Tuesday, 17 December 2019

खनिजद्रव्य व त्याचे उपयोग

🎆 शरीरातील प्रक्रियेचे नियंत्रण व संरक्षण करण्याकरिता शरीराला खनिजाची गरज असते.

🎆 आपल्या शरीराची निगा राखण्यामध्ये खालील खनिजे महत्वाचे आहेत.

🌠 खनिज - फॉस्फरस 🌠

🎆 उपयोग - दातांच्या आणि हाडांच्या विकासासाठी.

🎆 अभावी होणारे परिणाम – हायपो-फॉस्फटेमिया - यात रक्तातील फॉस्फरस चे प्रमाण कमी होते. त्यामुळे ऊर्जानिर्मिती वर परिणाम होतो. तसेच हाडे ठिसुळ होतात, चयापचय क्रियेत अडथळे निर्माण होतात अशक्तपणा, स्नायूंचे कुपोषण, रक्तक्षय  इ परिणाम.

🎆 अतिसेवनाने होणारे परिणाम – हायपर-फॉस्फटेमिया - यात रक्तातील फॉस्फरस चे प्रमाण वाढते. त्यामुळे अतिअवटुता तसेच वृक्कनाश होऊ शकतो.

🎆 स्रोत - शेंगा, काजू, बदाम, घेवडा, गाजर, अळंबी, मांस, मासे, ब्रेड, तांदूळ, अंडी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, तसेच हिरव्या पालेभाज्या.

🌠 खनिज – पोटॅशियम 🌠

🎆 उपयोग – चेतापेशीच्या पोषणाकरिता

🎆 अभावी होणारे परिणाम – हायपो-कॅलेमिया यामुळे रक्तातील पोटॅशियम चे प्रमाण कमी होते, स्नायूंना अशक्तपणा, पॅरालिसिस, चेतापेशीवर परिणाम होतो

🎆 अतिसेवनाने होणारे परिणाम – हायपर-कॅलेमिया - रक्तातील पोटॅशियम चे प्रमाण वाढते. त्यामुळे स्नायूंना अशक्तपणा, नाडीचे ठोके वाढणे, हृदयविकार, अडीसन्सचा रोग इ. परिणाम आढळतात.

🎆 स्त्रोत – सुकी फळे, कडधान्ये, बटाटे, केळी, पपई, तीळ, घेवडा, तृणधान्ये, सोयाबीन, पालक, रताळ, हळद इ.

🌠 खनिज – कॅल्शियम 🌠

🎆 उपयोग – हाडे, दात, रक्त, मज्जातंतू व हृदय यांच्या पोषणाकरिता

🎆 अभावी होणारे परिणाम – हाडे कामकूवत व नरम होतात. कॅल्शियमच्या अभावी ऑस्टीओमॅलेशिया हा विकार होतो.

🎆 स्त्रोत – तीळ व पालेभाज्या

🌠 खनिज – लोह 🌠

🎆 उपयोग – रक्त संवर्धन व हिमोग्लोबिनच्या पोषणाकरिता, ऑक्सीजन व हिमोग्लोबीन याचा संयोग घडवून आणते व प्रतिरोध संस्थेला मदत करते.

🎆 अभावी होणारे परिणाम – लोहाच्या कमतरतेचा परिणाम हिमोग्लोबिनवर होतो. लोहाच्या अभावी रक्तक्षय व पंडूरोग होतो.  

🎆 स्त्रोत – मांस, मासे, अंडी, सी फूड, यकृत, सोयाबीन, सुका मेवा, गूळ-शेंगदाणे, घेवडा, पालक, खजूर, मनुके, तीळ, हळद, हिरव्या पालेभाज्या व मेथीची भाजी

🌠 खनिज – तांबे 🌠

🎆 उपयोग – हिमोग्लोबिनचे संवर्धन करणे
1"
🎆 अभावी होणारे परिणाम – तांब्याच्या आभावी हिमोग्लोबिनची निर्मिती होत नाही.

🎆 स्त्रोत – पालेभाज्या

🌠 खनिज – सल्फर 🌠

🎆 उपयोग – प्रथिनांची निर्मिती करणे अस्थी व नखे यांचे आरोग्य

🎆 अभावी होणारे परिणाम – केस, हाडे कमकूवत होतात

🌠 खनिज – फ्लोरिन 🌠

🎆 उपयोग – दातांचे रक्षण करण्याकरिता,

🎆 अभावी होणारे परिणाम – याच्या अभावी दंतक्षय होतो.

🌠 खनिज – सोडीयम 🌠

🎆 उपयोग – रक्तामधील आम्ल व अल्क यांचा समतोल साधला जातो.

🎆 अभावी होणारे परिणाम – रक्तदाबावर परिणाम होतो.  

स्रोत - मीठ

🌠 खनिज – आयोडीन 🌠

🎆 उपयोग – थायराईड ग्रथीच्या पोषणाकरिता

🎆 अभावी होणारे परिणाम – गलगंड नावाचा आजार होतो.

🎆 स्रोत - आयोडिनयुक्त मीठ

🌠 खनिज - मॅग्नेशियम 🌠

🎆 उपयोग : ATP रेणूच्या निर्मितीमध्येतसेच हाडांच्या विकासासाठी

🎆 अभावी होणारे परिणाम – हायपो-मॅग्नेशिया - यामध्ये अशक्तपणा, स्नायूंना पेटके, हृदयाच्या कार्यात अडथळा, चिडचिड, अतिताण, धनुर्वात इ परिणाम

🎆 स्रोत - सोयाबीन, कोकोआ, शेंगदाणे, पालक, टोमॅटो, घेवडा, अद्रक, लवंग, पालेभाज्या इ.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 1 जानेवारी 2025

1) ADR संस्थेच्या अहवालानुसार देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे ठरले आहेत. 2) ADR संस्थेच्या अहवालानुसार देशात ममता बॅन...