३१ डिसेंबर २०१९

ऐश्वर्य तोमर आणि रुद्रांक्ष पाटील यांना सुवर्ण

🔰 गतविजेत्या दिव्यांश सिंग पनवारला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

🔴लक्ष्य चषक नेमबाजी स्पर्धा

🔰 मध्य प्रदेशच्या १८ वर्षीय ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने आर. आर. लक्ष्य चषक अखिल भारतीय निमंत्रितांच्या एअर रायफल नेमबाजी स्पर्धेतील १० मीटर वरिष्ठ गटाचे रविवारी सुवर्णपदक पटकावले.

🔰 वर्षांच्या पूर्वार्धात ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात ऑलिम्पिक पात्रता स्थान निश्चित करण्याची किमया साधणारा ऐश्वर्य पहिल्या १० फैरींमध्ये राजस्थानच्या १६ वर्षीय यश वर्धनपेक्षा पिछाडीवर होता; परंतु १०.७, १०.८ आणि १०.९ असे सातत्याने गुण मिळवणाऱ्या ऐश्वर्यने एकूण २५२.३ गुणांसह विजेतेपदावर नाव कोरले.

🔰 यशने २५०.७ गुणांसह रौप्यपदक पटकावले, तर हृदय हझारिकाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. गतविजेत्या दिव्यांश सिंग पनवारला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

🔰 कनिष्ठ गटात ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलने २४९.९ गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर पवन अंधारेला (२४९.१ गुण) रौप्यपदक मिळाले. सौरव लगडने कांस्यपदक पटकावले.

🔴 निकाल

🔰 वरिष्ठ गट : १. ऐश्वर्य तोमर (मध्य प्रदेश), यश वर्धन (राजस्थान), ३. हृदय हझारिका (लक्ष्य, नवे पनवेल)

🔰कनिष्ठ : १. रुद्रांक्ष पाटील (ठाणे), २. पवन अंधारे (लक्ष्य, वाशी), ३. सौरव लगड (लक्ष्य, नवे पनवेल)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

प्रमुख नद्या आणि त्यांच्या उपनद्या

══════════════════════ ❀【गंगा】 1. गोमती 2. घाघरा 3. गंगा 4. कोसी 5. यमुना 6. पुत्र 7. रामगंगा ❀【यमुना】 1. चंबळ 2. सिंध 3. बेटवा 4. केन 5. टन...