Wednesday, 8 December 2021

भूगोल प्रश्नसंच

1) सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी असल्यास खालीलपैकी कशाचा अवलंब करावा ?
   1) जमीन एका हंगामात पडीक ठेवावी.    2) ठिबक आणि तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करावा.
   3) एका आड एक सरी भिजवावी.      4) वरीलपैकी एकही नाही.
उत्तर :- 2

2) भारत सरकारने पाणी वापराबाबत काही निर्देश ठरवून दिले आहेत ? महाराष्ट्रासाठी कोणती जोडी चुकीची आहे ?
   1) महापालिका क्षेत्र – 135 लिटर दर डोई दर दिवशी
   2) ‘अ’ गटातील नगरपालिका – 170 लिटर दर डोई दर दिवशी
   3) ‘ब’ गटातील नगरपालिका – 100 लिटर दर डोई दर दिवशी
   4) ग्रामीण विभाग – 40 लिटर दर डोई दर दिवशी
उत्तर :- 2

3) पाण्यामध्ये वायू विरघळणे ही क्रिया कोणता सिध्दांत वापरून काढतात ?
   1) डारसीज् सिध्दांत    2) हेनरीज् सिध्दांत
   3) ॲव्होगाड्रोज सिध्दांत     4) वरीलपैकी नाही
उत्तर :- 2

4) पिकांना ओलाव्याचा ताण पडलेल्या कालावधी संरक्षक पाणी देण्यासाठी जनसंचयनाची (वॉटर हार्वेस्टिंग) प्रामुख्याने जी आणखी
     केली जाते त्यास ...................... म्हणतात. 
   1) पावसावरची शेती    2) अपधाव शेती
   3) कोरडवाहू शेती    4) वरील सर्व
उत्तर :- 2

5) अ) समतल बांध पध्दत मुख्यत्वे कमी पावसाच्या प्रदेशात जल संधारणासाठी वापरली जाते.
    ब) ढाळीचे बांध पध्दत जास्त पावसाच्या प्रदेशात जास्त झालेले पाणी बाहेर काढून टाकण्यासाठी वापरली जाते.
         वरील विधानांबाबत खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे  ?
   1) अ बरोबर आणि ब चूक आहे.      2) दोन्ही अ आणि ब बरोबर आहेत.
   3) अ चूक आणि ब बरोबर आहे.      4) दोन्ही अ आणि ब चूक आहे.
उत्तर :- 2

1) योग्य जोडया लावा :
  वायू      वातावरणातील शुष्क प्रमाण भाग प्रती दशलक्ष
         अ) नायट्रोजन (N2)    i) 0.007ppm
         ब) हेलियम (He)    ii)0.5ppm
        क) ओझोन (O3)    iii) 780,840.0ppm
         ड) हायड्रोजन (H2)    iv) 5.2ppm
    अ  ब  क  ड
           1)  ii  i  iii  iv
           2)  iv  iii  ii  i
           3)  i  ii  iv  iii
           4)  iii  iv  i  ii
उत्तर :- 4

2) खालील विधानांचा विचार करा.
   अ) एल. निनो प्रवाहाच्या वेळी दक्षिण प्रशांत महासागरातील पृष्ठाभागावरील तापमानात वाढ होते.
   ब) वर्ष 2013-14 मध्ये भारतामध्ये भीषण दुष्काळ होता आणि त्यावेळी एल निनो प्रवाह प्रबळ होता.
         वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?
   1) फक्त अ    2) फक्त ब    3) अ आणि ब दोन्हीही    4) अ आणि ब दोन्हीही नाहीत
उत्तर :- 3

3) स्क्वेल / चंडवात (पाऊस व हिम वर्षाबरोबर येणारी वावटळ) ही महाराष्ट्रामध्ये दुर्मिळ आहे, परंतु कधी – कधी ...............
     प्रसंगी येते.
   1) किनारपट्टीवर मान्सून पूर्व काळात आणि मान्सून काळादरम्यान अंतर्गत प्रदेशात.
   2) मान्सून काळात किनारपट्टीवर आणि मान्सून पूर्व काळात अंतर्गत प्रदेशात.
   3) मान्सून नंतरच्या काळात किनारपट्टीवर आणि मान्सून काळादरम्यान अंतर्गत प्रदेशात.
   4) मान्सून नंतरच्या काळात किनारपट्टीवर आणि अंतर्गत प्रदेशात.
उत्तर :- 2

4) नॅशनल सेंटर फॉर मोडियम रेंज वेदर फोरकास्टींग (NCMRWF) याची स्थापना .................. साली नवी दिल्लीत झाली.
   1) 1985    2) 1988      3) 1992      4) 1994 
उत्तर :- 2

5) पाणलोट क्षेत्र आधारित जमीन व पाणी संवर्धन योजना मुख्यत: कशावर आधारित असते ?
   1) पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन तंत्रज्ञान
   2) जमीन आणि माती संवर्धन
   3) पिकांचे नियोजन
   4) जमिनीच्या वापराच्या क्षमतेनुसार वर्गवारी करणे
उत्तर :- 1 

1) खालील वातावरणाच्या स्तरांची उंचीनुसार मांडणी करा :
   अ) तपांबर    ब) आयनांबर    क) स्थितांबर    ड) बाह्यांबर
   1) ड, क, ब, अ    2) अ, क, ब, ड    3) अ, ब, क, ड    4) क, ब, अ, ड
उत्तर :- 2

2) सर्वसाधरणपणे उत्सर्जीत सूर्यकिरणांपैकी ................. टक्के सूर्यकिरण पिकाच्या पृष्ठभागावरती शोषले जातात.
   1) 75      2) 79      3) 85      4) 73
उत्तर :- 1

3) जर्मन गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसाहाय्याने ग्रामीण पाणी पुरवठा ‘आपलं पाणी’ प्रकल्प पुढील कोणत्या जिल्ह्यात राबविला
      जात आहे ?
   1) नागपूर-अमरावती-अकोला    2) धुळे-जळगाव-नंदूरबार
   3) सांगली-सातारा-कोल्हापूर    4) पुणे-अहमदनगर-औरंगाबाद
उत्तर :- 4

4) पावसाच्या थेंबामुळे जमिनीचे धुपीवर कोणता मुख्य परिणाम होतो ?
   1) जमिनीच्या कणांची अलिप्तता होऊन त्यामुळे जमिनीची घडण बिघडणे.
   2) पाणी साठयास सुरुवात होणे.
   3) जमिनीतील ओलावा कमी करणे.
   4) जोरात वाहणा-या पाण्यामुळे जमिनीच्या कणांची वाहतुक होते.
उत्तर :- 1

5) पाण्याची वाटप करण्यासंबंधी पाणी पंचायत मॉडेल, विलासराव साळुंखेच्या प्रयत्नाने पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सुरू
     करण्यात आले ?
   1) बारामती    2) खेड      3) पुरंदर      4) मावळ
उत्तर :- 3



No comments:

Post a Comment