Sunday, 22 December 2019

परिणिती चोप्राला ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावरुन हटवले.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात मागील काही दिवसांपासून आंदोलने सुरु आहेत.

रविवारी विद्यापीठांसह शिक्षण संस्थांच्या आवारामधून सुरु झालेल्या आंदोलनाची धग गुरुवारी देशभर पसरली आणि दिल्लीसह मुंबई, बंगळूरु, लखनौ आदी शहरांबरोबरच विविध राज्यांत लोक रस्त्यावर उतरले.

याच पार्श्वभूमीवर अनेक कलाकारांनीसोशल नेटवर्किंगवरुन या कायद्याविरोधात आपले मत नोंदवले आहे.

मात्र थेटपणे या कायद्याला विरोध करणे अभिनेत्री परिणिती चोप्राला महागात पडले आहे.

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या हरयाणा सरकारच्या अभियानाची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर (सदिच्छा दूत) असणाऱ्या परिणितीला हटवण्यात आलं आहे.

तसेच काही दिवसांपूर्वीच या कायद्याला विरोध करणारा अभिनेता सुशांत सिंहला  ‘सावधान इंडिया’ कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आलं आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...