Tuesday, 31 December 2019

💐☺️🙏 इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐🙏 यशवंत, कीर्तिवंत बुद्धिवंत व्हा...☺️💐

    मित्रांनो अनुचित,टाळाटाळ वगैरे झालं गेलं सर्व विसरा अजूनही वेळ गेलेली नाही . एक महिना गेलाय पण पुढे येणाऱ्या इतर महिन्यात त्याची पूर्तता करणाऱ्या रात्री शिल्लक आहेत.....
बस हीच वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची.. तुमच्यात खरच काहीतरी करण्याची जिद्द असेल तर आजच कामाला लागा.
दिवस असो वा रात्र तुम्हाला दोन्हीही सारखेच असतात हे विसरू नका..
त्यामुळे स्टडी फक्त दिवसाचं करायला हवा असही बंधन नाही..
     योग्य आरोग्यासाठी 5 तास झोप भरपूर असे तज्ञ सांगतात... पण कीर्ती गाजवून गेलेत कीर्तिवंत झाले... त्यांचा इतिहास मात्र वेगळाच आहे.. त्यांनी 5 तसाच बंधन कधीच पळल नाही....☺️
सांगायचं उद्देश एवढाच की असे स्टडी करा की... " रात्री झोपताना, उठतांना, रस्त्याने चालताना,जेवतांना इथपर्यंत की बाथ - टॉयलेट ला जातांना सुध्दा ☺️☺️ आपल्या डोक्यात फक्त आणि फक्त स्टडीतील विविध चॅप्टर,..... असे विविध विचार यायला हवेत तरच तुम्ही seriously अभ्यास करत आहात... व नक्कीच हा प्रत्येक टॉपर बरोबर घडलेला किस्सा असतो.. पण लाजेने ते सांगत नाही.. एवढं स्वतःला झोकु द्या.
लक्षात ठेवा कर्मचारी वा अधिकारी होण्याची हीच खरी कसोटी....
स्टडी कसा करायचं तो तुमचं तुम्ही ठरवा पण त्याला वेळेची मर्यादा नको अस मला म्हणायचंय.....
तर चला लागा तयारीला....
बस आणि बस अभ्यास एके अभ्यास.☺️

कदाचित सर्वांना हे पटणार नाही पण 90% हेच सत्य आहे व निर्विवाद आहे.
                धन्यवाद....☺️💐💐🙏

🍀 आपली योग्य इच्छा याच वर्षात पूर्ण होवो अशीच ईश्वर चरणी प्रार्थना💐☺️
               

चालु घडामोडी वन लाइनर्स, 31 डिसेंबर 2019.


🔶 अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित

🔶  उदयन माने टाटा स्टील टूर चँपियनशिप जिंकली

🔶 आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाने नवीन स्टार 'शारजाह' नावे दिली

🔶  स्पाइसजेट एअरलाईन भागीदार होण्यासाठी एफओआर खेळो इंडिया यूथ गेम्स

🔶 अंतराळवीर क्रिस्टीना कोचने वूमनद्वारे सर्वात लांब सिंगल स्पेसफ्लाइटसाठी विक्रम रचला

🔶  2026 मध्ये जर्मनी चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनू शकेल असा भारत अहवाल देऊ

🔶 रतन टाटा आणि गौतम अदानी हे भारतातील अव्वल दहा सर्वात लोकप्रिय व्यवसायिक टायकोन्स आहेत

🔶 आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ताज्या पॉईंट्स टेबलमध्ये भारत अव्वल

🔶 आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाने दुसरे स्थान पटकावले

🔶 वेस्ट हॅम व्यवस्थापक म्हणून डेव्हिड मोयेसची पुन्हा नियुक्ती करा

🔶 53 व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिपची सुरूवात छत्तीसगड येथे झाली

🔶 न्यायमूर्ती दीपक वर्मा यांनी डीडीसीएच्या नवीन लोकपालची नेमणूक केली

🔶 ऑस्ट्रेलियाच्या पीटर सिडलने आंतरराष्ट्रीय सेवानिवृत्तीची घोषणा केली

🔶 इंडियन नेव्ही बॅन स्मार्टफोन, सोशल मीडिया ऑन बेसेस, जहाजे

🔶 आयर्लँडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी महाराष्ट्रात त्यांच्या पूर्वज गावाला भेट दिली

