Monday, 1 November 2021

अर्थशास्त्र विषयातील आता पर्यंत विचारलेले प्रश्न

1. सहकार चळवळीशी संबंधीत असलेले फेंडरीक निकोल्सन (1892) यांनी भारतात सहकारी संस्था स्थापनेसाठी खालीलपैकी कोणती शिफारशी केल्या.

अ) ग्रामिण भागात सहकारी संस्था स्थापनेसाठी रायफेजन पध्दतीचा वापर करावा.
ब) शहरी भागात सहकारी संस्था स्थापनेसाठी शुल्झ डेलित्झ पध्दतीचा वापर करावा.
क) निकोल्सन यांनी संस्था स्थापनेची प्रेरणा जर्मनी या देशाकडून घेतली.

१) अ आणि ब योग्य
२) अ आणि क योग्य
3) अ, ब आणि क अयोग्य
४) अ, ब आणि क योग्य✅

2. रुपयाच्या अवमुल्यन केले असता खालीलपैकी कोणते परीणाम घडून येतात.

अ) रुपयाची किंमत कमी होईल व डाँँलरची किंमत वाढेल.
ब) परकीयांना भारतात गुंतवणुक करणे सोपे होईल व रोजगार वाढेल.
क) भारताची आयात वाढेल व निर्यात कमी होईल.
ड) चालु खात्यावरील तुट कमी होईल आणि भांडवली खात्यात वाढ होईल.

१) अ, ब आणि क
२) अ, ब आणि ड✅
३) ब, क आणि ड
४) वरील सर्व 

3. घाऊक किंमतीचा निर्देशांक विषयी पुढील विधाने विचारा घ्या.

अ) अभिजित सेन कार्यदलानुसार 2010 पासून 676 वस्तूंच्या घाऊक किंमतीवरुन काढला जातो.
ब) यासाठी आधारभूत वर्ष 2004-05 स्विकारण्यात आले आहे.
क) यामध्ये सर्वाधिक भार प्राथमिक वस्तुंना देण्यात आला आहे.

१) अ आणि ब✅
२) ब आणि क
३) अ आणि क
४) वरील सर्व 

4. राजीव आवास योजनेसंबंधी योग्य विधान ओळखा.

अ) या योजनेची सुरुवात २०११ साली झाली.
ब) या योजनेत ५०% वाटा केंद्राने उचलला आहे.
क) या अंतर्गत ग्रामीण गृहनिर्माणास चालना देण्यात येते.

१) अ आणि ब
२) ब आणि क
३) अ आणि क
४) वरील सर्व  ✅

5. राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरण २००० चा प्रयत्न

१) बालिकांसंबंधी असलेले सर्व भेदभाव व महिलांवर होणारे
सर्व प्रकारचे अत्याचार दूर करणे
२) महिलांना मानवी हक्क आणि सत्तेत समान संधी प्रदान
करणे
३) वरील दोन्ही✅
४) वरीलपैकी कुठलेच नाही

6. अमर्त्य सेन आणि गाऊलेट डी. यांनी वर्णन केलेली विकासाची महत्त्वाची मूल्ये कोणती? खालीलपैकी योग्य
पर्याय निवडा.
१) उपजीविका, स्वतबद्दल आदर, स्वातंत्र्य, क्षमता, अधिकार/हक्क✅

२) आरोग्य, भरणपोषण, शिक्षण, क्षमता, अधिकार/हक्क

३) अन्न, वस्त्र, निवारा, पिण्याचे पाणी, स्वच्छता

४) राष्ट्रीय उत्पन्न वाढ, दरडोई उत्पन्न, मूलभूत गरजा, स्वातंत्र्य, शिक्षण

7. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

अ) वित्त आयोगाची नेमणूक हे राज्यपालांचे कार्यकारी कर्तव्य आहे
ब) नागरी खटल्यांपासून स्वतची प्रतिरक्षा राज्यपालांचा स्वेच्छा अधिकार असतो.
१) केवळ अ
2) केवळ ब
३) दोन्ही
४) एकही नाही✅

8. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न समिती ऑगस्ट ४८ मध्ये नेमली.
ब) प्रोफेसर डी. आर. गाडगीळ हे तिचे अध्यक्ष होते.

१) केवळ अ योग्य
२)केवळ ब योग्य
३) अ व ब दोन्ही योग्य
४)अ व ब दोन्ही अयोग्य✅

9. मनरेगा विषयी असत्य विधान ओळखा.
१. ही योजना २ फेब्रुवारी २००६ ला भारत सरकारच्या ग्रामीण मंत्रालया मार्फत सुरू करण्यात आली
२.या योजनेत किमान रोजगार १२७ रु प्रती दिन इतका मिळतो
३. अर्ज केल्यानंतर किमान ३० दिवसाच्या आत काम मिळाले नाही तर बेरोजगारी भत्ता दिला जातो✅
४.ग्रामीण भागातील अकुशल कामगारांना या योजनेचा लाभ घेता येतो

10. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे (IRDP) कोणत्या योजनेत विलीन करण्यात आले?
१.इंदिरा आवास योजना
२.स्वर्ण जयंती स्वयंरोजगार योजना✅
३.स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना
४.भारत निर्माण योजना

