2 पेक्षा जास्त बंदूक जवळ बाळगण्यास या विधेयकामुळे प्रतिबंध बसणार आहे. कायद्यातील सध्याच्या तरतुदीनुसार एका व्यक्तीस तीन बंदुका जवळ बाळगता येतात.
काही अपवाद वगळता नागरिकांना यापुढील काळात दोनपेक्षा जास्त बंदुका जवळ ठेवता येणार नाही.
शस्त्र सुधारणा कायद्याचे उल्लंघन करणार्यांना 10 वर्षाच्या तुरुंगवासाची आणि दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे.
लष्कर किंवा पोलिसांची शस्त्रे लुटल्यास, संघटित गुन्हेगारी टोळ्यांसाठी शस्त्रांचा वापर केल्यास, अवैधरित्या शस्त्रांची तस्करी तसेच बेदरकारपणे शस्त्रांचा वापर केल्यास दोषींना जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेला सामोरे जाण्याची तरतूदही विधेयकात करण्यात आली आहे.
लग्नसमारंभ वा इतर कार्यक्रमांच्या ठिकाणी गोळीबार केल्याचे सिध्द झाल्यास दोन वर्षाच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली असून एक लाख रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे.
कायद्यातील नव्या तरतुदीमुळे खेळाडुंना शस्त्र बाळगण्यावर मर्यादा येणार नाहीत.
अवैधरित्या शस्त्रांची निर्मिती वा त्याची विक्री करणार्यांना सात वर्षे ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली असून अशी शस्त्रे बाळगणार्यांसाठी सात ते चौदा वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment