Thursday, 26 December 2019

17 व्या लोकसभेत महिला खासदारांची सर्वात मोठी संख्या

🌸17व्या लोकसभेत देशभरातील विविध पक्षांमधून 78 महिला खासदार दिसणार आहेत. आतापर्यंतची ही महिला खासदारांची सर्वात मोठी संख्या आहे.

🌸 उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगाल येथून प्रत्येकी 11 महिला लोकसभेवर निवडून गेल्या आहेत.

🌸 एकूण 724 महिलांनी ही निवडणूक लढवली. त्यात काँग्रेसने सर्वाधिक 54 उमेदवार दिले. त्यापाठोपाठ भाजपचे 53 महिला उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरले होते.

🌸1952 पासूनचा हा महिलांचा सर्वात मोठा म्हणजे लोकसभेच्या एकूण जागांच्या 14% सहभाग लोकसभेत असणार आहे.

🌸 मावळत्या म्हणजेच 16व्या लोकसभेत 64 महिला खासदार होत्या.

🌸15व्या लोकसभेत 52 महिलांनी आपल्या भागाचे प्रतिनिधित्व केले होते.

🌸 दरम्यान महिलांना राजकारणात 33% प्रतिनिधित्व देण्याचे विधेयक संसदेत अजूनही प्रलंबित आहे.

🌸 41 महिला खासदारांपैकी 27 खासदारांना यावेळी आपले स्थान अबाधित राखण्यात यश आले.

🌸 या खेपेस उत्तर प्रदेशातून सर्वाधिक 104 महिला उमेदवारांनी लोकसभेसाठी आपले नशीब आजमावले. त्यापाठोपाठ महाराष्ट्र आणि तामिळनाडूतून 64 महिला उमेदवार रिंगणात होत्या. बिहार 55, पश्‍चिम बंगाल 54 अशा महिलांनी ही निवडणूक लढवली.

No comments:

Post a Comment