🔰देश-विदेशातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्यासाठी शहरात बँकॉक येथील सिॲम ओशन वर्ल्डच्या प्रमाणे जागतिक दर्जाचे मल्टीलेव्हल ॲक्वेरिअम (मत्स्यालय) राज्य सरकार उभारणार आहे. मत्स्यालयाच्या उभारणीचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.
🔰ॲक्वेरिअमसाठी जागा निश्चित करण्याबरोबरच त्यासाठीचा आवश्यक प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
🔰मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराकडे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपल्याला नवनवीन पर्यटनस्थळे विकसित करावी लागतील. मुंबईतील क्रुझ टर्मिनलवर देश-विदेशातील क्रुझ मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यातील पर्यटकांसाठी आता वेगळा पर्यटन कार्यक्रम आपल्याला द्यावा लागेल. यादृष्टीने पहिल्या टप्प्यात शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्टीलेव्हल ॲक्वेरिअम (मत्सालय) विकसित करावे, असे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment