🍀 स्वातंत्र्यानंतर १९६१ पर्यंत गोवा अधिकृतरीत्या भारताचा भाग नव्हता. कारण यावर पोर्तुगीजांची सत्ता होती.
🍀 जेव्हा की गोव्यात राहणारे बहुसंख्य नागरीक हे भारतीयच होते.
🍀 पोर्तुगीजांनी गोव्यावर ४५० वर्षे राज्य केले.
🍀 स्वातंत्र्याच्या वेळेस ५६२ प्रांत भारतात समाविष्ट झाले.
🍀 भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी अथक प्रयत्नाने हे कार्य मार्गी लावले. म्हणूनच वल्लभभाईंना ‘भारताचे लोहपुरुष’ म्हटल्या जाते.
🍀 याविरोधात तेथील नागरिकांनी १९५५ साली सत्याग्रह केला; मात्र चिडलेल्या पोर्तुगीजांनी क्रूरतेचा अतिरेक करत २२ नागरिकांना गोळ्या घालून ठार केले.
🍀 या घटनेने पंडित जवाहरलाल नेहरु चांगलेच संतापले.
🍀 अखेर नेहरुंनी पोर्तुगीजांच्या विरोधात ‘विजय’ नामक सैन्य ऑपरेशन राबविण्याचा आदेश दिला.
🍀 इतिहासकारांच्या मते, हे ऑपरेशन ३६ तासांपेक्षा जास्त वेळ चालले.
🍀 १९ डिसेंबर, १९६१ रोजी भारतीय सेनेने वीरतेचा परिचय देत गोव्याला भारतीय संघाशी जोडले.
🍀 यावेळी पोर्तुगीज गव्हर्नर जनरल वसाला-इ-सिल्वा याने पोर्तुगीज सैनिकांसह भारतीय सेना प्रमुख पीएन थापर यांच्यापुढे शरणागती पत्करली होती.
🍀 यानंतर ३० मे, १९८७ साली गोव्याला भारतीय राज्याचा दर्जा मिळाला; मात्र ‘गोवा मुक्ती दिवस’ १९ डिसेंबरलाच साजरा केला जातो.
🍀 आजही भारतात पर्यटनाच्या दृष्टिने गोवा राज्य अग्रेसर आहे.
🍀 पूर्वी ब्रिटिश नागरिक आणि मुगल या भागाकडे आकर्षक झाले होते.
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
No comments:
Post a Comment