1. जागतिक बँकेद्वारे जारी करण्यात आलेल्या पहिल्या मानव भांडवल निर्देशांकात भारताचा जगात कितवा क्रमांक आहे?
१.108 वा
२.115 वा✅
३.91 वा
४.131 वा

2. भारतात 1997 सालापासून उद्योगांना 'मिनिरत्न' व 'नवरत्न' दर्जा देण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती?
१.सी. रंगराजन
२.अर्जुनसेन गुप्ता✅
३.अभिजितसेन गुप्ता
४.एम. नरसिंहन

3. भारतात शासकीय मार्गाने संरक्षण क्षेत्रात किती टक्के परकीय थेट गुंतवणूकीस (FDI)परवानगी आहे?
१.51%
२.66%
३.74%
४.100%✅

4. भारतात संरक्षण क्षेत्रात स्वयंचलित मार्गाने किती टक्के FDI ला परवानगी आहे?
१.26%
२.49%✅
३.74%
४.100%(शासकीय मार्गाने 100% FDI परवानगी)

5. 2017-18 आकडेवारीनुसार भारतात राष्ट्रीय महामार्गांची सर्वाधिक लांबी कोणत्या राज्यात आहे?
१.महाराष्ट्र✅(15437 किमी)
२.उत्तरप्रदेश (8711 किमी)
३.राजस्थान(7906किमी)
४.दिल्ली(678किमी)

6. भारतात कृषी हवामान विभाग स्थापन कोणत्या साली करण्यात आली होती?

१.1875( भारतीय हवामान विभाग , पुणे स्थापन)
२.1918
३.1932✅
४.1953

7. भारताचे पहिले त्रैवार्षिक आयात निर्यात धोरण 1985 साली कोणत्या समितीच्या शिफारशीवरून स्वीकार करण्यात आले होते?

१.व्ही.व्ही.रामैय्या समिती
२.अबीद हुसेन समिती
३.मुदलियार समिती✅
४.एल.के.झा. समिती

8. भारताच्या परकीय व्यापार धोरणाची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती आहेत?

अ.आयात पर्यायीकरण
ब. निर्यात प्रोत्साहन
क. परकीय बाजारपेठ काबीज करणे
ड. शेती व्यापारास प्रोत्साहन

पर्याय

१.अ,ब,क,ड
२.अ,ब,क
३.फक्त क
४.अ,ब✅

9. 1971 साली कार्यान्वित करण्यात आलेली भारताची झर्लिना  ही अणुभट्टी कोणत्या देशाच्या मदतीने स्थापन करण्यात आली होती?
१.अमेरिका
२.ब्रिटन
३.फ्रान्स✅
४.स्वदेशी बनावटीची

10. संपूर्ण भारतीय मालकीची पहिली बँक कोणती?
१.बँक ऑफ हिंदुस्थान
२.RBI
३.पंजाब नॅशनल बँक✅
४.बँक ऑफ महाराष्ट्र

1.स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील दारिद्र्य विषयक अभ्यास करणाऱ्या तज्ञांमद्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?
1.प्रा.वी. म.दांडेकर
2.डॉ. नीलकंठ रथ
3.म.एस. अहलुवालीया
4.जॉन मालथस✅

2.खाजगिकरणाबाबत करण्यात आलेल्या खालील उपाययोजनांपैकी अयोग्य पर्याय ओळखा
1.उद्योगांना नवरत्नाचा दर्जा
2. राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती
3.निर्गुंतवणूक धोरण
4. फेरा ऐवजी फेमा धारण करणे✅

3.खालीलपैकी कोणते कार्य रिझर्व्ह बँकेचे म्हणता येणार नाही?
1.बँकांची बँक म्हणून काम पाहणे
2.जागतिक बँकेचे प्रतिनिधित्व करणे✅
3. परकीय चलनाचा साठा सुरक्षित ठेवणे
4.चलन निर्मिती करणे

4. महाराष्ट्राच्या नवीन सुधारित पथकर धोरण (toll policy)  बाबत खालील विधाने विचारात घ्या.
1. अर्थसंकल्पातून पूर्ण करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या प्रकल्पावर पथकर आकारला जाणार नाही✅
2. 200 कोटी रुपयाखालील  प्रकल्प खाजगीकरणानंतर्गत करण्यात येणार नाही
3. फक्त 200 कोटी रुपयांपुढील खाजगी प्रकल्पांसाठी पथकर आकारला जाईल
4. एकाच रस्त्यावरील दोन पथकर नाक्यांमधील अंतर किमान 20. कि. मी असावे

5.लोकांची योजना चे जनक म्हणून ..... यांचा निर्देश करावा लागेल?
1. श्रीमान नारायण
2.मानवेंद्रनाथ रॉय✅
3. प. जवाहरलाल नेहरु
4. एम. विश्वेश्वरय्या

6.विशेष उचल अधिकार (SDRs) सुविधा कोनामार्फत उपलब्ध करून दिली जाते?
1. जागतिक बँक
2. जागतिक व्यापार संघटना
3. आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ
4. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी✅

7. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादन साधनाचे स्वामित्व, नियंत्रण व्यवस्थापन .....केले आहे.
1. सरकारद्वारे
2. समाजद्वारे
3. खासगी व्यक्तिद्वारे✅
4. सहकाराद्वारे

8.सार्वजनिक वितरण प्रणालीची उद्दिष्ट्ये कोणती आहेत?
अ) उपभोक्त्यांना स्वस्त आणि सवलतीच्या दरात अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे
ब) लोकसंख्येचा किमान पोषणात्मक दर्जा टिकवून ठेवणे
1.अ बरोबर ब चूक
2.अ चूक ब बरोबर
3.दोन्ही बरोबर✅
4.दोन्ही चूक

9.दरडोई उत्पन्न म्हणजे .....
1.देशातील एकूण लोकसंख्या भागीले एकूण राष्ट्रीय उत्पन्न
2. देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागीले देशाचे एकूण उपभोग खर्च
3. देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागीले देशाची एकूण लोकसंख्या✅
4. एकूण उपभोग खर्च भागीले एकूण लोकसंख्या

10. लोकसंख्या स्थित्यंतरातील तिसरी अवस्था असलेला पर्याय सांगा.
1. जास्त जन्मदर व जास्त मृत्युदर
2. जास्त जन्मदर व कमी मृत्युदर
3. कमी जन्मदर व जास्त मृत्युदर
4. कमी जन्मदर व कमी मृत्युदर✅

1. महाराष्ट्रातील भारनियमनाचे  प्रमुख कारण काय आहे?

1. वाढती मागणी आणि अपुरी निर्मिती✅
2. योग्य व्यवस्थापनाचा अभाव
3. पारेशनातील गळती
4. चुकीचे सरकारी धोरण

2. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत आर्थिक हिस्सा खालीलपैकी कोणता घटक दर्शवितो?
अ) सार्वजनिक क्षेत्र
ब) खाजगी क्षेत्रातील मोठे उद्योग
क) धातू वस्तू
ड) लघू उद्योग
योग्य पर्याय निवडा
1. (अ) आणि (ब)
2. (ब) फक्त✅
3. (क) आणि (ड)
4. (ड) फक्त

3. महाराष्ट्र सरकारने २०१३ सालच्या नवीन औद्योगिक धोरणाद्वारे सूक्ष्म ,लघू व मध्यम उपक्रमांबाबतीत पुढीलपैकी कोणत्या दृष्टिकोनाचा अवलंब केला आहे?
1. आशावादी
2. वास्तवादी
3. पवित्रवादी✅
4. अवास्तववादी

4. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत खालील घटकांचा समावेश होतो
अ) आंतरराष्ट्रीयीकरण
ब) खाजगीकरण
क) शिथिलीकरण
ड) विकेंद्रीकरण
1.(अ) आणि(ड)
2. (अ) आणि(क)✅
3. (ब) आणि(क)
4. (क) आणि(ड)

5. १९९१ च्या औद्योगिक धोरणाची कोणती उद्दिष्ट्ये होती?
अ) औद्योगिक परवानाराज संपुष्टात आणणे
ब) खाजगी क्षेत्राचे महत्व कमी करणे
क)सार्वजनिक क्षेत्राचे महत्व कमी करणे
ड)लघुउद्योगाचा विकास
दिलेल्या पर्यायातून अचूक पर्याय निवडा:
1. फक्त(अ)
2. (ब) आणि(ड)
3. (अ) आणि(क)✅
4. वरील सर्व

6. खालीलपैकी कोणती विधाने जागतिकीकरणाचा नकारात्मक परिणाम दर्शवतात
अ) कामगार संघटित क्षेत्रातून असंघटित क्षेत्रात ढकलले गेले
ब) स्पर्धा निर्माण केली
क) कामगार संघटनांची सौदाशक्ती घटली
ड) थेट परकीय गुंतवणूक वाढली
पर्यायी उत्तरे
1(अ) व (क) ✅
2. (अ) व (ड)
3. (ब) व (क)
4. (अ) व (ब)

7.  २०११-१२ मध्ये भारताच्या निर्यातीच्या बाबतीत वरची पाच राज्ये कोणती होती?
1. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक✅
2. महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि केरळ
3. महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि पंजाब
4. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश

8. भारताच्या विदेशी व्यापाराच्या दिशेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान समर्पक आहे?
1.OECD देशांचे भारतीय निर्यातीमधील महत्व वाढले आहे
2.  भारताचा OPEC प्रदेशाशी व्यापार मोठ्या प्रमाणात सुधारला आहे✅
3. भारताच्या निर्यातीत इंग्लंडचे स्थान प्रथम आहे
4.  सार्क प्रदेशातून आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे

9. सॉफ्टवेअर निर्यातीतील हिश्य्यानुसार भारतासाठी सर्वाधिक महत्वाची बाजारपेठ कोणती आहे?
1. अमेरिका✅
2. इंग्लंड
3. चीन
4.  जपान

10.  २०११-१२ मध्ये झालेल्या खाद्यान्नाच्या भाववाढीमध्ये  खालील घटकांचा महत्वचा वाटा होता.
अ) दूध
ब) अंडी, मटण, मासे
क) खाद्यतेल
ड) साखर
योग्य पर्याय निवडा
1. फक्त(अ) आणि (ब) ,(क)✅
2. फक्त(अ) (ब) आणि(ड)
3.फक्त (ब) (क) आणि(ड)
4. फक्त(ब) आणि(ड)

1. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भांडवलशाही अर्थव्यवस्थेची आहेत?
अ) कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा हेतू असतो.
ब) व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते
क) उद्योग उभारणीसंदर्भात मालक स्वतः निर्णय घेतात
ड) यातील उत्पादनाचे कार्य व विभाजन सरकारमार्फत चालते
1. अ,ब
2. क,ड
3. अ,ब,क,ड
4. अ,ब,क✅

2.  पर्याप्त लोकसंख्येची वौशिष्ट्ये ओळखा?
अ) यामध्ये उपलब्ध साधनसामग्रीचा परिपूर्ण वापर केला जातो
ब) उपलब्ध साधनसामग्री गरजे एवढी निर्माण झालेली असते
क) देशातील लोकसंख्येचे आदर्श आकारमान दर्शवते
1. अ,क बरोबर✅
2. अ,ब,क बरोबर
3. ब,क बरोबर
4. अ,ब बरोबर

3. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा उपयोग होतो?
अ) सार्वजनिक क्षेत्र
ब) सहकार क्षेत्र
क) समाजवादी क्षेत्र
ड) खाजगी क्षेत्र
1. अ,ड✅
2. ब,क
3. क,ड
4. अ,ब

4. वस्तू व सेवांच्या उत्पादनासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राची निवड करावी लागते
अ) श्रमप्रधान तंत्र
ब) कृषिप्रधान तंत्र
क) भांडवलप्रधान तंत्र
1. अ,ब,क
2. अ,ब
3. अ,क✅
4.ब,क

5. खालील विधानातून योग्य पर्याय ओळखा
अ) भूमी, श्रम, भांडवल इत्यादी घटकांच्या कमतरतेमुळे उपभोग्य वस्तूंचे उत्पादन घटते
ब) औद्योगिक कलहामुळे उत्पादन प्रभावित होते
क) सुखचैनीच्या वस्तू वाढीमुळे बाजार भावात घट होते
1. अ,ब✅
2. ब,क
3. अ,क
4.अ,ब,क

6.वस्तू व सेवांच्या तुलनेत पैशाचा पुरवठा अतिरिक्त झाल्यास पुढील कोणत्या मौद्रीक अधिकाराचा वापर करून ते कमी केले जातात
अ) बँक दर वाढवणे
ब) सरकारी कर्जखोऱ्याची खरेदी
क) रोख राखीव निधीच्या प्रमाणात वाढ करणे
1. अ
2.ब
3. अ,ब,क
4. अ,क✅

7. राष्ट्रीय उत्पन्नाची योग्य वैशिष्ट्य ओळखा
अ) राष्ट्रीय उत्पन्न ही समग्रलकशी संकल्पना आहे
ब) राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे
क) राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे पैशात व्यक्त केलेले मूल्य
ड) राष्ट्रीय उत्पन्नात घसारा मोजला जातो
1. अ,ब,ड
2. अ,क,ड
3. ब,क,ड
4. अ,ब,क✅

8. खालीलपैकी कोणत्या कारणाने वस्तू विनियमात अडचण होती, याबाबत अयोग्य विधाने ओळखा
अ) गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव
ब) मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव
क) वस्तूंचा साठा कऱण्यातील अडचण
ड) विलंबित देणी देण्यातील अडचण
1, अ,ब
2. ब,व क
3. यापैकी नाही✅
4. अ,ब,क,ड

9. खालीलपैकी कोणत्या चलनप्रकारात अतिरिक्त चलननिर्मितीचा धोका संभवतो
अ) प्रातिनिधिक कागदी चलन
ब) परिवर्तनीय कागदी चलन
क) अपरिवर्तनीय कागदी चलन
1. अ,ब
2. अ,क
3. ब,क✅
4. अ,ब,क

10. रेपो दर वाढिचा खालीलपैकी कोणता परिणाम आहे?
अ) चलनपुरवठा कमी होतो
ब) महागाईत वाढ होते
क) व्यक्तींची व्यय शक्ती वाढते
ड) उत्पादनात वाढ होते
1. अ,ब✅
2. ब,क
3. अ,ड
4. अ,ब,क

1. वस्तू व सेवांच्या उत्पादनात घट होण्याची प्रमुख कारणे कोणती?
अ) उत्पादन घटकांची टंचाई
ब) औद्योगिक कलह
क) नैसर्गिक आपत्ती
ड) कर कपात
1. अ,ब,ड✅
2. ब,क,ड
3. अ,क,ड
4. अ,ब

2. अर्थव्यवस्थेत पुढील कोणत्या घटकांचा विचार केला जातो?
अ)  उत्पादन
ब) उपभोग
क) वितरण
ड) उपलब्ध साधनसामग्रीचे विभाजन
1. अ,ब,क
2. अ,ब
3. अ,क
4. वरील सर्व✅

3. भौतिक जीवनमान निर्देशांकावर काही मर्यादा आहेत. याबाबत अयोग्य विधान ओळखा
अ) बेरोजगारी, गृहनिर्माण, न्याय सुरक्षितता, मानवी हक्क हे घटक दुर्लक्षित झाले आहेत
ब) यात निर्देशकांचे तीन घटक सारखे महत्वाचे असतात
क) या निर्देशांकाद्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदलाचे स्पष्टीकरण करता येते.
1. अ,ब
2. ब,क
3. अ,ब,क
4. क✅

