Thursday, 19 December 2019

सायरस मिस्त्री पुन्हा होणार अध्यक्ष.



📌नॅशनल कंपनी लॉ अ‍ॅपिलेट ट्रिब्युनलने (एनसीएलएटी) सायरस मिस्त्री यांच्या बाजूने निर्णय देत टाटा समूहाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्याचा आदेश दिला आहे. 

📌सायरस मिस्त्री यांना पदावरुन हटवण्याचा निर्णय चुकीचा होता असं नॅशनल कंपनी लॉ अ‍ॅपिलेट ट्रिब्युनलने म्हटलं आहे.

📌नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलमध्ये (एनसीएलटी) केस हारल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी निर्णय़ाविरोधात एनसीएलएटीकडे धाव घेतली होती.  एनसीएलएटीने जुलै महिन्यात निर्णय  सुरक्षित ठेवला होता. आज नॅशनल कंपनी लॉ अ‍ॅपिलेट ट्रिब्युनलने निर्णय जाहीर करत टाटा समूहाला धक्का दिला आहे.

📌तर सायरस मिस्त्री यांच्या हकालपट्टीनंतर रिक्त असलेल्या टाटा सन्सच्या अध्यक्षपदी एन. चंद्रशेखरन  यांची निवड करण्यात आली होती. टाटा समूहाकडून एन चंद्रशेखरन यांची नियुक्ती करणं बेकायदा असल्याचं नॅशनल कंपनी लॉ अ‍ॅपिलेट ट्रिब्युनलने निर्णयात म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...