🥊 भारताचा स्टार बॉक्सिंगपटू सुमित सांगवानवर उत्तेजक चाचणीत दोषी सापडल्यामुळं एका वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
🧐 प्रकरण काय? : 10 ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेश येथे झालेल्या चाचणीत सुमितच्या सॅम्पलमध्ये अॅसेटॅझोलामाइड या उत्तेजकांचे अंश सापडले. ऑलिम्पिक आणि नॅशनल चॅम्पियन (91 किलोग्राम) सांगवानवर राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेकडून ही बंदी लादण्यात आली आहे.
🏅 ऑलिम्पिकचे स्वप्न भांगणार :
▪ सांगवानच्या बंदीचा कालावधी 26 डिसेंबर 2019 पासून सुरू झाला आहे. त्यामुळं सांगवान पुरुषांच्या ऑलिम्पिक पात्रता फेरीत भाग घेऊ शकणार नाही.
▪ पुरुषांची ऑलिम्पिक पात्रता फेरी 29-30 डिसेंबर रोजी बरेलीमध्ये होणार आहे. या फेरीत निवडले बॉक्सर 3 ते 14 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक क्वॉलिफायर स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील.
📍 दरम्यान, या 1 वर्ष बंदीच्या काळामुळे सुमितला पुढील वर्षी टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये खेळात येणार नाही.
No comments:
Post a Comment