4खालीलपैकी कोणते आर्थिक वृद्धीचे निर्देशक मानले जाते?
अ) स्थूल देशांतर्गत उत्पादनातील वाढ
ब) दरडोई उत्पन्नामध्ये वाढ
क) दरडोई उपभोगात  वाढ
ड) लोकांचा सहभाग
1. अ,ब,क✅
2. ब,क,ड
3. ब,क
4. वरील सर्व

5. टेलिफोन क्षेत्राबाबत अयोग्य पर्याय ओळखा
1. महानगर टेलिफोन निगम. लि
2. भारत संचार निगम लि
3. टेलिकॉम रेग्युलिटी ऑथिरिटी लि✅
4. विदेश संचार निगम लि

6. खालीलपैकी दारिद्र्याचे आर्थिक परिणाम कोणते
अ) उत्पन्नात विषमता
ब) संसाधनांचा अपव्यय
क) मानवी मूल्यांचा ऱ्हास
ड) आर्थिक गुन्हेगारीत वाढ
1. अ,ब
2. ब,क,ड
3. अ,ब,ड✅
4. वरीलपैकी सर्व

7. मंदीच्या काळातील बेकारीला कोणती बेकारी म्हणतात
अ) घर्षणजन्य
ब) चक्रीय
क) ऐच्छिक
ड) संरचनात्मक
1. अ,ब,क
2. ब✅
3. अ,ब
4. वरील सर्व

8. खाजगिकरणाबाबत खालील कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत , याबाबत अयोग्य पर्याय ओळखा
1. उद्योगांना नवरत्नाचा दर्जा
2. राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती
3. निर्गुंतवणूक धोरण
4. फेरा ऐवजी फेमा लागू✅

9. मानवी विकासाच्या प्राथमिक अवस्थेत पैसा म्हणून कशाचा वापर होत?
अ) पिसे , हस्तिदंत
ब) प्राण्यांची कातडी लोकर
क) मीठ, शिंपले
ड) नाणी
1. अ,ब,क✅
2. वरील सर्व
3. अ,ब,ड
4. अ,क,ड

10. खातेदाराने स्वाक्षरी केलेला दस्तऐवज घेवून आल्यास, त्यात नमूद केलेली रक्कम त्यास द्यावी असा आदेश म्हणजे काय?
अ) हुंडी वटवणे
ब) रोख कर्ज
क) अल्प मुदत कर्ज
1. ब,क बरोबर
2. फक्त अ बरोबर✅
3. अ,क
4. फक्त ड

1. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा?
अ) न्यून लोकसंख्या म्हणजे लोकसंख्या खूप जास्त असणे
ब) न्यून लोकसंख्या म्हणजे उपलब्ध साधनसामग्रीचापूर्ण वापर करण्यासाठी लोकसंख्या पुरेशी असणे
क) न्यून लोकसंख्येचे उदाहरण भारत आहे
1. अ,क बरोबर
2. अ,ब,क बरोबर
3. फक्त ब बरोबर
4. वरीलपैकी एकही नाही✅

2. श्रमापेक्षा यंत्रसामुग्रीचा जास्त वापर ...... यंत्रणांमध्ये केला जातो?
1. भांडवलप्रधान ✅
2. श्रमप्रधान
3. पारंपरिक
4. यापैकी नाही

3. केंद्र सरकार खालील गोष्टींसाठी जबाबदार असते?
1. अन्नधान्याची साठवणूक✅
2. शिधापत्रिकांचे वितरण
3. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाची माहिती
4. स्वस्त धान्याच्या दुकानांच्या कामाचे पर्यवेक्षण

4. भाववाढीचे नकारात्मक परिणाम सांगा
1. खरेदीक्षमता घटते
2. बचत घटते✅
3. भांडवल उभारणी घटत
4. उत्पन्न वाढते

5.भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाबाबत योग्य विधाने ओळखा
1. देशाच्या उत्पादनात सध्या प्राथमिक क्षेत्रापेक्षा द्वितीयक क्षेत्राचा वाटा जास्त आहे✅
2. देशाच्या उत्पादनात सध्या द्वितीयक क्षेत्रापेक्षा प्राथमिक क्षेत्राचा वाटा जास्त आहे
3. देशाच्या उत्पादनात सध्या ्तृतीयक क्षेत्रापेक्षा द्वितीयक क्षेत्राचा वाटा जास्त आहे
4. देशाच्या उत्पादनात सध्या तृतीयक क्षेत्रापेक्षा प्राथमिक क्षेत्राचा वाटा जास्त आहे

6. सार्वजनिक उणीवांचा योग्य पर्याय ओळखा.
अ) गरिबांचा मर्यादित फायदा
ब) वितरकांचा फायदा होत नाही
क) शहरी पूर्वग्रह
ड) प्रादेशिक विषमता
1. अ,ब,क
2. ब,क,ड
3. अ,क,ड✅
4. यापैकी नाही

