🔰केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने रोटावॅक लसीचा संपूर्ण देशभर व्यापक स्तरावर वापर करण्याचे ठरविले आहे. हा निर्णय सप्टेंबर २०१९ पासून सर्वत्र लागू होणार आहे.
🔰नव्या केंद्र सरकारच्या पहिल्या १०० दिवसांच्या कार्यकाळातील उपक्रमांतील हा एक भाग आहे.
🔰भारतातील पाच वर्षांखालील मुलांमध्ये होणारा अतिसार हा प्रामुख्याने रोटा व्हायरसमुळे होत असून दरवर्षी एक हजार मुलांमागे ३७ मुलांचा याच विषाणूमुळे मृत्यू होत आहे.
🔰याशिवाय दरवर्षी देशातील आठ लाख लोकांना या विषाणूच्या बाधेमुळे रुग्णालयात दाखल करावे लागत असून सुमारे ७८ हजार लोक मृत्युमुखी पडतात.
🔰हा मृत्युदर लक्षात घेऊन रोटावॅक लशीची निर्मिती देशी तंत्रज्ञान वापरून भारतातच ‘भारत बायोटेक लिमिटेड’ या हैदराबाद मधील कंपनीत करण्यात आली आहे.
🔰सर्वप्रथम २०१६ मध्ये चार राज्यांमध्ये या लशीचा वापर करण्यात आला होता.
🔰रोटावॅक लशीच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉ. गगनदीप कांग यांना लंडनमधील रॉयल सोसायटीच्या फेलोशिपचा मान देण्यात आला आहे. संस्थेच्या ३५९ वर्षांच्या इतिहासात हा मान मिळविणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत.
No comments:
Post a Comment