Monday, 23 December 2019

जागतिक उत्तेजक प्रकरणांत २०१७ मध्ये १३ टक्क्यांनी वाढ

✍‘वाडा’च्या अहवालात भारताचा क्रमांक सातवा

◾️आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील उत्तेजक चाचणीत दोषी खेळाडूंच्या आकडेवारीत २०१७मध्ये आधीच्या वर्षांपेक्षा १३ टक्क्यांनी वाढ झाल्याचे जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) अहवालात म्हटले आहे.

◾️२०१६मध्ये उत्तेजक प्रतिबंधक नियमावलीचे १५९५ खेळाडूंनी उल्लंघन केले होते, तर २०१७मध्ये १८०४ खेळाडूंनी उत्तेजकांचे सेवन केल्याचे सिद्ध झाले आहे, अशी माहिती माँट्रिअल स्थित एका संस्थेने अभ्यासांतर्गत दिली आहे.

◾️२०१७मध्ये ११४ देशांच्या आणि ९३ क्रीडा प्रकारांमध्ये उत्तेजकांचे सेवन केल्यामुळे खेळाडू दोषी सापडले आहेत.

◾️रशियाचा क्रमांक या यादीत पाचवा लागतो.

◾️ ‘वाडा’ने १० डिसेंबरला रशियावर चार वर्षे बंदी घातली आहे.

◾️त्यामुळे २०२०चे टोक्यो ऑलिम्पिक आणि २०२२मध्ये कतारला होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत रशियाला सहभागी होता येणार नाही.

✍ इटलीचे खेळाडू अग्रेसर

🔘उत्तेजक चाचणीत दोषी खेळाडूंमध्ये
📌 इटलीचे खेळाडू (१७१)
📌 फ्रान्स (१२८), 
📌 अमेरिका (१०३),
📌  ब्राझील (८४) आणि
📌 रशिया (८२) यांचा क्रमांक लागतो.  ‘वाडा’च्या अव्वल १० देशांच्या यादीत चीन, भारत, बेल्जियम, स्पेन आणि दक्षिण आफ्रिका यांचाही क्रमांक लागतो.

✍शरीरसौष्ठवपटूंचा सर्वाधिक समावेश

◾️उत्तेजक प्रतिबंधक नियमावलीचे उल्लंघन करणारे सर्वाधिक २६६ खेळाडू हे
📌शरीरसौष्ठवमधील आहेत. त्यानंतर 📌अ‍ॅथलेटिक्स (२४२) आणि
📌सायकलिंग (२१८) यांचा क्रमांक लागतो. फुटबॉल आणि रग्बी हे अनुक्रमे सहाव्या आणि आठव्या स्थानावर आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...