7.भारतात सार्वजनिक वितरण प्रणाली केव्हा अस्तित्वात आली
1. १९७२ च्या दुष्काळानंतर
2. २००० च्या दुष्काळानंतर
3. १९७३ च्या पहिल्या तेल झटक्यानंतर
4. १९४३ च्या बंगाल दुष्काळानंतर✅

8. भारतातील बेकारी नष्ट होण्यासाठी शासनाने खालीलपैकी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत
अ) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम
ब) सीमांत शेतकरी व शेतमजूर कार्यक्रम
क) कृषी सेवाकेंद्र
ड) धडक कार्यक्रम
इ) जवाहर रोजगार योजना
उत्तर :-वरील सर्व✅

9.पुढील कोणते विधान अयोग्य आहे.
अ) दहशतवादामूळे विदेशी व्यापारावर विपरीत परिणाम होतो
ब) भ्रष्ट्राचारामुळे आर्थिक विषमता निर्माण होते
क) साठेबाजीमुळे वस्तूंच्या व सेवांच्या कृत्रिम तुटवडा निर्माण होतो
ड) उत्पादनात वाढ करण्याचा आकृतिबंध नैसर्गिक पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात घातक आहे
1. अ
2.ब
3. क
4. यापैकी नाही✅

10.माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सुरू केलेली जवाहर रोजगार योजना पुढील कोणत्या वर्गासाठी होती
अ) आदिवासी
ब) अनुसूचित जाती
क) वेठबिगार
1. फक्त अ
2. फक्त ब
3. अ ,ब
4. अ,ब,क✅

1. पुढील विधानांवर विचार करा.
अ) जेव्हा देशाची आयात जास्त असते तेव्हा देशाचा व्यापार प्रतिकूल असतो.
ब) जेव्हा देशाची निर्यात जास्त असते तेव्हा देशात भाववाढ होत असते.
1. अ बरोबर ब चूक
2. अ चूक ब बरोबर
3. अ व ब दोन्ही चूक
4. अ व ब दोन्ही बरोबर✅

2.भारतात सार्वजनिक वितरण प्रणाली केव्हा अस्तित्वात आली?
1. 1972 च्या दुष्काळानंतर
2. 2000 च्या दुष्काळानंतर
3. 1973 च्या पहिल्या तेल झटक्यांणातर
4. 1943 च्या बंगाल दुष्काळानंतर✅

3. ग्राहक संरक्षण कायद्याचे मुख्य उद्दिष्ट सांगा?
अ) ग्राहकांना चांगले व परिपूर्ण सरंक्षण देणे
ब) ग्राहकांवरील अन्यायाचे निवारण करण्यासाठी सुलभ व वेगवान यंत्रणेची तरतूद करणे
क) भेसळयुक्त वस्तूची विक्री थांबवणे
ड) साठेबाजी व काळाबाजार करणे
1.अ,ब,ड
2. ब,क,ड
3. अ,ब✅
4. वरील सर्व

4.खालीलपैकी योग्य विधाने ओळखा
अ) आर्थिक वृद्धीच्या संकल्पनेत गरिबी, बेरोजगारी, आर्थिक विषमता इत्यादी समस्या निराकरणाचा प्रयत्न केला जात नाही
ब) आर्थिकवृद्धी ही संख्यात्मक संकल्पना आहे
1. अ बरोबर ब चूक
2. ब बरोबर अ चूक
3. दोन्ही बरोबर✅
4.दोन्ही चूक

5.भौतिक जीवनमान निर्देशकांचे निर्देशक घटक खालील पैकी कोणते?
अ) सरासरी आयुर्मान
ब) माता मृत्युदर
क) साक्षरतादार
ड) बालमृत्यूदर
1. अ,ब,ड
2. ब,क,ड
3. अ,क,ड✅
4. ब फक्त

6.अयोग्य पर्याय ओळखा
अ) आर्थिकवृद्धी होत असताना राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा मोठा असतो
ब) आर्थिक विकास होत असताना राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा कमी कमी होत जातो तर उद्योग व  सेवाक्षेत्राचा वाटा वाढत जातो
1. अ
2. ब
3. अ व ब
4. यापैकी नाही✅

7.शासनाने गरिबी निर्मूलनासाठी केलेल्या विशेष उपाय योजनांबाबत अयोग्य पर्याय ओळखा.
1. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम- कामाच्या बदल्यात धान्य
2. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम- पदवीधरांना स्वयंरोजगारासाठी मदत✅
3 .स्वयंरोजगारासाठी  ग्रामीण युवकांना प्रशिक्षण- स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण
4. जवाहर रोजगार योजना

8.भारतातील लोकसंख्येची वैशिष्ट्ये ओळखा
अ) जन्मदर व मृत्युदर यातील घटता फरक
ब) घटता बालमृत्यूदर
क) लोकसंख्या दशवार्षिक वाढीचा घटता दर
ड) कमी जन्मदर व उच्च मृत्युदर
1. अ,ब
2. अ,ब,क✅
3. वरील सर्व
4. यापैकी नाही

9.खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) लोकसंख्या स्थित्यंतराचा सिद्धांत जन्मदाराचे व मृत्यूदराचे उच्च वेगकडून कमी वेगाकडे स्थित्यंतर स्पष्ट करते
ब) १९२१ या वर्षाला महाविभाजन वर्षे असे म्हणतात
1. केवळ अ
2. केवळ ब
3. अ आणि ब✅
4. अ व ब दोन्ही नाहीत

