Wednesday, 11 December 2019

ज्वालामुखी चे प्रकार

ज्वालामुखीचे वर्गीकरण पुढील मुद्द्याच्या आधारे केले जाते एक उद्रेकाचे स्वरूप उद्योगाचा कालखंड व त्याची क्रियेचे स्वरूप
*1】 उद्रेकाच्या स्वरूपानुसार*

*अ】मध्यवर्ती केंद्रीय प्रकार*  [Central Type]
जेव्हा ज्वालामुखी मध्यवर्ती नलिका किंवा एक नलिकेद्वारे लावारस बाहेर पडतो त्याला मध्यवर्ती प्रकार असे म्हणतात अशा प्रकारचे ज्वालामुखी प्रक्षोभक व विध्वंसक असतात.
उदाहरण इटलीमधील *व्हेसूव्हिएस* , जपानमधील *फुजियामा* पर्वत .

*१】ज्वालामुखी स्तंभ :*
ज्वालामुखीच्या अंतिम अवस्थेमध्ये या नलिकेत लाव्हारसाचे निक्षेपण होते आणि ती थंड होऊन लाव्हास्तंभाची निर्मिती होते त्याला ज्वालामुखी स्तंभ असे म्हणतात.

*२】क्रेटर /कुंड :*
ज्वालामुखी शंकूच्या शिरोभागात तयार होणाऱ्या गर्त किंवा विस्तृत खोलगट भागाला क्रेटर असे म्हणतात.
उदाहरण *आलास्का* मधील मृत ज्वालामुखी *अँनिअँकचॅक* या क्रेटरचा व्यास 11 किमी आहे.

*३】 घरट्याकार /क्रेटर /निडाभ कुंड:*
ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक झाल्यास क्रेटर मध्येच लहान-लहान शंकू तयार होतात या भुरूपाला घरट्याकार क्रेटर असे म्हणतात. उदाहरण *व्हेसूव्हिएस* ज्वालामुखी, *फिलिपिन्समधील मऊताल*
.
*४】 कँलडेरा /महाकुंड :*
भूगर्भातील शीलारसाचा कोठीमधून जेव्हा भयंकर विस्पोट होतो तेव्हा ज्वालामुखीच्या शिरोभागाचा बराचसा भूभाग अंतराळात फेकला जातो आणि तेथे विस्तीर्ण काहिलीसारखा खोल खड्डा निर्माण होतो याला कॅलडेरा असे म्हणतात.
उदाहरण *इंडोनेशियामधील* *क्राकाटोआ* , *वेस्टइंडीज* मधील *पिली पर्वत* , *अलास्का* मधील *कॅटमई* पर्वत.

*ब】 भेगी उद्रेकाचे ज्वालामुखी(Fissure type of Volcanoes)*
अशाप्रकारचे उद्रेक प्रस्तरभंग ,भ्रंश आणि भेगीमध्ये आढळतात.

*१】लाव्हा शंकू:* ज्वालामुखीच्या नलिकेभोवती लाव्हा रसाचे निक्षेपण होते व त्यास शंक्वाकृती आकार प्राप्त होतो म्हणून त्याला लाव्हा शंकू असे म्हणतात .
त्याचे दोन उपप्रकार पाडले जातात

*a) ॲसिड लाव्हा शंकु:*
ॲसिड लाव्हारस घट्ट असल्याने त्यापासून निर्माण होणाऱ्या ॲसिड लाव्हा शंकू जास्त उंचीचा व कमी विस्ताराचा असतो ,या शंकूचा उतार तीव्र स्वरूपाचा असतो.

*b) बेसिक लाव्हा शंकु:*
लाव्हा पातळ असल्याने या पासून तयार होणाऱ्या बेसिक लाव्हा शंकूची उंची कमी असते आणि त्याचा विस्तार जास्त असतो ,या शंकुचा उतार मंद स्वरूपाचा असतो.

*२】 राख किंवा सिंडर शंकु:*
ज्वालामुखीचा उद्रेक होऊन ज्वालामुखीय राख मोठ्या प्रमाणात बाहेर पडते ,ज्वालामुखीय राखेमध्ये धुळे राख खडकाचे लहान-मोठे तुकडे वगैरे पदार्थाचा समावेश होतो ,हे पदार्थ ज्वालामुखी भोवती असतात यापासून तयार होणाऱ्या शंक्वाकृती रुपाच राख व सिंडर संकु म्हणतात

*३】 संमिश्र शंकु:*
एखाद्या उद्रेकाच्या वेळी फक्त लाव्हारस बाहेर पडतो व त्याचे ज्वालामुखी भोवती निक्षेपण होते आणि काही काळ उद्रेक  होण्याचे थांबते पुन्हा काही दिवसांनी ज्वालामुखी जागृत होऊन उद्रेकाच्या वेळी ज्वालामुखी राख बाहेर पडते त्या मधून धूळ ,खडक ,खडकांचे तुकडे इत्यादी पदार्थ बाहेर पडतात आणि त्यांचे निक्षेपण होते अशा रीतीने आलटून-पालटून लाव्हारस आणि ज्वालामुखीय राखेचे थर जमा होऊन तयार होणार्‍या ज्वालामुखीस *संमिश्र शंकु* असे म्हणतात.

*2】 उद्रेकाचा कालखंड आणि त्यांच्या क्रीयेच्या स्वरूपानुसार*

*अ】 जागृत ज्वालामुखी :*
ज्वालामुखी मधून ज्वालामुखीचा उद्रेक सतत होत असतो तसेच त्यांच्या उद्रेक केव्हाही होऊ शकतो त्यांना जागृत ज्वालामुखी असे म्हणतात जगामध्ये सुमारे 500 जागृत ज्वालामुखी आहेत.
उदाहरण भूमध्य समुद्रातील *सिसिली* बेटा मधील *स्ट्रोम्बोली* हा जागृत ज्वालामुखी असून त्याला *भूमध्य समुद्रातील द्वीपगृह* असे म्हटले जाते कारण ते सातत्याने वायूचे ज्वलन करत आणि प्रकाशमान प्रदीप्त असतात.

*ब】 निद्रिस्त ज्वालामुखी:*
ज्वालामुखी मधून एकेकाळी जागृत ज्वालामुखी प्रमाणे सतत उद्रेक होत असत परंतु सध्या उद्रेक होणे थांबली आहे आणि पुन्हा अचानक पणे उद्रेक होण्याची शक्यता आहे अशा ज्वालामुखीस निद्रिस्त ज्वालामुखी असे म्हणतात.
उदाहरण *इटलीमधील व्हेसूव्हिएस* ज्वालामुखीचा उद्रेक इ.स.79 मध्ये झाला अधून मधून उद्रेक होतात अलीकडे 1944 साली ज्वालामुखीचा उद्रेक झाला, त्यापैकी सर्वात भीषण उद्रेक 1906 साली  झाला , अलास्का मधील कॅटमई पर्वत.

क】 *मृत ज्वालामुखी* :
ज्वालामुखी मध्ये पुर्वी एकेकाळी उद्रेक होत असत ,आता उद्रेक होत नाही त्यास मृत ज्वालामुखी असे म्हणतात .
उदाहरण *जपानमधील* *फुजियामा* पर्वत.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...