🔶 लेब्रोन जेम्सने एपी पुरुष अ‍ॅथलीट ऑफ द दशकाचे नाव दिले

🔶 रेप्टर्सना कॅनेडियन प्रेसच्या टीम ऑफ द इयर म्हणून नाव देण्यात आले

🔶 इलेराजा यांना प्रतिष्ठित हरिरावरासनम पुरस्काराने सन्मानित

🔶 सिंगापूर 5 वी आशिया पॅसिफिक हेल्थकेअर समिट 2020 चे आयोजन करणार आहे

🔶 हैदराबाद 12 वी आशिया-पॅसिफिक मायक्रोस्कोप कॉन्फरन्स 2020 चे आयोजन करणार आहे

🔶 अजितदादांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून निवड केली

🔶 बिपीन रावत यांना भारताचे पहिले संरक्षण संरक्षण कर्मचारी म्हणून नाव देण्यात आले

🔶 जेम्स अँडरसन १५० कसोटी सामने खेळणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला

🔶 इंडिगो दररोज १,५०० उड्डाणे करण्यासाठी ऑपरेटिंग करणारा पहिला भारतीय कॅरियर बनला आहे.

Monday, 30 December 2019

चालू घडामोडी

▪ भारतीय अर्थव्यवस्था 2026 पर्यंत चौथ्या स्थानी असेल; ब्रिटनच्या सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड बिझनेस रिसर्च संस्थेचा अंदाज

▪ चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत देशातील 50 उद्योजकांनी 59 हजार 600 कोटींच्या कर्जाची केली परतफेड

▪ सीएए, एनपीआरबाबत सकारात्मक चर्चा आवश्यक : उपराष्ट्रपती, निदर्शनांमध्ये हिंसाचाराला स्थान नाही

▪ मोदींनी उद्योगस्नेही सुधारणा अर्ध्यावर सोडल्याने अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम : अर्थतज्ज्ञ सोरमन

▪ वाहतूक नियमांचा भंग केल्याबद्दल उत्तर प्रदेश वाहतूक पोलिसांनी प्रियंका गांधी यांना मागे बसवून घेऊन जाणाऱ्या दुचाकी मालकाला 6300 रुपयांचा दंड

▪ एनपीआर’च्या माहितीचा ‘एनआरसी’साठीही उपयोग; केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांचा दावा; राज्यांची परवानगी घेण्याची तरतूद

▪ महाराष्ट्रातील महाआघाडीच्या सरकारचा आज (दि.30) मंत्रिमंडळ विस्तार; तिन्ही पक्षांचे एकूण 36 मंत्री घेणार शपथ

▪ काश्मीर प्रश्नावर ‘ओआयसी’ची सौदी अरेबियाच्या पुढाकाराने बैठक; पाकिस्तानचा अनुनय करण्याचा प्रयत्न

▪ महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ : भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी बनली विश्वविजेती; चीनच्या लेई टिंगजीचा टायब्रेकर मालिकेत पराभव

▪ ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'दादासाहेब फाळके पुरस्कार' प्रदान

विद्यार्थी मित्रांसाठी प्रश्नसंच "Current Affairs - 31/12/2019"


1)कोण अंतराळात सर्वाधिक दिवस वास्तव्य करणारी महिला ठरली?
(A) जेसिका मीएर
(B) अ‍ॅन मॅक्लेन
(C) सॅली राइड
(D) क्रिस्टीना कोच

2)"ड्रीम्स ऑफ ए बिलियन: इंडिया अँड ऑलिम्पिक गेम्स" हे पुस्तक _ ह्यांनी लिहिले.
(A) चेतन भगत
(B) पी. टी. उषा
(C) उसेन बोल्ट
(D) बोरिया मजूमदार

3)कोण रॅपिड बुद्धिबळ प्रकारात 2019 या वर्षाची महिला विश्वविजेती ठरली?
(A) ली तिंगजी
(B) कोनेरू हंपी
(C) एकटेरिना अतालिक
(D) प्रियदर्शिनी मलिक

4)कोणत्या व्यक्तीला 'ज्युनियर फ्रीस्टाइल रेसलर ऑफ द ईयर 2019' घोषित करण्यात आले आहे?
(A) दिपक पुनिया
(B) विकास विश्नोई
(C) श्याम सुंदर पटेल
(D) यश वीर मलिक

