Monday, 23 December 2019

अमेरिकेत जगातले सर्वात जुन्या झाडांचे अवशेष सापडले

अमेरिका या देशाच्या न्यूयॉर्क राज्यात असलेल्या कैरो गावाच्या परिसरात जगातले सर्वात जुन्या झाडांचे अवशेष सापडले आहे. हे अंदाजे 3860 लाख वर्षे जुने असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. बिंघमटन विद्यापीठ, न्यूयॉर्क स्टेट म्यूजियम आणि ब्रिटनच्या कार्डिफ विद्यापीठामधील शोधकर्त्यांनी या अवशेषांचा शोध घेतला आहे.

संशोधकांच्या मते, हे अवशेष मत्स्य युग म्हणजेच 4190 ते 3590 लाख वर्षे जुने असू शकतात. त्यावेळेसची झाडे 65 ते 70 फुट उंच होती. त्या परिसरातल्या 32000 वर्ग फूट क्षेत्रात अवशेष मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. या वनाचे जाळे शेजारचे राज्य पेंसिल्वेनिया आणि त्यापुढेही पसरल्याचे सांगितले जात आहे.

सापडलेले अवशेष डेवोनियन काळतली आहेत; तेव्हा बहुतेक जीवन पाण्याखाली होते. यापूर्वी सर्वात जुने वनक्षेत्र न्यूयॉर्क राज्यापासून 40 किलोमीटर दूर गिलबाओमध्ये आढळले होते. तेथे सापडलेल्या झाडांची मुळे 6 इंच जाड तर फांद्याची लांबी 35 फूट होती.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...