Tuesday, 24 December 2019

संरक्षणप्रमुख पदाला मंत्रिमंडळाची मंजुरी

◾️तीनही संरक्षण दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी संरक्षण प्रमुख ( चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) हे नवे पद निर्माण करण्याच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली.

◾️संरक्षणविषयक मंत्रीगटाने हा  प्रस्ताव सादर केला होता. संरक्षण प्रमुख हे सरकारचे प्रमुख संरक्षण सल्लागारही असतील.

◾️१९९९ मध्ये कारगिल युद्धानंतर  संरक्षण दलांच्या फेरआढावा समितीने संरक्षण प्रमुख या पदाची निर्मिती करण्याची शिफारस केली होती.

◾️संरक्षण प्रमुख ही चार तारे असलेल्या जनरलच्या बरोबरीची श्रेणी असेल.

◾️लष्कर, नौदल आणि हवाई दल या तीनही दलांमध्ये
📌 समन्वय साधणे,
📌 संरक्षण मंत्रालयाला गरजेनुसार सल्ला देणे,
📌 संरक्षणविषयक वित्तीय मुद्दय़ावर सल्ला देणे ही कामे त्यांना करावी लागतील. 
📌 तीन दलांच्या संयुक्त कारवाईचा निर्णय घेण्याचा अधिकारही त्यांना असेल.

📚✍ पदनिर्मितीचे लाभ

◾️ तीनही दलांच्या निर्णयप्रक्रियेत सुसुत्रता येईल. एकत्रित निर्णय घेतले जातील.

◾️ युद्धनीती, संरक्षणविषयक सामुग्रीची खरेदी, सरकारी प्रक्रियेवर एका व्यक्तीचे नियंत्रण राहील.

◾️ संरक्षण दल प्रमुख तीनही दलांचा सेनापती असेल.

◾️ तीनही दलांच्या प्रमुखांच्या समितीचे अध्यक्षपदही संरक्षण प्रमुखाकडे असेल.

👆 संरक्षण प्रमुखांकडे लष्करी कमांडची जबाबदारी नसेल.

📚✍ पदाच्या अटी

◾️ चार स्टार जनरलचा दर्जा असेल.

◾️निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद भूषवता येणार नाही.

◾️ निवृत्तीनंतर पाच वर्षांपर्यंत खासगी क्षेत्रात नोकरी करता येणार नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...