5)कोणत्या व्यक्तीच्या हस्ते रायपूरमध्ये राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवाचे उद्घाटन झाले?
(A) राहुल गांधी
(B) नरेंद्र मोदी
(C) व्यंकय्या नायडू
(D) राम नाथ कोविंद

6)‘वर्ल्ड इकॉनॉमिक लीग टेबल 2020’ या अहवालानुसार, भारत 5 महादम डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य कधी साध्य करणार?
(A) वर्ष 2025
(B) वर्ष 2024
(C) वर्ष 2026
(D) वर्ष 2022

7)_______ बँकेनी स्थावर मालमत्तेच्या ई-लिलावासाठी मॅजिकब्रिक्स कंपनीसोबत भागीदारी केली.
(A) भारतीय स्टेट बँक
(B) HDFC बँक
(C) अ‍ॅक्सिस बँक
(D) फेडरल बँक

8)भारत सरकार इंडियन ओव्हरसीज बँकमध्ये ___ रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
(A) 5000 कोटी
(B) 4360 कोटी
(C) 5523 कोटी
(D) 6000 कोटी

9)तृतीयलिंगी समुदायासाठी भारतातले पहिले विद्यापीठ कुठे उभारले जाणार आहे?
(A) उत्तरप्रदेश
(B) हिमाचल प्रदेश
(C) तामिळनाडू
(D) तेलंगणा

10)कोणत्या व्यक्तीला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार 2019’ मिळाला?
(A) शाहरुख खान
(B) अमिताभ बच्चन
(C) अमीर खान
(D) रजनीकांत

10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

1) 2019 साली गुगल सर्च इंजिनवर भारतातले सर्वाधिक शोधले जाणारे उद्योगपती कोण?
उत्तर : रतन टाटा

2) ‘भारतीय आर्थिक संघ’ (IEA) याच्या 102 व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन कुणाच्या हस्ते झाले?
उत्तर : उपराष्ट्रपती वेंकैया नायडू

3) ओडिशा राज्याच्या कोणत्या जिल्ह्यात नवीन LPG बॉटलिंग प्लांट उभारण्यात आला?
उत्तर : बालांगीर

4) ‘डिफएक्सपो 2020’ या प्रदर्शनीसाठी एका अॅप्लिकेशनचे अनावरण कोणत्या मंत्रालयाकडून झाले?
उत्तर : संरक्षण मंत्रालय

5) UIDAI संस्थेनी केलेल्या घोषणेनुसार, किती लोकांकडे आधार पत्र आहे?
उत्तर : 125 कोटी

6) कोणत्या राज्यात ‘डबल स्टॅक ट्रेन’ची पहिली चाचणी घेण्यात आली?
उत्तर : हरयाणा

7) डिसेंबर 2019 मध्ये निधन झालेले विकास सबनीस हे कोण होते?
उत्तर : राजकीय व्यंगचित्रकार

8) फानफोन चक्रीवादळ कोणत्या देशाला धडकले?
उत्तर : फिलीपिन्स

9) कोणत्या देशाने त्यांचे पहिले हायपरसोनिक आण्विक क्षेपणास्त्र तैनात केले?
उत्तर : रशिया

10) प्रथम ‘मंडू महोत्सव’ कुठे आयोजित करण्यात आले?
उत्तर : मध्यप्रदेश

देशातील वनक्षेत्र वाढले; कर्नाटक, आंध्र आणि केरळात सर्वाधिक वाढ

◾️देशातील वनक्षेत्रात आणि वृक्षाच्छादित क्षेत्रात ५१८८ चौरस किलोमीटरने वाढ झाली असून, खारफुटीचे क्षेत्रफळदेखील वाढल्याचे ‘इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट-२०१९’ या वनसर्वेक्षण अहवालातून दिसून आले आहे.

◾️केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते वन सर्वेक्षण अहवालाचे आज प्रकाशन झाले.

◾️जगात मोजक्‍या देशांमध्ये वनक्षेत्र वाढले असून, त्यात भारताचाही समावेश आहे.

◾️२०१४ ते २०१९ पर्यंत १३ हजार चौरस किलोमीटरहून अधिक वनक्षेत्र वाढले आहे.

◾️देशात आजमितीस वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादित क्षेत्र ८०.७३ दशलक्ष हेक्‍टरवर पोचले आहे.

◾️देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत हे प्रमाण २५.५६ टक्के आहे.

◾️भारतात घनदाट जंगल, मध्यम आणि खुले जंगलाचे क्षेत्रफळही वाढले आहे.

◾️देशात सर्वाधिक वनक्षेत्र
📌 मध्य प्रदेश,
📌 अरुणाचल प्रदेश,
📌 छत्तीसगड,
📌 ओडिशा आणि
📌 महाराष्ट्र
या राज्यांमध्ये आहे.

◾️ कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहे.

◾️वृक्षाच्छादित क्षेत्र वाढण्यात महाराष्ट्राची कामगिरी महत्त्वाची आहे.

◾️आंबा, बोरी आणि डाळिंबाची दरवर्षी एक कोटी झाडे लावली जातात. ती ९५ टक्के वाढतात.

◾️ही योजना लागू होऊन १८ वर्षे झाली असून, महाराष्ट्रात १८ कोटी झाडे लागली आहेत. याचे अनुकरण अन्य राज्यांनीही करावे, असे आवाहन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या वेळी केले.

◾️सागरी पर्यावरण सांभाळणाऱ्या खारफुटी जंगलांचे क्षेत्रफळ ५४ चौरस किलोमीटरने वाढले आहे.

◾️देशात एकूण खारफुटीचे जंगल ४९७५ चौरस किलोमीटर झाले आहे. २०१७ च्या तुलनेत वाढ झाली असल्याकडेही जावडेकर यांनी लक्ष वेधले. 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मार्च महिन्यापर्यंत कोल्हापूर आणि नांदेडमध्ये सुरु होणार DNA लॅब

👉पुढच्या वर्षीपासून सायबर गुन्हे व हत्या, लैंगिक अत्याचार व पितृत्व तपासणी, सारख्या प्रकरणांमध्ये न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा आपला अहवाल लवकर देऊ शकतील. त्यामुळे पोलिसांच्या तपासाला गती मिळेल, गुन्ह्यांची उकल लवकर होईल व कोर्ट सुद्धा गतीने न्यायदान करू शकेल.

👉आता महाराष्ट्रात असलेल्या आठ न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा पैकी फक्त दोन ठिकाणी, म्हणजे कोल्हापूर व नांदेड येथे डीएनए प्रयोगशाळा नाहीये. परंतु येत्या वर्षात साधारणपणे मार्च महिन्यापर्यंत, या दोन्ही ठिकाणी हे विभाग सुरू करण्यात येतील.

👉राज्यात दरवर्षी साधारणपणे सोळा हजार प्रकरणे डीएनए तपासणीसाठी पाठवण्यात येतात. यात बलात्कार, लैंगिक अत्याचार, पितृत्व परीक्षा, हत्या अशा गुन्ह्यांचा समावेश होतो. काळजीची बाब म्हणजे यात साधारणपणे चार हजारांच्यावर प्रकरणे ही लहान मुलं, बालके व अल्पवयीन यांच्यासोबत घडलेल्या गुन्ह्यांच्या संबंधी असतात.

👉गृहखात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये साधारणपणे ३२०० च्या आसपास अहवाल प्रलंबित आहेत. याचे कारण असे की साधारणपणे एक अधिकारी महिन्याला पंचवीस ते तीस प्रकरणच निकाली काढू शकतो. या कामाचे स्वरूप साधारणपणे असेच आहे.

👉राज्य शासनाने या वर्षी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे २६  कोटी खर्च करून कोल्हापूर व नांदेड येथे डीएनए तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यात येतील. त्याच बरोबर, इतर सहा ठिकाणी नवीन मशीन स्थापन करून त्यांचा वापर फक्त प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शअल ऑफेंसेस ॲक्ट म्हणजे पॉक्सोशी निगडीत गुन्ह्यांच्या तपासणीसाठी करण्यात येईल. या साठी केंद्रशासनाने रुपये५३.७० कोटीचा निधी राज्य शासनाला मंजूर केला आहे. ही व्यवस्था येत्या वर्षी सुरू करण्यात येईल.

👉सध्या फक्त मुंबई, पुणे, व नागपूर इथल्या प्रयोगशाळांमध्ये सायबर गुन्हे संबंधित विषयाची तपासणी केली जाते. पण संचालनालयाचा मानस हा इतरही सर्व ठिकाणी सायबर फॉरेन्सिक विभाग सुरू करण्याबाबत आहे. त्याचबरोबर ठाण्याच्या मिनी फॉरेन्सिक सायन्स लॅब मध्ये सुद्धा हा विभाग सुरू करण्यात येईल कारण नोंदवल्या जाणारे एकूण गुन्ह्यांमध्ये ठाणे व पालघर जिल्हा यांचा आकडा मोठा आहे.

👉हा विभाग संगणकाशी संबंधित गुन्हे, जसे हॅकिंग, मेलवरून धमक्या देणे, क्रेडिट कार्ड संबंधी गुन्हे, डेटा ची चोरी, फसवणूक व छायाचित्रातील बदल या अशा गुन्ह्यांचा तपास करतो. महाराष्ट्रात दरवर्षी न्याय सहाय्यक प्रयोगशाळेकडे साधारणपणे ७ हजार सायबर गुन्हे तपासणीसाठी येतात.

👉या सर्व प्रयोगशाळांमध्ये दहा विभाग आहेत. या सर्व विभागांमध्ये दरवर्षी साधारणपणे सव्वादोन ते अडीच लाख प्रकरण तपासणीसाठी पाठवण्यात येतात.

चालू घडामोडी प्रश्नसंच

1)कोण 2019 साली गुगल सर्च इंजिनवर भारतातले सर्वाधिक शोधले जाणारे उद्योगपती आहेत?
(A) रतन टाटा.   √
(B) अजीम प्रेमजी
(C) आनंद महिंद्रा
(D) गौतम अदानी

2)______ या देशाचा ‘लॉन्ग मार्च-5’ प्रक्षेपक विंचिंग अंतराळ केंद्रावरून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला.
(A) उत्तर कोरिया
(B) जापान
(C) चीन.   √
(D) सिंगापूर

3)_____ यांच्यावतीने ‘कवींची राष्ट्रीय परिषद 2020’ आयोजित केली गेली.
(A) दूरदर्शन
(B) ऑल इंडिया रेडियो.   √
(C) द पोयट्री सोसायटी
(D) साहित्य अकादमी

4)सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने गठित केलेल्या ‘आर्थिक सांख्यिकी’ विषयक स्थायी समितीचे अध्यक्ष कोण असणार आहे?
(A) अरविंद पानगरिया
(B) बिबेक डेब्रोय
(C) प्रणब सेन.  √
(D) रजनीश कुमार

5)_____ राज्यातल्या प्रसिद्ध ‘मांडू’ महोत्सवाचा शुभारंभ झाला.
(A) मध्यप्रदेश.  √
(B) छत्तीसगड
(C) ओडिशा
(D) आंध्रप्रदेश

6)भारतीय रिझर्व्ह बँकेनी सर्व मोठ्या सहकारी बँकांना _ रुपयांपेक्षा जास्त बुडीत रकमेची नोंद करण्याचे निर्देश दिले.
(A) 10 कोटी
(B) 6 कोटी
(C) 5 कोटी.  √
(D) 2 कोटी

7)संयुक्त राष्ट्रसंघाने सायबर गुन्हेगारीच्या संदर्भात एका नवीन आंतरराष्ट्रीय कराराचा  मसुदा तयार करण्यास मंजूरी दिली. सायबर गुन्हेगारीच्या संदर्भात खाली दिलेल्यापैकी कोणता पहिला जागतिक करार झालेला आहे?
(A) बुडापेस्ट करारनामा.   √
(B) पालेर्मो करारनामा
(C) मॉस्को करारनामा
(D) रोम करारनामा

8)संयुक्त राष्ट्रसंघाच्या अर्थसंकल्पात प्रथमच 3.07 अब्ज डॉलरच्या निधीसह _ यासाठी निधी समाविष्ट केला गेला आहे.
(A) युद्ध परिस्थितीतल्या गुन्ह्यांचा तपास.   √
(B) ज्ञान निर्मिती मोहीम
(C) मानवतावादी मदत
(D) शांती मोहीम

9)‘अरोमा मिशन’ अंतर्गत गेरॅनियम या औषधी वनस्पतीचे पीक घेण्यास चालना देण्यासाठी कोणत्या संस्थेनी नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे?
(A) CSIR-केंद्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संस्था.   √
(B) CSIR-केंद्रीय औषधी संशोधन संस्था
(C) भारतीय एकात्मिक औषधी संस्था
(D) तेजपूर विद्यापीठ

10)अर्थमंत्री निर्मला सीतारमण ह्यांनी बँकांना संलग्न असलेल्या मालमत्तांचा ऑनलाईन लिलाव करण्यासाठी _ व्यासपीठाचे उद्घाटन केले.
(A) eBक्रय.   √
(B) ईबँक
(C) ईबॅकरे
(D) ईबीड

आंध्रप्रदेश राज्याचे ‘दहशतवाद-रोधी दल’ ......या नावाने ओळखले जाते.
:- ऑक्टोपस.

पाकिस्तान या देशाचे नवनियुक्त सरन्यायाधीश कोण आहेत?
:- गुलजार अहमद. 

QRSAM क्षेपणास्त्राची चाचणी _ या संस्थेनी घेतली.
 :- संरक्षण संशोधन व विकास  संस्था (DRDO)

आसामच्या मंत्रिमंडळाने अशी घोषणा केली आहे की ‘आसामी’ भाषेला राज्य भाषा बनवतील. त्याच्या संदर्भात भारतीय राज्य घटनेतल्या कोणत्या कलमात सुधारणा केली जाणार?
:- कलम 345.

_____ वर्षांपेक्षा जास्तच्या कालावधीनंतर क्युबा या देशाच्या पंतप्रधानपदी मॅन्युएल मरेरो क्रूझ यांची नेमणूक करण्यात आली.
  :- 40. 

कोणती संस्था ‘शाश्वत विकास ध्येये (SDG) भारत निर्देशांक आणि डॅशबोर्ड 2019–20’ याच्या द्वितीय आवृत्तीचे अनावरण करणार आहे?
:- NITI आयोग.

मोठ्या राज्यांच्या गटात कोणते राज्य ‘सुशासन निर्देशांक’मध्ये अव्वल ठरले?
:- तामिळनाडू.

कोणत्या वर्षी ‘भारतनेट’ प्रकल्प राबविण्यास सुरूवात झाली?
:- वर्ष 2011.

26 डिसेंबर या दिवशी कोणत्या व्यक्तीची 120 वी जयंती साजरी केली गेली?
:- शहीद उधम सिंग.

पाकिस्तान या देशाने कोणत्या देशातून ‘पोलिओ मार्कर’ आयात करण्याचा निर्णय घेतला?
:- भारत.

ऐश्वर्य तोमर आणि रुद्रांक्ष पाटील यांना सुवर्ण

🔰 गतविजेत्या दिव्यांश सिंग पनवारला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

🔴लक्ष्य चषक नेमबाजी स्पर्धा

🔰 मध्य प्रदेशच्या १८ वर्षीय ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने आर. आर. लक्ष्य चषक अखिल भारतीय निमंत्रितांच्या एअर रायफल नेमबाजी स्पर्धेतील १० मीटर वरिष्ठ गटाचे रविवारी सुवर्णपदक पटकावले.

🔰 वर्षांच्या पूर्वार्धात ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात ऑलिम्पिक पात्रता स्थान निश्चित करण्याची किमया साधणारा ऐश्वर्य पहिल्या १० फैरींमध्ये राजस्थानच्या १६ वर्षीय यश वर्धनपेक्षा पिछाडीवर होता; परंतु १०.७, १०.८ आणि १०.९ असे सातत्याने गुण मिळवणाऱ्या ऐश्वर्यने एकूण २५२.३ गुणांसह विजेतेपदावर नाव कोरले.

🔰 यशने २५०.७ गुणांसह रौप्यपदक पटकावले, तर हृदय हझारिकाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. गतविजेत्या दिव्यांश सिंग पनवारला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

🔰 कनिष्ठ गटात ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलने २४९.९ गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर पवन अंधारेला (२४९.१ गुण) रौप्यपदक मिळाले. सौरव लगडने कांस्यपदक पटकावले.

🔴 निकाल

🔰 वरिष्ठ गट : १. ऐश्वर्य तोमर (मध्य प्रदेश), यश वर्धन (राजस्थान), ३. हृदय हझारिका (लक्ष्य, नवे पनवेल)

🔰कनिष्ठ : १. रुद्रांक्ष पाटील (ठाणे), २. पवन अंधारे (लक्ष्य, वाशी), ३. सौरव लगड (लक्ष्य, नवे पनवेल)

आयआयटी टेकफेस्टमध्ये ‘आईन्स्टाईन’ रोबो

📌 मुंबई आयआयटीच्या 3 जानेवारीपासून सुरू होत असलेल्या टेकफेस्टमध्ये यावेळी हाँगकाँगमधून येणाऱ्या आईन्स्टाईन रोबो आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.

📌 हॅन्सन रोबोटिक्स यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून या रोबोची निर्मिती केली आहे.

📌 तर त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या समोर उभ्या असणाया व्यक्तीच्या चेहयावरील भावनांना ओळखून समोरील व्यक्तीची भावना तो ओळखू शकतो. व्यक्ती आनंदी, दु:खी, संतप्त, घाबरलेली, गोंधळलेली आहे हे रोबो सांगेल. एवढेच नव्हे तर व्यक्ती स्त्री आहे की पुरुष, त्याचे वय किती याची माहितीही तो देईल.

📌 तसेच या रोबोला 10 लाखांपेक्षा जास्त चेहऱ्यांवरील भावभावना ओळखण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

📌 मुंबई आयआयटीचे टेकफेस्ट यंदा 3 ते 5 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या टेकफेस्टमध्ये 5 जानेवारी रोजी टेकवेडे आईनस्टाईनला भेटू शकतील.

📌 टेकफेस्टमध्ये येणायांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी तो सज्ज झाला आहे. आईन्स्टाईनप्रमाणे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हा रोबो देईल, असा दावा आयोजकांनी केला आहे.

📌 याआधी ह्युमनॉइड सोफिया नावाचा रोबो टेकफेस्टमध्ये सहभागी झाला होता.

📌 तेव्हा सोफियाने ‘नमस्ते इंडिया’ म्हणून मुलाखतीदरम्यान सर्वांचे स्वागत केले होते. सोफियापेक्षा हा रोबो अधिक विकसित आहे. कारण तो केवळ बोलणारच नाही तर भावभावना ओळखून त्याबाबत उपस्थितांशी संवाद साधेल, त्यांना यासंदर्भातील अधिक माहिती देईल, असे आयोजकांनी सांगितले.

📌आईन्स्टाईन व्यक्तीकडे बघून त्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे, त्याच्या भावना ओळखू शकतो. जसे की त्याच्या समोर उभी असलेली व्यक्ती आनंदात आहे की दु:खात हे रोबो ओळखू शकेल. एखाद्या व्यक्तीच्या मनात भीती असेल तर तीदेखील तो अचूक ओळखेल, असे आयोजकांनी सांगितले. सोबतच त्या व्यक्तीचे लिंग, वय अशा बयाच गोष्टी हा रोबो सांगणार आहे. तसे प्रशिक्षणच आईन्स्टाईनला देण्यात आले आहे.

📌 विशेष म्हणजे आईन्स्टाईन हा हाँगकाँगचा रोबो असून तो भारतात पहिल्यांदाच येणार आहे.

सायबर गुन्हे रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय संधीचा मसुदा तयार करण्यासाठी  संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता

- सायबर गुन्हे रोखण्याच्या उद्देशाने एक आंतरराष्ट्रीय संधी करण्यासाठी त्याचा मसुदा तयार करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेनी त्यासंबंधी एक ठराव मंजूर केला आहे.

- हा ठराव रशियाने मांडला. आता सर्व जगाचे प्रतिनिधित्व करणारी एक तज्ञ समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी देशांमध्ये माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानात मदत व्हावी यासाठी पाळावयाच्या शिष्टाचारांचे विस्तृत वर्णन करणार.

- युरोपीय संघ (EU), अमेरिका आणि इतर देशांच्या आक्षेपांवरून संयुक्त राष्ट्रसंघाकडे यासंदर्भात वारंवार मागणी होत आली आहे.

▪️संयुक्त राष्ट्रसंघाची महासभा (UNGA)

- आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना करण्यात आली.

- दुसर्‍या महायुद्धानंतर दिनांक 24 ऑक्टोबर 1945 रोजी या संघटनेची स्थापना करण्यात आली. UNचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे. 

- सध्या या संघटनेचे जगभरात 193 सदस्य देश आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाची महासभा (UNGA) हे संयुक्त राष्ट्रसंघामधल्या सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्वाचा हक्क दिला गेला आहे.
------------------------------------------------