- जापानचे मासात्सुगू असाकावा ह्यांची आशियाई विकास बँक (ADB) याच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.
- ताकेहिको नाकाओ ह्यांच्या जागी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
- मासात्सुगू असाकावा हे आशियाई विकास बँकेचे 10 वे अध्यक्ष असणार. ते 17 जानेवारी 2020 रोजी पदभार सांभाळतील.
- सध्या ते जापानचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांचे विशेष सल्लागार म्हणून काम करीत आहेत.
▪️आशियाई विकास बँक (ADB)
-- आशियाई विकास बँक (ADB) ही एक प्रादेशिक विकास बँक आहे,
- ज्याची स्थापना दि. 19 डिसेंबर 1966 रोजी आशियाई देशांमधल्या आर्थिक विकास प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्याच्या हेतूने केली गेली.
- मंडालुयोंग (मनिला, फिलीपिन्स) येथे त्याचे मुख्यालय आहे.
- “फाइटींग पॉव्हर्टी इन एशिया अँड द पॅसिफिक” हे ADBचे घोषवाक्य आहे. त्याचे 68 देश सभासद आहेत.
--------------------------------------------------
No comments:
Post a Comment