☑️अमिताभ बच्चन यांचा 50 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने होणार सन्मान
☑️प्रतिष्ठेच्या 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण काल 23 डिसेंबर 2019 ला नवी दिल्लीत एका दिमाखदार सोहळ्यात पार पडले उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आणि माहिती-प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहेया कार्यक्रमाला चित्रपट सृष्टीतील मान्यवरांचा आणि भारतीय सिनेसृष्टीला योगदान देणाऱ्या सर्वांचा सन्मान करण्यात आला.
☑️भारतीय चित्रपट सृष्टीचे अर्ध्वयू, पितामह अमिताभ बच्चन यांचा या 50 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. याआधी, ऑगस्ट महिन्यात, या चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती.
☑️सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार गुजराती चित्रपट हेलारो या सिनेमाला, ‘बधाई हो’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा, हिंदी चित्रपट पैडमैन ला सर्वोत्कुष्ट सामाजिक चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, उरी-द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटासाठी आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे. अंधाधून आणि उरी-द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटातील अभिनयासाठी आयुष्यमान खुराना आणि विकी कौशल यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून मिळाला आहे. कीर्ती सुरेश यांना महानती या तेलगु चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.तर पर्यावरण संवर्धनाचा विषय प्रभावीपणे मांडल्याबद्दल ‘पाणी’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरवले जाणार आहे
No comments:
Post a Comment