👉🏻_ सत्तेचा दुरुपयोग केल्याच्या आरोपावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या विरोधात कनिष्ठ सभागृह असलेले मध्ये झालेल्या ऐतिहासिक मतदानाद्वारे महाभियोग प्रस्ताव मंजूर झाला. आता ट्रम्प यांना सत्तेवरून हटवण्यासाठी उच्च सभागृह असलेल्या सेनेटमध्ये महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
विरोधी पक्ष असलेल्या डेमॉक्रेटिक पक्षाचे बहुमत असलेल्या हाउस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये महाभियोगाच्या बाजूने २३० आणि विरोघात १९७ मते पडली. अशा प्रकारे ज्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांविरोधात महाभियोग चालला, त्या राष्ट्राध्यक्षांमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे तिसरे राष्ट्राध्यक्ष आहेत. महाभियोग प्रस्तावा मंजुरी मिळणे ट्रम्प यांना मोठा धक्का मानला जात आहे.
👉🏻_ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सन २०२० च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत संभाव्य प्रतिद्वंदी जो बिदेन यांना हानी पोहोचवण्यासाठी युक्रेनमधून मदत घेतली आणि त्या बदल्यात त्या देशाला अमेरिकेकडून वेगळ्या स्वरूपात मदत दिली. या मुळे अमेरिकेची प्रतिमा मलीन झाली. याला जबाबदार ट्रम्प आहेत असा त्यांच्यावर आरोप आहे.
👉🏻_ डोनाल्ड ट्रम्प यांच्यापूर्वी अमेरिकेच्या दोन राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात महाभियोगाची कार्यवाही करण्यात आली होती. सन १८६८ मध्ये अँड्र्यू जॉन्सन आणि सन १९९८ मध्ये बिल क्लिंटन यांच्याविरोधात महाभियोग चालवण्यात आला होता. मात्र हे दोन्ही नेते आपली खुर्ची वाचवण्यात यशस्वी ठरले होते. या व्यतिरिक्त, रिचर्ड निक्सन यांनी आपल्या विरोधात महाभियोगाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच आपल्या पदचा राजीनामा दिला होता.
No comments:
Post a Comment