10. कुटुंब कल्याण कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला?
1.1950
2. 1956
3. 1952✅
4. 2000

1. बेकारीच्या आर्थिक परिणामविषयी चुकीचे विधान ओळखा?
अ) संसाधनांचा अपव्यय
ब) कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अवघड
क) दारिद्र्य व उत्पादनातील विषमता
ड) आर्थिक गुन्हेगारीत वाढ
इ) अनुत्पादक लोकसंख्येचा वाढता भर
1. अ,ब
2. क,ड,इ
3. यापैकी नाही✅
4. वरील सर्व

2.1991 साली नवीन आर्थिक धोरणाची आवश्यकता खालील कोणत्या कारणावरून वाटू लागली?
अ) आर्थिक अस्थिरता
ब) प्रतिकूल व्यापरतोल
क) कर्जाचा वाढता भार
ड) भाववाढ
इ) जर्मनीचे विघटन
1. अ,ब,क,ड
2. अ,ब,क✅
3. ब,क,ड,इ
4. वरील सर्व

3.खालीलपैकी आधुनिक काळातील सर्वात महत्वाची समस्या कोणती?
अ) पर्यावरण हानी
ब) बेरोजगारी
क) रोगराई
ड) प्रतिकूल मान्सून
1. अ✅
2. अ,ब,क
3. क,ड
4. वरील सर्व

4.खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे
अ) प्रचलित मजुरी दरावर काम करण्याची इच्छा व पात्रता असतानाही न मिळणे म्हणजे बेकारी होय
ब) तेजीच्या अवस्थेनंतर येणाऱ्या मंदीच्या अवस्थेत प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या बेकारीला चक्रीय बेकारी असे म्हणतात.
क) जेव्हा अर्थव्यवस्थेत संरचनात्मक व तंत्रज्ञानात्मक बदल होतात त्याला संरचनात्मक बेकारी म्हणतात
1. अ, क
2. ब,क
3. अ,ब
4. वरील सर्व✅

5.भारतातील उच्च जन्मदराच्या कारणांपैकी अयोग्य कारण ओळखा.
अ) सार्वत्रिक विवाह
ब) दारिद्र्य
क) स्त्रियांचा निम्न दर्जा
ड) वाढती साक्षरता
1.अ,ब,क
2. ब,क,ड
3. अ,ब,क,ड
4. ड✅

6.जागतिकीकरणात पुढील कोणत्या गोष्टींचा समावेश होतो
अ) आधुनिक दळणवळण
ब) माहिती तंत्रज्ञान
क) प्रगत वाहतूक
ड) डॉलर ची निर्मिती
1. अ,क
2. अ,ब,ड
3. अ,ब,क✅
4. अ,क,ड

7.भारतातील खनिज तेलाबाबत अयोग्य विधान ओळखा.
अ) भारतात तेल संशोधनासाठी तेल आणि नैसर्गिक वायू मंडळाची स्थापना करण्यात आली
ब) 1959 साली ऑइल इंडिया लिमिटेड ची स्थापना करण्यात आली.
1. अ
2. ब
3. अ व ब
4. यापैकी नाही✅

8.10 व्या पंचवार्षिक योजनेबाबत अयोग्य विधाने ओळखा.
1. स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये वार्षिक सरासरी वृद्धी 7.8% झाली
2. त्यामुळे भारत हा वेगाने विकास करणारा देश ठरला.✅
3. औद्योगिक क्षेत्रातील वृद्धी 8.8% वार्षिक दराने वाढली
4. फेब्रुवारी 2007  मध्ये भारताचा विदेशी चलनाचा साठा 185  बिलिअन डॉलर पर्यंत पोहोचला होता.

9. खालीलपैकी कोणत्या कारणाने कागदी चलनाची निर्मिती झाली
अ) धातू, पैसा वाहून नेण्याच्या अडचणीमुळे 
ब) सोने, चांदीचा पुरवठा कमी असल्यामुळे
क) नाण्यात होणाऱ्या झीजमुळे
1. फक्त अ
2. अ व ब
3. अ व क
4. वरील सर्व✅

10.राष्ट्रीय उत्पन्न हा चक्रीय प्रवाह आहे , कारण......
अ) उत्पन्न हे दरवर्षी मोजले जाते
ब) एका व्यक्तीचे उत्पन्न म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचा खर्च होय.
1. अ बरोबर
2. ब बरोबर✅
3. दोन्ही बरोबर
4. दोन्ही चूक

1. ई. स. 2018 मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले की ज्यांनी शाश्वत व दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये योगदान देणारे लिखाण केले.
1. प्रा सोलो आणि सम्यूल्सन
2. गुंन्नर मीरडाल आणि प्रा राजन
3. प्रा विल्यम नॉरधस आणि प्रा पॉल रोमर ✅
4.अमर्त्य सेन आणि प्रसू

2. लेखक समिती व त्यांच्या दारिद्रयाच्या संकल्पना यांची योग्य जोडी लावा
        अ गट
अ. जागतिक बँक
ब. श्री  गौरव दत्त
क. लकडावाला समिती
ड. डॉ दांडेकर आणि डॉ रथ
         
