Thursday, 26 December 2019

केंद्र व राज्य महिला आयोगाची पुर्नरचना करा'

- राज्य किंवा राष्ट्रीय महिला आयोगाने
कामकाज करून पीडित महिलांना आधार दिला पाहिजे. त्यांचे प्रश्न निकाली काढले पाहिजे. मात्र,

- सध्याचे महिला आयोग कष्टकरी आणि पीडित महिलांचे प्रश्न निकाली काढत नसल्याचा दावा करत महिला आयोगाची पुनर्रचना करावी अशी मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे यांनी केली.

- मरियम ढवळे यांनी महिला आयोगाच्या कामकाजावर जोरदार टीका केली. भारतीय संविधानाने मार्गदशक तत्व आखून दिली आहेत. त्यानुसार महिला आयोगाचे कामकाज झाले पाहिजे. मात्र, सध्याचे महिला आयोग कष्टकरी वर्गातील महिलांचे प्रश्न सोडवण्याबाबत उदासीन असल्याचा अनुभव संघटनेला आला असल्याचे मरियम ढवळे यांनी सांगितले. पूर्वी महिला आयोग योग्य त्या पद्धतीने आणि प्रामाणिकपणे काम करत होते. महिलांच्या प्रश्नावर तात्काळ कारवाई करत होते.

-  मात्र आताचे महिला आयोग जी भूमिका सरकार घेते तीच भूमिका महिला आयोग घेत असल्याचा गंभीर आरोप करत महिला आयोगाची पुनर्रचना करण्याची मागणी त्यांनी केली. महिलांचे प्रश्न ज्यांना समजतात,

- ज्यांना महिलांच्या प्रश्नांबाबत काम करण्याची आणि ते प्रश्न सोडवण्याची तळमळ आहे, अशा व्यक्तींना महिला आयोगात असणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी मांडले.

- अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे १२ वे राष्ट्रीय अधिवेशन २७ ते ३० डिसेंबर दरम्यान पहिल्यांदाच मुंबईत पार पडत आहे.

- त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मरियम ढवळे यांनी अधिवेशनाबाबतचीही माहिती दिली. भायखळा येथील साबू सिद्दिक अभियांत्रिकी महाविद्यालयात हे अधिवेशन पार पडणार आहे.

- अभिनेत्री स्वरा भास्कर ही या अधिवेशनाचे उद्घाटन करणार आहे. तत्पूर्वी अधिवेशनानिमित्त आझाद मैदानात दुपारी १२ वाजता महिलांची जाहीर सभा होणार आहे.

- या सभेला माकप नेत्या वृंदा करात, माजी खासदार सुभाषिनी अली, जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मालिनी भट्टाचार्य, सरचिटणीस मरियम ढवळे, किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माकपचे आमदार विनोद निकोले आदी संबोधित करणार आहेत.

- या अधिवेशनानिमित्त अत्याचाराविरोधात संघर्ष करणाऱ्या विविध राज्यातील काही महिलांचा प्रातिनिधीक सत्कारही करण्यात येणार आहे.

-ही देशातील सर्वात मोठी महिला संघटना असून २३ राज्यांमध्ये १ कोटीहून अधिक महिला सभासद असल्याचा दावा संघटनेने केला आहे.
----------------–--------------------------------

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...