Friday, 20 December 2019

चीनचा डाव उधळून लावण्यास यश

काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्यात आल्यावर पाकिस्तान आणि चीन सातत्याने भारतावर अनेक प्रकारचे बिनबुडाचे आरोप करत आहेत.

-  काश्मीरमधील स्थितीबद्दल चीनने संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत बंद दाराआड चर्चा घडवून आणण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि रशियाच्या विरोधामुळे चीनने हा प्रस्ताव मागे घेतला आहे.

- चीनने अमेरिकेच्या दबावानंतर हा प्रस्ताव मागे घेण्याची हमी दिली आहे. फ्रान्सनेही काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मुद्दा असून यात कुठल्याही तिसऱया देशाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे बजावले आहे.

- यासंबंधीच्या घडामोडींवर भारत नजर ठेवून आहे. भारत सुरक्षा परिषदेचा सदस्य नसल्याने चर्चेत थेट सहभाग नाही. फ्रान्स काश्मीरसंबंधीच्या भूमिकेवर ठाम आहे. काश्मीर मुद्दा द्विपक्षीय मार्गानेच हाताळला जावा, असे फ्रान्सच्या अधिकाऱयाने म्हटले आहे.

- सुरक्षा परिषदेत या मुद्यावर ब्रिटननेही स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. काश्मीरचा मुद्दा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील असल्याने यावर चर्चेचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ब्रिटनकडून स्पष्ट करण्यात आले. सुरक्षा परिषदेत अन्य महत्त्वाच्या जागतिक मुद्दय़ांवर चर्चा केली जावी, असे रशियाने म्हटले आहे.

- 15 सदस्यीय सुरक्षा परिषदेत सामील इंडोनेशियानेही काश्मीर मुद्यावरील चर्चेवर आक्षेप घेतला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैनिकांची संख्या वाढविणे हा कुठल्याही देशाचा अंतर्गत विषय असून यावर अन्य देशाने आक्षेप घेऊ नये असे इंडोनेशियाने सांगितले आहे.

▪️भारत दौऱयाची पार्श्वभूमी

- सीमेच्या मुद्यावर विशेष प्रतिनिधी स्तरीय चर्चेसाठी चीनचे विदेशमंत्री वांग यी हे भारत दौऱयावर येणार आहेत.

-  या महत्त्वाच्या दौऱयापूर्वी सुरक्षा परिषदेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून भारतावर दबाव टाकण्याचा चीनचा प्रयत्न होता. जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागण्याच्या भारत सरकारच्या निर्णयानंतर सादर करण्यात आलेल्या नकाशांच्या कारणास्तव चीन ही चर्चा घडवून आणू इच्छित होता.
----------------------------------------------

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...