Saturday, 14 December 2019

जगातील १०० प्रभावी महिलांत सीतारामन

✍ फोर्ब्सच्या यादीत अँगेला मर्केल प्रथम स्थानावर

◾️फोर्ब्स नियतकालिकाच्या शंभर शक्तिशाली- प्रभावी महिलांच्या यादीत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांचा समावेश करण्यात आला आहे. 

◾️या शंभर महिलांत जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल पहिल्या क्रमांकावर आहेत.

◾️यादीतील इतर भारतीय महिलांमध्ये एचसीएल कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक
📌रोशनी नादर मल्होत्रा व

◾️बायोकॉनच्या संस्थापक
📌किरण शॉ मजुमदार यांचा समावेश आहे.

◾️फोर्ब्सची २०१९ची यादी ‘दी वर्ल्डस् १०० मोस्ट पॉवरफुल विमेन’ या नावाने प्रसिद्ध झाली असून त्यात मर्केल (वय ६५) प्रथम क्रमांकावर आहेत.

◾️युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या प्रमुख ख्रिस्तिना लॅगार्ड या दुसऱ्या क्रमांकावर, तर

◾️ अमेरिकी प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

◾️बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना २९ व्या क्रमांकावर आहेत.

◾️सीतारामन  ३४ व्या क्रमांकावर असून📌 त्या भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत.

◾️यापूर्वी इंदिरा गांधी यांनी अगदी कमी काळ अर्थमंत्रीपद सांभाळले होते.

◾️फोर्ब्सच्या या यादीत गेट्स फाउंडेशनच्या मेलिंडा गेटस, आयबीएमच्या गिनी रोमेटी, फेसबुकच्या  शेरील सँडबर्ग, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अरडर्न, इव्हान्का ट्रम्प, गायक रिहान व बियॉन्स तसेच टेलर स्विफ्ट, टेनिस पटू सेरेना विल्यम्स, हवामान कार्यकर्ती  ग्रेटा थनबर्ग यांचाही समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...