Thursday, 5 December 2019

मासात्सुगू असाकावा: आशियाई विकास बँकेचे (ADB) नवे अध्यक्ष

- जापानचे मासात्सुगू असाकावा ह्यांची आशियाई विकास बँक (ADB) याच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.

-  ताकेहिको नाकाओ ह्यांच्या जागी ही नियुक्ती करण्यात आली आहे.

- मासात्सुगू असाकावा हे आशियाई विकास बँकेचे 10 वे अध्यक्ष असणार. ते 17 जानेवारी 2020 रोजी पदभार सांभाळतील.

- सध्या ते जापानचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांचे विशेष सल्लागार म्हणून काम करीत आहेत.

▪️आशियाई विकास बँक (ADB)

-- आशियाई विकास बँक (ADB) ही एक प्रादेशिक विकास बँक आहे,

- ज्याची स्थापना दि. 19 डिसेंबर 1966 रोजी आशियाई देशांमधल्या आर्थिक विकास प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्याच्या हेतूने केली गेली.

- मंडालुयोंग (मनिला, फिलीपिन्स) येथे त्याचे मुख्यालय आहे.

- “फाइटींग पॉव्हर्टी इन एशिया अँड द पॅसिफिक” हे ADBचे घोषवाक्य आहे. त्याचे 68 देश सभासद आहेत.
--------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...