Monday, 2 December 2019

2 डिसेंबरला घडली होती सर्वात भीषण दुर्घटना

2 डिसेंबर 1984 रोजी भोपाळमध्ये एक दुर्घटना घडली होती. ज्याबाबत भारतच काय तर संपूर्ण जग कधीच विसरु शकत नाही. कारण जगाच्या इतिहासातील हि सगळ्यात मोठी दुर्घटना होती.

3 डिसेंबर 18984 ची सकाळ भोपाळसाठी अंगावर शहारे आणणारी अशीच होती. संपूर्ण शहरात प्रेतांचा खच- खचच होता. जे लोक यातून वाचले होते त्यातील अनेकजण जन्मभरासाठी अपंग तर दृष्टिहीन झाले होते. 

या दुर्घटनेत तब्बल 15 हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला होता तर लाखों लोकांना कायमचे निकामी केले होते. यानंतर त्यांच्या पुढच्या दोन पिढ्या आजही या दुर्घटनेचे दुष्परिणाम भोगत आहेत.

2 डिसेंबरची रात्र हजारों लोकांसाठी काळरात्रच होती. 'युनियन कार्बाईड' या कंपनीत 'मिथिल आयसोसायनाइट (एमआयस‍ी) या विषारी वायूची भीषण गळती झाली होती. यामुळे लोक गाढ झोपेत असताना अचानक त्यांचा दम कोंडला जाऊ लागला.

काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले होते. भोपाळमधील सगळे रस्ते आणि घरांमध्ये मृतदेहाचा अक्षरश: सडा पडला होता. रस्त्यावरील मृतदेह रुग्णालयात ट्रकमध्ये भरून आणण्यात आले होते. पोस्टमार्टम करून बहुतांश मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आला होता.

कामगारांच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली नाही तर काय होते याचा जगाने चांगलाच धडा घेतला. यानंतर विविध देशातील सरकारे जागे झाली आणि त्यांनी कामगारांसाठी विविध आपत्कालीन यंत्रणा बनवल्या.

No comments:

Post a Comment

Latest post

Eklavya

विद्या प्रबोधिनी कोल्हापूर : CLICK HERE राष्ट्रनिर्माण प्रबोधनी : CLICK HERE स्पर्धाशाही acadeny : CLICK HERE रयत प्रबोधनी : CLICK HERE सारथ...