Sunday 24 October 2021

भारतीय राज्यघटना प्रश्नसंच

१) श्री. एक्स हे अनिवासी भारतीय नागरिक आहेत. त्यांना लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदान करावयाचे आहे. त्यांच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत. ते कशाप्रकारे मतदान करू शकतील ?

   अ) ते मतदान करु शकरणार नाहीत.

   ब) ते त्यांची मतपत्रिका पोस्टाने पाठवू शकतील.

   क) ते परदेशातील भारतीय दूतवासात जाऊन मतदान करु शकतील.

   ड) भारतीय निवडणुक आयोगाने तयार केलेल्या संकेत स्थळावर जाऊन ते मतदान करु शकतील.

   इ) भारतात जिथे त्यांची मतदार म्हणून नोंद झाली आहे. अशा मतदान केंद्रावर जाऊन ते मतदान करु शकतील.

   1) अ हे बरोबर उत्तर आहे  
   2) इ हे बरोबर उत्तर आहे
   3) क हे बरोबर उत्तर आहे    
   4) ब, क आणि ड ही सर्व बरोबर उत्तरे आहे

उत्तर :- 2

२) खालील जोडया जुळवा :

   अ) मुलभूत अधिकार      i) भाग I

   ब) राज्यनितीची मार्गदर्शक तत्वे    ii) भाग II

   क) संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र    iii) भाग III

   ड) नागरिकत्व        iv) भाग IV

  अ  ब  क  ड

         1)  i  ii  iii  iv
         2)  ii  i  iv  iii
         3)  iv  iii  ii  i
         4) iii  iv  i  ii

उत्तर :- 4

३) भारतीय नागरिकत्व हिरावून घेतल्याने नष्ट होते याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

   1) नागरिकाने लबाडीने नागरिकत्व ‍मिळविले असेल.

   2) नागरिकाने भारतीय राज्यघटनेप्रती बेईमानी दाखविली.

   3) नागरिक सामान्यपणे सलग वर्षे भारताबाहेर राहिला.

   ४३४) नागरिकास नोंदणीनंतर पाच वर्षाच्या आत अन्य देशात एक वर्षांचा तुरुंगवास झाला.

उत्तर :- 4

4) ओ.बी.सी. चळवळ .................. प्रभावीत झाली.

   1) मंडळ आयोगामुळे  
  2) महाजन आयोगामुळे
   3) सरकारिया आयोगामुळे  
4) फजल अली आयोगामुळे

उत्तर :- 1

५) भारताच्या राज्यघटनेच्या ............... भागात नागरिकांच्या मूलभूत हक्कांविषयी तरतूदी करण्यात आल्या.

   1) पहिल्या    2) दुस-या   
3) तिस-या    4) चौथ्या

उत्तर  :- 3

६) राज्यांची पुनर्रचना किंवा संघराज्य संबंध याच्याशी संबंधित आयोग व समित्या कोणत्या आहेत ?

   अ) जे.व्हि.पी. समिती  

   ब) सरकारीया आयोग   

   क) इंद्रजित गुप्ता समिती 

   ड) राजमन्नार समिती

   1) फक्त अ, ब, क    2) फक्त अ, ब, ड    3) फक्त अ, क, ड    4) फक्त ब, क, ड

उत्तर :- 2

७) भारतीय संघराज्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

   अ) भारतीय राज्यघटनेच्या तिस-या कलमानुसार संसदेला नवीन राज्य निर्माण करण्याचा, त्यांचे क्षेत्र कमी करण्याचा किंवा त्यांचे नाव बदलण्याचा अधिकार आहे.

   ब) राज्यघटना दुरुस्तीच्या प्रक्रियेत राज्ये सहभागी होत नाहीत.

        वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?

   1) फक्त अ      2) फक्त ब   
3) अ आणि ब    4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 1

८) . नागपूर कराराच्या कोणत्या तरतूदी आहेत ?

   अ) विकास व प्रशासनासाठी महाराष्ट्राची तीन विभाग – महाविदर्भ, मराठवाडा, राज्याचा उर्वरित भाग

   ब) मराठवाडयाच्या विकासाकडे विशेष लक्ष

   क) उच्च न्यायालयाचे मुख्यपीठ मुंबई येथे तर दुसरे पीठ नागपूर येथे

   ड) नागपूर येथे विधीमंडळाचे एक अधिवेशन राहील

   1) फक्त अ, ब, क  
2) फक्त अ, क, ड  
3) फक्त क, ड, ब  
4) वरीलपैकी सर्व
उत्तर :- 4

९)  भारतीय ‘नागरिकत्व कायदा’ केव्हा बनविण्यात आला ?

   1) 1956      2) 1955   
  3) 1935      4) 1951

उत्तर :- 2

१०) संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरता कोणती अट आवश्यक नव्हती ?

   1) भारताचा अधिवास आणि
   2) भारतात जन्म किंवा
   3) माता व पितांचा भारतात जन्म किंवा
   4) अशा प्रारंभापूर्वी किमान 5 वर्षे भारतात सामान्यत: निवास

उत्तर :- 3

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...