Friday, 6 December 2019

भारताची राज्यघटना प्रश्नसंच 7/12/2019

१) खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळते ?

   1) एका विशिष्ट धर्माच्या उत्तेजनासाठी : अनुच्छेद – 26 कर देण्याचे स्वातंत्र्य
   2) धार्मिक व्यवहारांच्या व्यवस्थापनाचे : अनुच्छेद – 27 स्वातंत्र्य

   3) ठराविक शैक्षणिक संस्थामध्ये धार्मिक : अनुच्छेद – 28 शिक्षण किंवा धार्मिक उपासनांना उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य

   4) शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा : अनुच्छेद – 29 आणि त्याचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क

उत्तर :- 3

२) ‘कायद्यापुढील समानता’ (Equality before Law) हा नियम अनिर्बंध नाही. त्याबाबतीत घटनात्मक आणि अन्य अपवाद   आहेत. खालीलपैकी कोणते अनुच्छेद 14 ला अपवाद आहेत ?

   अ) भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काही विशेष हक्क आहेत.

   ब) संसद सदस्य आणि राज्याच्या विधीमंडळाचे सदस्य यांच्याविरुध्द त्यांनी संसदेत अथवा राज्य विधीमंडळात केलेल्या  भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालविता येत नाही.

   क) परदेशी दूत आणि राजनीतीज्ञ यांना फौजदारी दाव्याबाबत विशेष हक्क नाहीत तर केवळ दिवाणी दाव्याबाबत आहेत.

   ड) अनुच्छेद 31 – C हा अनुच्छेद 14 ला अपवाद आहे.

    1) अ, ब आणि क
    2) ब, क आणि ड
   3) अ, ब, क आणि ड 
   4) अ, ब आणि ड

उत्तर :- 4

३).  भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे ?

    1) तिस-या भागात
    2) पहिल्या भागात 
   3) चौथ्या भागात   
   4) दुस-या भागात

उत्तर :- 3

४) भारत सरकार अधिनियम, 1935 मधील ‘सूचनापत्राचा’ समावेश 1950 च्या भारतीय संविधानात कसा केला आहे ?

   1) मूलभूत हक्क   
  2) मार्गदर्शक तत्त्वे   
  3) मूलभूत कर्तव्ये   
  4) केंद्र सूची

उत्तर  :- 2

५) भारतीय राज्यघटनेच्या IV थ्या विभागात 42 व्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणती उपकलमे समाविष्ट करण्यात आली?

   अ) कलम 39 – समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य

   ब) कलम 43 – उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांना सहभाग

   क) कलम 48 – पर्यावरणात सुधारणा आणि जंगले व वन्यजीव यांचे संरक्षण

   1) फक्त अ  
   2) फक्त ब आणि क
   3) फक्त अ आणि क
   4) वरील सर्व

उत्तर :- ४

6) खालीलपैकी कोणते उद्दिष्ट राज्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समाविष्ट नाही ?

   1) गो हत्या थांबविणे.    

   2) कुटिरोद्योगांची स्थापना करणे.

   3) आंतरराष्ट्रीय शांतता वृध्दिंगत करणे.

      4) देहांताची शिक्षा रद्द करणे.

उत्तर:- 4

7) खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वाचे मूलभूत अधिकारात रूपांतर झाले आहे ?

   1) काम करण्याचा अधिकार 
    2) माहितीचा अधिकार
   3) चांगल्या पर्यावरणाचा अधिकार         4) शिक्षणाचा अधिकार

उत्तर :- 4

8) ‘मार्गदर्शक तत्त्वे को-या चेकप्रमाणे आहेत त्यांचे वटविणे बँकेच्या इच्छेवर सोडलेले आहे.’ असे कोणी म्हटले आहे ?

   1) डॉ. बी. आर. आंबेडकर  
   2) प्रो. के. टी. शाह
   3) एन. जी. रांगा    
   4) बी. एन. राव

उत्तर :- 2

9) समान नागरी कायदा निर्माण न होण्यामागील कारणे पुढीलप्रमाणे –
   अ) स्वधर्माचा अवाजवी अभिमान   

   ब) परधर्मियांबाबतची साशंकता

   क) राजकीय इच्छाशक्तीचा अभाव 

    ड) राष्ट्रीय ऐक्यभावनेचा अभाव

   1) अ, ब    2) ब, क  
   3) क, ड      4) अ, ड

उत्तर :- 3

10) राज्यनितीच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या संदर्भात कोणते गुणवैशिष्टय गैरलागू ठरते ?

   1) मूलभूत अधिकारांशी अनुरूप  

2) न्यायालयीन निर्णय योग्य

   3) परविर्तनीय     

  4) कल्याणप्रद

उत्तर :- 2

11) पुढील दोन पैकी कोणते विधान बरोबर आहे ?

   अ) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 23 मध्ये “प्रदूषण मुक्त, स्वच्छ पर्यावरणाची” हक्क अंतर्भूत आहे.

   ब) जर असे पर्यावरण धोक्यात आले तर नागरिकांना संविधानाच्या कलम 34 खाली ते दूर करण्यास्तव हक्क असेल.

   1) अ   
  2) ब    
3) दोन्ही    
4) एकही नाही
उत्तर :- 4

12) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावरील मर्यादा आहेत :

   अ) देशाची सुरक्षा
    ब) न्यायालयांचा अवमान
   क) बदनामी   
  ड) भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता

   1) फक्त अ, ब, क  2) फक्त अ, क, ड    3) फक्त अ, ब, ड    4) वरील सर्व

उत्तर :- 4

13). कोणत्या घटनादुरुस्तीनुसार अनु. जाती / जमाती आणि इतर मागास वर्गासाठी खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये   राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत ?

   1) 92 व्या    2) 93 व्या   
3) 94 व्या    4) 95 व्या

उत्तर :- 2

14) स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याच्या अधिकाराचा समावेश ................. व्या घटनादुरुस्तीने
      करण्यात आला.

   1) 97    
  2) 96    
  3) 95   
  4) 94

उत्तर :- 1

15) खालील विधाने विचारात घ्या :

   अ) ‘राज्य हे सहा वर्षापासून ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देईल’ हा त्यांचा मूलभूत हक्क आहे.

ब) ‘जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या आपल्यास अथवा पाल्यास त्याच्या सहाव्या वर्षापासून ते चौदाव्या  वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे’ हे त्याचे मूलभूत कर्तव्य आहे.

   क) ‘राज्य हे बालकांचे  वय सहा वर्षाचे होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करील’ हे  मार्गदर्शक तत्त्व आहे.
        
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे ?

   1) अ आणि ब    2) ब आणि क 
  3) अ आणि क    4) वरील सर्व

उत्तर :- 4

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...