Friday, 20 December 2019

चालू घडामोडी (जाने. २०१९ ते मार्च २०१९) खेलो इंडिया २०१९:-

* दुसऱ्या खेलो इंडिया २०१९ या स्पर्धा ९ जानेवारी ते २० जानेवारी २०१९ या दरम्यान पुणे येथे पार पडल्या
* स्पर्धेत महाराष्ट्राने ८० सुवर्णपदकासह २१३ पदके पटकावत पदकतालिकेत प्रथम स्थान पटकावले. गेल्या वर्षी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत ३६ सुवर्णपदक पटकावत दुसरे स्थान पटकावले होते
* २०१९च्या स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वाधिक १८ सुवर्णपदके पटकावली ती जलतरणात
पदक तालिका :-
राज्याचे नाव सुवर्ण रौप्य कास्य एकूण
महाराष्ट्र       ८५     ६२      ८१    २२८
हरियाणा      ६२      ५६      ६०    १७८
दिल्ली         ४८      ३७      ५१     १३६
-------------------------------------------------
● खेलो इंडिया:-
• भारतातले गुणवान खेळाडू शोधून काढण्यासाठी खेलो इंडिया स्कूल गेम्स ही सर्वात मोठी योजना आहे.या योजनेत भारतासाठी पदकांची कमाई करू शकतील अशा १५०० मुलांना केंद्र सरकार दर वर्षी सामावून घेत आहे .या गतीने २०२८ पर्यंत भारताकडे ऑलिम्पिकला भारताचे प्रतिनिधीत्व करू शकतील असे 15 हजार खेळाडू तयार होतील.ही संख्या इतकी मोठी आहे की,२०२८ पर्यंत भारत क्रीडा क्षेत्रात महासत्ता बनून २०२८ हे ऑलीम्पिकमध्ये भारताचे वर्ष असू शकेल .
• २०१८ यावर्षी दिल्ली मध्ये खेलो इंडिया स्कूल गेम्स आयोजित केले होते.पहिल्याच स्पर्धेमध्ये ३५०० शाळकरी मुलांनी भाग घेतला .
• २०१९ मध्ये हे गेम्स फक्त शालेय स्तरापर्यंत मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती वाढवून ते युथ गेम्स केले आहेत .आता महाविद्यालये तसेच विद्यापीठीय विध्यार्थी त्यातील २१ वर्षाखालील गटात भाग घेवू शकतात त्यामुळे या वर्षी स्पर्धकांची संख्या ७ हजारावर गेली आहे .या स्पर्धेत एकूण १८ क्रीडा प्रकार आहेत
• २०१९ मध्ये या स्पर्धा ९ ते २० जानेवारी दरम्यान पुणे येथे होणार आहे
• या स्पर्धेमधून निवडलेले १५०० क्रीडापटू खेलो इंडिया स्कॉलर बनतात .त्यांना पुढील ८ वर्षासाठी प्रशिक्षण ,क्रीडा ,साहित्य ,अन्न निवास आदि खर्चासाठी वर्षाला ५ लाख रु.दिले जातात,वरखर्चासाठी दरमहा १० हजार रु.दिले जातात
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

No comments:

Post a Comment

Latest post

चलेजाव आंदोलन (१९४२)

▪️घटनाक्रम ― क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठ...