Monday, 30 December 2019

महाराष्ट्राच्या सालसा आहेरला दुहेरी मुकुट

👉रवाइन हॉटेलतर्फे आयोजित केलेल्या ‘एमएसएलटीए’ अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत महिला गटात
महाराष्ट्राच्या सालसा आहेरने दुहेरी मुकुट पटकावला.

👉तर एकेरी गटात तिने तेलंगणाच्या संस्कृती ढमेराचा पराभव केला, तर दुहेरी गटात युब्रानी बॅनर्जीच्या साथीने तेजस्वी काटे व सृष्टी दास जोडीला नमवले.

👉तसेच चौथ्या मानांकीत सालसाने तेलंगणाच्या दुसऱ्या मानांकित संस्कृतीचा 6-1, 6-1 एक तास, 10 मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात पराभव केला.

👉त्यानंतर दुहेरीच्या अंतिम सामन्यात सालसाने पश्चिम बंगालच्या युब्रानीसह खेळताना महाराष्ट्राच्या तेजस्वी आणि सृष्टीचे आव्हान 6-2, 6-3 असे मोडीत काढले.

👉पुरुष एकेरीत कर्नाटकच्या अव्वल मानांकित सूरज प्रबोधने महाराष्ट्राच्या सातव्या मानांकित कैवल्य कलमसेचा 6-3, 6-2 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...