          ब गट
I. दरडोई दर दिवशी ग्रामीण भागात 2400 उष्मांक आणि शहरी भागात 2100 उष्मांक मिळण्याइतके अन्नधान्य मिळणे आवश्यक.
II. दारिद्र यातील अंतर (दारिद्रय आतील पोकळी)
III. दरडोई दर दिवशी आहारासाठी 2250 उष्मांकापेक्षा कमी अन्न मिळणे
IV. 1973- 74 च्या किमतीनुसार ज्यांना दरडोई महिना ग्रामीण भागात रुपये 49.0 नऊ आणि शहरी भागात रुपये 57 आहारासाठी मिळत नाहीत
✅उत्तर:- अ-IV, ब-III, क- I, ड- II

3. घाऊक किंमत निर्देशांका मध्ये (WPI) पुढीलपैकी कोणत्या वस्तूंच्या किमतींचा विचार केला जातो?
अ. प्राथमिक वस्तू
ब. इंधन
क. उत्पादित वस्तू
1. फक्त अ आणि क
2. फक्त अ आणि ब
3. फक्त ब
4. वरील सर्व✅

4. पी डी ओझा (1960-61) समितीने दारिद्र्यरेषेच्या मापनासाठी पुढीलपैकी कोणता निकष विचारात घेतला होता?
1. प्रति व्यक्ती प्रति महिना मिळणारे उत्पन्न
2. प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च✅
3. वरील दोन्ही
4. यापैकी नाही

5. सर्वसमावेशक वृद्धि प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशक पुढीलपैकी कोणते आहे?
अ. महसूल स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण
ब. सार्वजनिक गुंतवणूक स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण
क. वरीलपैकी दोन्ही
ड. यापैकी नाही

6. योजना काळातील 1951 ते 2011 या कालखंडाच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.
अ. देशाच्या अन्नधान्य उत्पादनात चार पट वाढ झाली भारतीय उद्योगांचे विविधीकरण झाले
ब. आयातपर्यायी करण निर्यात विविधीकरण आणि विज्ञान तंत्रज्ञान विद्येचा प्रसार झाला
क. दारिद्र्य व बेकारीचे प्रमाण कमी करण्यात यश आले
ड. उत्पन्न व संपत्तीचे विकेंद्रीकरण करणे आणि आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण कमी करण्यात यश आले
1.ब, क, ड
2.ब, क
3.अ, ब✅
4. क, ड

7. खालीलपैकी कोणते सहस्त्रक विकास ध्येय नाही?
1. अति गरिबी आणि भूक यांचे उच्चाटन
2. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्यता
3. बालमृत्यू दर कमी करणे
4. कृषी शाश्वतता साध्य करणे✅

8. लिंग असमानता निर्देशांकामध्ये(GII) पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो?
अ. प्रजनन स्वास्थ्य
ब.सबलीकरण
क.श्रम बाजार
1.अ, ब
2.ब, क
3.ब
4.अ, ब, क, ड✅
👆🏻या प्रश्नामध्ये अ ब आणि क हे तीनच पॉइंट दिले असुन उत्तरामध्ये मात्र अबकड असे चार पर्याय दिल्यामुळे हा प्रश्न चुकीचा असल्याने याचा एक गुण आयोगामार्फत दिला जाऊ शकतो

9. अल्पसंख्यांक समुदायाच्या सामाजिक आर्थिक वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या योजना उपयोगी आहेत?
अ. नई रोशनी
ब. पढो परदेस
क. शिका व कमवा
ड. नई मंजिल
1. अ, ब
2. क, ड
3. वरीलपैकी कोणतेही नाही
4. वरील सर्व

10. जून 2012 मध्ये Rio+20 घोषणापत्र संदर्भात शाश्वत विकास उद्दिष्ट (SDGs) ठरविण्यात आली त्यानुसार पुढील पैकी कोणती वैशिष्ट्ये ठरविण्यात आलेले नव्हते?
अ. गरिबीचे उच्चाटन असमान ती विरुद्ध संघर्ष लिंगभाव समानता
ब. आरोग्य व शिक्षण सुधारणा महासागर व जंगल रक्षण
क. अविरत विकासासाठी जागतिक भागीदारी पाठपुरावा आणि समीक्षा साठी प्रभावी संरचना विकास
ड. अतिरेकी संघटना वर बंदी आणि पर आक्रमण वर बंदी
1.क, ड
2.अ, ब, क
3. ड
4.अ

11. वित्तीय सर्वसमावेशकते आपण चुकीचा प्रश्न साठी प्रधानमंत्री जनधन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू करण्यात आली?
1. 16 मे 2014
2. 15 में 2014
3. 28 ऑगस्ट 2014✅
4. 18 नोवेम्बर 2014

12. सन 1991 मध्ये विकासाचे एल पी जी प्रतिमान.......
या त्या वेळच्या अर्थमंत्र्यांनी अमलात आणले?
1.पी व्ही नरसिंहराव
2. प्रणव मुखर्जी
3. डॉ मनमोहन सिंग ✅
4. पी चिदंबरम

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 12 & 13 जानेवारी 2025

◆ 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.[स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस :- 12 जानेवारी] ◆ भारतीय हवामान विभाग (I...