Friday, 6 December 2019

भारतीय सशस्त्र सेना झेंडा दिवस-7 डिसेंबर

👉आज आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. म्हणजेच भारतीय सशस्त्र सेना झेंडा दिवस. यानिमित्त जाणून घेऊया भारतीय सशस्त्र सेना झेंडा दिवसाबद्दल सर्व काही... 

👉भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सैनिक कल्याणाच्या व्यवस्थापनेसाठी 1949 ला 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र दल ध्वजदिन म्हणून साजरा करण्यात आला.

✅ संकल्पना काय? :

👉नागरिकांना सैनिकांचे स्मरण म्हणून एक छोटा ध्वज भेट द्यायचा आणि त्याच्या बदल्यात नागरिकांकडून देणगी स्वीकारायची.

✅ध्वजनिधी कोण जमा करते? :

👉देशातील जनता, जिल्हा सैनिक बोर्ड शाळा, कॉलेज व सामाजिक संस्था. निधी देणारांना लाल, निळा व गडद निळ्या रंगांमध्ये असलेले फ्लॅग दिले जातात.

✅ दिवस का साजरा केला जातो?:

👉 भारतीय सैनिकांच्या परिवाराच्या कल्याणासाठी.

👉 देशसेवेत असणाऱ्या सैनिकांपैकी निवृत्त होणाऱ्या सैनिकांसाठी.

👉 युद्धांमध्ये शहीद होणाऱ्या सैनिकांच्या परिवाराच्या मदतीसाठी.

👉 देशातील शहीद वीरांच्या श्रद्धांजलीसाठी.

✅ निधी कोठे वापरतात? :

👉 सैनिकी विद्यार्थ्यांचे वसतीगृहे या निधीतून चालविली जातात.

👉 नैसर्गिक आपत्तीच्यावेळी या निधीचा उपयोग केला जातो.

👉 युद्धात अपंगत्व आलेल्या जवानांसाठी या निधीचा उपयोग केला जातो.

👉माजी सैनिकांच्या पुनर्वसनाच्या योजना राबविण्यासाठी ही रक्कम वापरतात.

👉 फ्लॅगचे तीन रंग म्हणजे : जिल्हा सैनिक बोर्ड,
राज्य सैनिक बोर्ड व
केंद्रिय सैनिक बोर्ड यांचे प्रतीक.

✅ दिवस कसा साजरा होतो? :

👉सशस्त्र सेना झेंडा दिवसानिमित्त सैन्यासाठी विशेष कार्यक्रम असतात.

👉 या कार्यक्रमात तीनही सैन्यदल आपापले कौशल्य दाखवतात.

👉 अनेक सैनिकांच्या कारकिर्दीतील शौर्याचा गौरव केला जातो.

👉 शहिदांची आठवण ठेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते.

👉 नागरिक आपल्या इच्छेनुसार ध्वजदिन निधी देतात.

👉 देणगी देणाऱ्या व्यक्तीला आभार म्हणून एक छोटा ध्वज देतात.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...