Thursday 5 December 2019

भारताची राज्यघटना प्रश्नसंच 5/12/2019

१) असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कलमाने प्रतिबंधीत केली आहे ?
    1) 10 
    2) 14 
    3) 19    
    4) 21

उत्तर :- 2

२) पुढील कोणते विधान अयोग्य आहे ?

   अ) एखादा कायदा अंमलात येण्या अगोदरच्या, त्या कायद्याने प्रतिबंधित केलेल्या कृत्याकरता कोणीही दोषी ठरविले जाऊ शकत  नाही.

   ब) एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवता येत नाही.

   क) कोणीही स्वत:विरुध्द साक्षीदार होऊ शकत नाही.

   1) अ   
  2) ब   
  3) क    
4) वरील सर्व

उत्तर :- 3

३) “स्वातंत्र्य समतेपासून वेगळे/अलग करता येत नाही, समतेला स्वातंत्र्यापासून वेगळे करता येणार नाही आणि स्वातंत्र्य व
     समतेला बंधुते पासून वेगळे करता येणार नाही.” हे उद्गार कोणाचे आहेत ?

   1) पंडीत जवाहरलाल नेहरु   
   2) डॉ. राजेंद्र प्रसाद
    3) डॉ. एस. राधाकृष्णन 
    4) डॉ. बी. आर. आंबेडकर

उत्तर :- 4

४). अ) भारताच्या राज्यघटनेत ‘अल्पसंख्य’ शब्दाची व्याख्या नाही.

    ब) अल्पसंख्यांक आयोग ही बिगर घटनात्मक संस्था नाही.

   1) अ आणि ब बरोबर आहेत, ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.

   2) अ आणि ब बरोबर आहे, ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही.

   3) अ बरोबर आहे, पण ब चूक आहे.

   4) अ चूक आहे, पण ब बरोबर आहे.

उत्तर :- 2

५) मूलभूत अधिकारांशी संबंधित भाग (III) चे वर्णन ................... यांनी ‘सर्वात टिकात्मक भाग’ असे केले आहे  ?

   1) पंडीत जवाहरलाल नेहरु  
   2) डॉ. राजेंद्र प्रसाद
   3) सरदार वल्लभभाई पटेल   
   4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 4

६) खालीलपैकी कोणती विधाने भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार कोणताही व्यवसाय करण्याच्या अथवा कोणताही धंदा,व्यापार करण्याच्या मूलभूत अधिकाराच्या अनुषंगाने खरी आहेत ?

   अ) कोणताही व्यवसाय, धंदा, व्यापार करण्याकरिता नागरिकाकडे सुयोग्य औद्योगिक अथवा व्यावसायिक अर्हता असणे अनिवार्य करण्याचा अधिकार राज्य संस्थेला आहे.

   ब) राज्य शासनाची एखादी संस्था एखादा व्यापार उद्योग करीत असेल तर तो करण्यापासून नागरिकाला वंचित करता येण्याचा  अधिकार राज्यसंस्थेला असेल.

   क) अशी कोणतीही बंधने कायदा करुनच नागरिकांवर लादता येईल.

   ड) अशी बंधने प्रशासकीय आदेशाव्दारेही लादता येतील.

   1) अ, ब 
   2) क, ड  
   3) अ, ब, क  
   4) अ, ब, क, ड

उत्तर :- 3

७) योग्य कथन / कथने ओळखा.
   अ) डॉ. आंबेडकर यांनी संविधानाच्या भाग 3 चा उल्लेख ‘सर्वात टीकात्मक भाग’ असा केला आहे.
   ब) तामिलनाडू मध्ये एकूण आरक्षण कोटा 69 टक्के आहे.
   1) कथन ‘अ’ बरोबर, ‘ब’ चुकीचे

   2) कथन ‘अ’ चुकीचे, ‘ब’ बरोबर

   3) कथने ‘अ’ व ‘ब’ दोन्ही बरोबर
  
  4) कथने ‘अ’ व ‘ब’ दोन्ही चुकीची
,
उत्तर :- 3

८) सार्वजनिक सेवेच्या (Public employment) अनुषंगाने भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार खालीलपैकी कोणती विधाने  सत्य आहेत ?

   अ) संसद कायदा करुन सार्वजनिक नोक-यांकरिता, एखाद्या राज्यात अथवा केंद्रशासित प्रदेशात वास्तव्य कालावधीची अट घालू शकते.

  ब) राज्य शासन त्यांचे राज्यातील सार्वजनिक सेवेतील नोक-याकरिता राज्यातील किमान रहिवासाची अट कायदा करुन घालू  शकते.

   क) नागरिकांचे मागासवर्गीय गट, ज्यांना सार्वजनिक सेवेत पुरेसे प्रतिनिधित्व नाही, त्यांच्या पदोन्नतीकरीता आरक्षण ठेवता येते.

   ड) एखाद्या विशिष्ट वर्षातील भरावयाच्या एकूण जागांच्या कमाल 50 टक्के जागा आरक्षित करण्याच्या मर्यादेमध्ये त्यापूर्वीच्या  वर्षात रिक्त राहिलेल्या आरक्षित जागाही विचारात घ्याव्या लागतात.

   1) अ, ब   
   2) अ, ड   
   3) अ, ब, क, ड  
   4) अ

उत्तर :- 4

९) मूलभूत अधिकारांशी संबंधित भाग (III) चे वर्णन ............. यांनी ‘सर्वात टीकात्मक भाग’ असे केले आहे ?

   1) पंडीत जवाहरलाल नेहरू 
   2) डॉ. राजेंद्र प्रसाद
   3) सरदार वल्लभभाई पटेल   
   4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 4

१०) कालानुक्रमे मांडणी करा:

   अ) अंतर्गत सुरक्षा कायदा    
   ब) प्रतिबंधात्मक स्थानबध्दता कायदा
   क) दहशतवाद प्रतिबंधक कायदा   
   ड) राष्ट्रीय सुरक्षा कायदा

   1) ब, अ, ड, क    2) अ, ब, क, ड    3) क, ड, अ, ब    4) ब, ड, क, अ

उत्तर :- 1

११) कोणत्या घटना दुरुस्तीव्दारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला ?

   1) 84 वी घटना दुरुस्ती   

  2) 85 वी घटना दुरस्ती

   3) 86 वी घटना दुरुस्ती   

  4) 87 वी घटना दुरुस्ती

उत्तर :- 3

१२) समानतेच्या अधिकारामध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्यांच्या अंतर्भाव होतो ?

   अ) कायद्यासमोर समानता   
   ब) अस्पृश्यतेची समाप्ती
   क) पदव्यांची समाप्ती   
   ड) समान अभिव्यक्ती स्वातंत्र्य

   1) अ, ब, ड    2) अ, क, ड   
3) क, अ, ब    4) ब, ड, क

उत्तर :- 3

१३).  खालील विधाने विचारात घ्या :

   अ) मूलभूत हक्क व्यक्तीसापेक्ष आहेत तर मार्गदर्शक तत्वे समाजसापेक्ष आहेत.

   ब) राजकीय लोकशाही प्रस्थापित करणे हे मूलभूत हक्कांचे उद्दिष्ट आहे. सामाजिक लोकशाही निर्माण करणे हे मार्गदर्शक तत्वाचे उद्दिष्ट आहे.

   क) एका दृष्टीने मूलभूत हक्क नकारात्मक आहेत तर मार्गदर्शक तत्वे सकारात्मक आहेत.

         वरीलपैकी कोणते /ती विधान / ने बरोबर आहे / त ?

   1) अ आणि ब 
   2) ब आणि क  
   3) अ आणि क 
   4) अ, ब आणि क

उत्तर :- 4

१४).  मधू किषवर वि. बिहार राज्य या सर्वोच्च न्यायालयातील 1996 च्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे नमूद केले की, .............
     ही मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्वांची आवश्यक असणारी योजना आहे.

