Monday, 23 December 2019

'अनंता'ची व्याख्या करणारा गणिततज्ज्ञ; श्रीनिवास रामानुजन

◾️अगदी नव्याने शोधलेल्या कृष्णविवराचे वर्तनाचे कोडे सोडविण्यासाठी रामानुजन यांच्या गणिती सूत्रांचा वापर करण्यात आला आहे.

◾️आजही रामानूजनच्या त्या वहीतील अनेक सूत्रे नव्या संशोधनाची दिशा स्पष्ट करत आहे.

◾️अवघे बत्तीस वर्षे जीवन लाभलेले रामानुजन विज्ञान जगतासाठी लाभलेले अलौकिक वरदान आहे.

◾️रविवारी (ता. 22) त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरी करण्यात येतो. 

✍जीवनपट 

◾️रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी तमिळनाडूतील तंजावर जिल्ह्यातील तिरोड या गावी झाला. वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच त्यांनी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले.

◾️त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धांत सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत. 

◾️रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात 1991 साली छापून आला.

◾️ त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला.

◾️1993 साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रा. जी. एच. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजनने त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती.

◾️त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते.

◾️लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते 17 मार्च 1994 रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. 1914 ते 1917

◾️या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले.

◾️ 1918 साली रॉयल सोसायटी ऑफ लंडनने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते.

◾️त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत. 

◾️रामानुजन यांच्या वहीतील सूत्रांचा आजही अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या त्या नोंदवहीत ब्रह्मांडाच्या विज्ञानाची अनेक रहस्ये आजही न उलगडलेल्या अवस्थेत आहेत.

◾️इंग्लंडमध्ये असतानाच त्यांना क्षयरोग जडला होता.

◾️पुढे 1919 साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरुणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती.

◾️वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी 27 एप्रिल 1920 रोजी हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले.

➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...