Sunday, 15 December 2019

जमैकाची टोनी अॅन सिंह 'मिस वर्ल्ड २०१९'

◾️मिस जमैका टोनी अॅन सिंह हिने '' 'मिस वर्ल्ड २०१९ चा किताब पटकावला आहे.

◾️ युकेतील लंडनमध्ये ही ६९ वी मिस वर्ल्ड स्पर्धा पार पडली. एकूण ११४ स्पर्धकांमध्ये टोनीने बाजी मारली.

◾️ माजी विश्वसुंदरी २०१८ वेनेसा पोन्स हिने टोनी हिला मानाचा मुकूट चढवला.

◾️उत्तम गायिका असणाऱ्या २३ वर्षीय मॉडेल टोनी हिनं सुरुवातीपासून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

◾️टोनी-अॅन ही फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी आहे.

◾️ती वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तिने कॅरेबियन स्टुडंट असोसिएशनची अध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे.

◾️ ती गायिका देखील आहे.

◾️टोनी महिलांचा अभ्यास आणि मानसिकता याचा अभ्यास करत आहे.

◾️मिस वर्ल्डच्या अधिकृत संकेतस्थळावर लिहिलंय, 'फावल्या वेळेत गाणं, पाककला, व्लॉगिंग करायला टोनीला आवडतं. ती क्लासिकल ऑपेराही गाते.'

◾️आपलं स्वप्न साकार करण्यात आईचा मोठा हातभार असल्याचं टोनीनं सांगितलं.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...