

◾️महाविकास आघाडीला काल बहुमत सिद्ध करुन पहिली परीक्षा पास झाल्यानंतर आज विधानसभा अध्यक्षपदाच्या परीक्षेचा सामना करावा
लागणार होता.

◾️अर्थातच काल 169 मतांनी बहुमत सिद्ध केल्याने विधानसभा अध्यक्षपदाचा 'सामना' देखील महाविकास आघाडीच जिंकणार अशी दाट शक्यता होती.

◾️मात्र त्याआधीच भाजपने माघार घेतल्याने पटोले यांची निवड झाली आहे.

◾️गुप्त मतदानाने होणारी विधानसभा अध्यक्षाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्याची महाविकास आघाडीची
रणनिती असल्याची माहिती मिळाली होती.

◾️तसा प्रस्ताव आधी विधानसभेत मांडला जाण्याची शक्यता होती. मात्र
आधीच अध्यक्षांची निवड बिनविरोध झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

महत्वाचे प्रश्न

    भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड) 🔸भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०) 🔹भारतातील ...