Saturday, 28 December 2019

व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे निधन

◾️रेषा आणि शब्दांच्या फटकाऱ्यांतून राजकीय-सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे ‘लोकसत्ता’चे माजी व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे शुक्रवारी दादर येथे निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते.

सबनीस यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. सबनीस यांचा जन्म १२ जुलै १९५० रोजी झाला.

◾️ त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले होते.

◾️ शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी करणे नाकारून त्यांनी स्वतंत्र व्यंगचित्रकार म्हणून काम सुरू केले.

◾️दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आर. के. लक्ष्मण हे त्यांचे आदर्श होते.

◾️ बाळासाहेब ठाकरे राजकारणात सक्रीय झाल्यानंतर त्यांनी ‘मार्मिक’ची जबाबदारी सबनीस यांच्याकडे सोपवली.

◾️त्यांनी तेथे १२ वर्षे काम केले. त्यानंतर त्यांनी  ‘लोकसत्ता’सह अनेक दैनिकांमध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम केले.

◾️सबनीस गेली सुमारे ५० वर्षे व्यंगचित्रांद्वारे राजकीय-सामाजिक वास्तवावर टिप्पणी करत होते.

◾️ परदेशातील काही नियतकालिकांमध्ये तसेच इंग्रजीतील साप्ताहिकांतही त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली होती.

◾️ व्यंगचित्रकला इतर कलावंतांनीही आत्मसात करावी, यासाठी ते धडपडत असत.

◾️‘वैश्विक नागरिकत्व’ संकल्पनेवर त्यांचा विश्वास होता. त्यांचे  ‘व्यंगनगरी’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...