⚜‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय,’ या बिरुदावलीने राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील दोन लाखांहून अधिक पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे.
⚜सेवेत कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदारांना नैसर्गिक मृत्यू आल्यास त्यांच्या वारसांना 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.
⚜तर पोलीस महासंचालक विशेष साहाय्यता निधीतून हे अनुदान तातडीने दिले जाईल.
⚜पोलीस शिपाई ते सहायक फौजदार या दर्जापर्यंतच्या अंमलदारांच्या वारसांना ही मदत मिळेल. दिवंगतांच्या वारसांना शासनातर्फे मिळणारा निधी, मदतीव्यतिरिक्त ही रक्कम मदत म्हणून दिली जाईल.
⚜ याची अंमलबजावणी तातडीने करावी, असे आदेश पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांनी राज्यातील सर्व पोलीस घटक प्रमुखांना नुकतेच दिले आहेत.
⚜विविध घटनांमध्ये ‘ऑनड्युटी’ मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांना शासनाकडून वेगवेगळे अनुदान, विम्याची रक्कम, तसेच पोलीस कल्याण निधीतून विविध स्वरूपात मृतांच्या वारसांना मदत दिली जाते.
⚜मात्र, अंमलदार जर नैसर्गिकपणे निधन पावल्यास यापूर्वी त्यांच्या वारसांना पोलीस कल्याण निधीतून अत्यल्प मदत दिली जात होती. त्यामुळे या रकमेच्या स्वरूपात वाढ करावी, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून अंमलदार वर्गातून केली जात होती.
No comments:
Post a Comment