Wednesday, 4 December 2019

भारतीय राज्यघटना काही महत्त्वाचे प्रश्न


Q) भारतीय संविधानाच्या 19 (1) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही ?

   1) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य 

    2) मुद्रण स्वातंत्र्य

   3) बिनाशस्त्र व शांततेने  एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य

4) भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य

उत्तर :- 2✅✅✅

Q) घटनेच्या 19 (1) (अ) व्या कलमामध्ये मान्य केलेल्या नागरिकांच्या खालील कारणांमुळे वाजवी बंधने येऊ शकतात.

   अ) देशाचे सार्वभौमत्व 
   ब) देशाची एकता   
   क) प्रांताची सुरक्षितता  
   ड) सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी

   1) अ, क    2) ब, ड    
  3) अ, ब      4) ड

उत्तर :- 3✅✅✅

Q) खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मुलभूत हक्कात नाही  ?

   1) समतेचा हक्क   
   2) स्वातंत्र्याचा हक्क 
   3) धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क 
  4) मालमत्तेचा हक्क

उत्तर :- 4✅✅✅

Q) सहा ते 14 वर्षे वय गटातील मुलांना मोफत व अनिवार्य शिक्षणाचा अधिकार संविधानांत संशोधन करून भाग III मध्ये एक अनुच्छेद समाविष्ट करुन प्रदान केला आहे. कितवे संशोधन व कोणता अनुच्छेद ? एक जोडी निवडा. 

   1) 86 वे संशोधन – अनुच्छेद 19 (फ)
   2) 93 वे संशोधन – अनुच्छेद 21 (अ)
   3) 86 वे संशोधन – अनुच्छेद 21 (अ)
   4) 93 वे संशोधन – अनुच्छेद 19 (फ)

उत्तर :- 3✅✅✅

Q) ‘बंदीप्रत्यक्षीकरण’ आज्ञेबाबतच्या विधानांचा विचार करा:

   अ) मूलभूत हक्कांच्या
अंमलबजावणीसाठी अशी आज्ञा काढली जाते.

   ब) अशी आज्ञा काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना दिला आहे.

   क) व्यक्तीला न्यायालयापुढे हजर करुन बंदी करण्याचा कारणाचे समर्थन करण्याची आज्ञा न्यायालय बंदी करणा-या   
        अधिका-याला देऊ शकते.

   ड) न्यायालयाने फौजदारी गुन्ह्याबद्दल तुरुंगवास दिलेल्या व्यक्तीची सुटका मिळविण्यासाठी देखील अशी आज्ञा काढता येते.

         वरील ‍विधानांपैकी कोणते बरोबर आहे / आहेत ?

   1) केवळ अ  
2) केवळ ब आणि क   
3) केवळ अ आणि क   
4) केवळ अ, ब आणि क

उत्तर :- 4✅✅✅

No comments:

Post a Comment