Wednesday, 4 December 2019

भारताची राज्यघटना प्रश्नसंच 4/12/2019

१) कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक हितासाठी सर्वोच्च न्यायालयात जाता येते, याची दखल संविधानाच्या .................. या  केलमाखाली घेतली जाऊ शकते.

   1) 30   
   2) 31  
   3) 32  
   4) 34

उत्तर :- 3

२) भारतीय राज्य घटनेतील तरतुदीनुसार धार्मिक मूलभूत हक्काचे अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतूदी घटनादत्त आहेत ?

   अ) धार्मिक मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिक उपभोगू शकतो.

   ब) धार्मिक आचरणाशी संबंधित आर्थिक, वित्तीय राजकीय कृत्ये राज्य यंत्रणा कायद्याव्दारे नियंत्रित करू शकेल.

   क) सार्वजनिक स्वरुपाच्या हिंदु धार्मिक संस्था सर्व भारतीय नागरीकांना खुले करुन देण्याचा कायदा राज्य यंत्रणेला करता येईल.

   ड) कृपाण धारण करणे ही शीख धर्म पाळण्याची बाब समजण्यात येईल.

   1) ब, ड   
   2) अ, ब, क, ड 
  3) अ, ब, क   
  4) कोणतेही अनुज्ञेय नाही

उत्तर :- 1

३) कलम – 23 मधील ‘बिगारी’ या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करणा-या खालील विधानांचा विचार करा.

   अ) सक्तीचे श्रम

   ब) शारीरिक क्षमतेपलीकडे काम करण्याची सक्ती करणे

   क) अनैच्छिक दास्यत्व

   ड) विशिष्ट मालकासाठी काम करणे आणि त्याच्या परवानगीशिवाय अन्यत्र नोकरी न स्विकारणे

   1) केवळ अ बरोबर आह 
   2) अ आणि ब बरोबर
   3) अ, ब व क बरोबर   
  4) सर्व बरोबर आहेत

उत्तर :- 4

४) भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणते विधान अल्पसंख्याकांचे बाबतीत खरे नाही ?

   अ) राज्य घटनेत फक्त धर्म अथवा भाषा यावर आधारित अल्पसंख्याक दर्ज्यास मान्यता आहे.

   ब) भारतात राहणा-या नागरिकांनाच त्यांची वैशिष्टपूर्ण लिपी, भाषा व संस्कृती संवर्धनाचा अधिकार आहे.

   क) फक्त धार्मिक अल्पसंख्याकांनाच त्यांच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा अधिकार आहे.

   ड) कोणत्याही नागरिकाला राज्य निधीतून मदत प्राप्त होणा-या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत वर्ण, धर्म, जात किंवा भाषेच्या आधारावर प्रवेश नाकारता येणार नाही.

   1) क    
   2) अ   
   3) अ, क  
   4) ब, ड

उत्तर :- 1

५). मूलभूत अधिकार सामान्यत: राज्यसंस्थेच्या अनिर्बंध व्यवहारापासून नागरिकांना संरक्षण देतात. खालीलपैकी कोणते अधिकार  त्याही पुढे जाऊन व्यक्तीला इतर नागरिकांच्या व्यवहारापासून संरक्षण पुरवतात ?

   अ) कलम 14     आ) कलम 15 (1)    ‍इ) कलम 15 (2)    ई) कलम 16
   उ) कलम 17      ऊ) कलम 22 (1)    ए) कलम 23

   1) अ, आ, इ    2) आ, ई, ऊ  
  3) इ, उ, ए    4) उ, ऊ, ए

उत्तर :- 3

६) खालीलपैकी कोणत्या कायद्याचा समावेश प्रतिबंधात्मक स्थानबध्दता कायद्यात होत नाही ?

   1) टाडा    2) नासा 
   3) रासुका    4) मिसा

उत्तर :- 2

७) भारतीय संविधानातील मूलभूत हक्काच्या संदर्भात कलम 19 (2) अंतर्गत भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पुढीलपैकी  कोणत्या मर्यादा टाकण्यात आल्या आहेत ?

   अ) कोणाची बदनामी, निंदा करणे.

   ब) न्यायालयाचा अवमान करणे.

   क) राज्याची सुरक्षा धोक्यात आणणे.

ड) सभ्यता व नीतिमत्तेच्या मर्यादा भंग करणे.

         वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

   1) अ फक्त           2) अ आणि ब फक्त 
3) अ, ब आणि क    4) अ, ब आणि ड

उत्तर :- 3

८) राज्यघटनेने मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी निदेश जारी करण्याचे अधिकार ............... दिलेले आहेत.

   1) सर्वोच्च न्यायालयास कलम 32 अन्वये   

   2) उच्च न्यायालयास कलम 226 अन्वये

   3) सर्वोच्च न्यायालय कलम 32 अन्वये आणि उच्च न्यायालय कलम 226 अन्वये असे दोघांनाही

   4) कोणतेही न्यायालयास किंवा अधिकरणास

उत्तर :- 3

९) योग्य कथन / कथने ओळखा.

   अ) पृथ्थकरणीयतेचा सिध्दांत निर्धारित करतो की, एखादा संपूर्ण कायदा अथवा त्याचा काही भाग संविधानाच्या विरुध्द आहे.

   ब) विकसनशील निर्वचनाचा सिध्दांत हा संविधानाचे निर्वचन करताना सतत परिवर्तनशील सामाजिक – विधिविषयक संदर्भ  ध्यानात ठेवतो.

   1) कथन ‘अ’ बरोबर, ‘ब’ चुकीचे  

  2) कथन ‘अ’ चुकीचे, ‘ब’ बरोबर

   3) कथने ‘अ’ व ‘ब’ दोन्ही बरोबर
   

४) कथने ‘अ’ व ‘ब’ दोन्ही चुकीची

उत्तर :- 3

१०) अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक मुलभूत हक्कासंबंधी खालील विधाने विचारात घ्या :

   अ) अल्पसंख्याकांना केवळ शैक्षणिक संस्थांचे प्रशासन करण्याचा हक्क आहे.

   ब) अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क आहे.

   क) हा अधिकार निरंकुश असून त्यावर कोणतीही बंधने नाहीत.

   ड) कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि कुप्रशासन रोखण्यासाठी वाजवी बंधने शासन घालू शकते.

        वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

   1) अ, ब आणि क    2) ब आणि ड  
3) ब, क आणि ड    4) अ आणि क

उत्तर :- 2

No comments:

Post a Comment