   1) सीडॉ (CEDAW)    

2) युएनडीपी (UNDP)

3) सीइसीएसआर (CECSR)  

4) युएनसीएचआर (UNCHR)

उत्तर :- 1

१५).  योग्य कथन / कथने ओळखा :

   अ) अनुच्छेद 47 प्रमाणे सर्व बालकांना वयाच्या 14 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण असावे.

   ब) 86 व्या घटनादुरुस्तीव्दारे 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी शिक्षण हे मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आले.

   1) कथन अ बरोबर, कथन ब चुकीचे 

    2) कथन अ चुकीचे, कथन ब बरोबर

   3) दोन्ही कथने अ आणि ब  बरोबर
आहेत

   4) दोन्ही कथने अ आणि ब चुकीचे आहेत

उत्तर :- 2

१6) खालील विधाने पहा :

   अ) भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 नुसार अस्पूश्यता नष्ट करण्यात आली आहे.

   ब) भारतीय राज्यघटनेच्या 52 व्या घटनादुरुस्तीनुसार पक्षांतर बंदी विषयक तरतूदी लागू करण्यात आल्या.

        वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?

   1) अ   
   2) ब   
   3) अ, ब  
   4) यापैकी  नाही

उत्तर :- 3

17) भारतीय संविधान (पहिली सुधारणा) कायदा 1950 कशासाठी आहे.

   अ) भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर नवीन निर्बंध

   ब) व्यापार, धंदे किंवा सेवा यावर अर्हतेचे निकष

   क) लोकसभेतील प्रतिनिधित्व पुर्ननिर्धारित केले गेले

   ड) राज्यांकरिता केंद्रीय अधिनियमावर त्यांचे मत कळविण्यासाठी कालावधी निर्धारित केला गेला.

   1) अ, ब    2) क, ड   
   3) ब, क      4) अ आणि क

उत्तर :- 1

18) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खालील वक्तव्य कशाच्या संदर्भात केले होते ?

     “स्वातंत्र्य मिळून नुकत्याच जाग्या झालेल्या राज्यसंस्थेला तिच्या जबाबदा-या पार पाडताना त्यांचा क्रम, वेळ, ठिकाण आणि  त्यांच्या परिपूर्तीचा मार्ग निश्चित करण्याची मोकळीक दिली नाही तर ती आपल्या जबाबदा-यांच्या ओझ्याखाली दबून जाईल.”

   1) मूलभूत हक्क   

    2) सांघिक कार्यकारी मंडळाचे अधिकार
   3) राज्य धोरणांची निदेशक तत्वे  

   4) नियोजन आयोग

उत्तर :- 3

19) खालील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा :

   अ) प्राधिकार काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार केवळ मुलभूत अधिकारांच्या हननासंबंधीच्या खटल्यांपुरते मर्यादित आहेत मात्र उच्च न्यायालयाकडे कोणत्याही अधिकाराचे हनन झाल्यास प्राधिकार काढण्याचे व्यापक अधिकार आहेत.

   ब) देहोपस्थितींचा प्राधिकार सर्वोच्च न्यायालय केवळ शासनाला उद्देशून काढू शकते तर उच्च न्यायालय असा आदेश व्यक्तीला उद्देशूनही काढू शकते.

   1) विधान अ सत्य आहे मात्र ब चुकीचे आहे

   2) विधान ब सत्य आहे मात्र अ चुकीचे आहे

   3) दोन्ही विधाने सत्य आहेत

   4) दोन्ही विधाने असत्य आहेत

उत्तर :- 3

20).खालील विधान वाचून अचूक पर्याय निवडा.

     विधी मंत्रालयाने तयार केलेला मसूदा कच्चा असल्याचे कारण देत प्रतिबंधात्मक स्थानबध्दता वाढविणारे विधेयक मे 1975
     मध्ये सभापतींना विरोधकांनी रद्द करण्याची आवश्यकता पटवून दिली.
अशा उदाहरणांचे वर्णन कशा प्रकारे केले जाते ?

   1) विधीमंडळाची सक्रियता   
   2) आत्यंतिक विधीवाद
   3) कार्यकारी मंडळाची सक्रियता   
   4) प्रशासकीय सक्रियता

   उत्तर :- 2

No comments:

Post a Comment