Saturday, 14 December 2019

महत्त्वाचे सराव प्रश्न 15/12/2019

1. दोन रेखावृत्तातील सर्वात जास्त अंतर विषुववृत्तावर ----- कि.मी. असते.
1. 110
2. 115
3. 105
4. 120
उत्तर : 110

2. भूऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र ------ येथे आहे.
1. पेंच
2. मणिकरण
3. कोयना
4. मंडी
उत्तर : मणिकरण

3. 'स्पीड पोस्ट' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
1. मुल्क राज आनंद
2. शोभा डे
3. अरुंधती राय
4. खुशवंत सिंग
उत्तर : शोभा डे

4. नियोजित आलेवाडी बंदर ------ जिल्ह्यात आहे.
1. सिंधुदुर्ग
2. ठाणे
3. रत्नागिरी
4. रायगड
उत्तर : ठाणे

5. ----- शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात.
1. मुंबई
2. बंगलोर
3. कानपूर
4. हैदराबाद
उत्तर : बंगलोर

6. ताशी 36 कि.मी. वेगाने धावणारी आगगाडी एक खांब 20 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती?
1. 20 मीटर
2. 200 मीटर
3. 180 मीटर
4. 360 मीटर
उत्तर : 200 मीटर

7. मुंबई उच्च न्यायालयाची ----- खंडपीठे आहेत.
1. दोन
2. तीन
3. चार
4. एक
उत्तर : तीन

8. राज्याचा आकस्मिक निधी ------ च्या अखत्यारीत असतो.
1. राज्यपाल
2. मुख्यमंत्री
3. मंत्रीपरिषद
4. राज्यविधानमंडळ
उत्तर : राज्यपाल

9. स्पायरोगायरा ----- शेवाळ आहे.
1. नील-हरित
2. हरित
3. लाल
4. रंगहीन
उत्तर : हरित

10. ------ वायु-57°से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायूरूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क (कोरडा) बर्फ म्हणतात.
1. नायट्रोजन
2. अमोनिया
3. हेलियम
4. कार्बन डाय-ऑक्साइड
उत्तर : कार्बन डाय-ऑक्साइड

11. हिर्याचा अपवर्तनांक किती?
1. 1.5
2. 1.6
3. 2.42
4. 1.33
उत्तर : 2.42

12. महाराष्ट्राच्या विधानसभेत निर्वाचित सभासदांची संख्या ------ आहे.
1. 250
2. 266
3. 288
4. 278
उत्तर : 288

13. 60 आणि दुसरी एक संख्या यांचा म.सा.वि. 12 आहे आणि त्यांचा ल.सा.वि. 240 आहे. दुसरी संख्या शोधा.
1. 4
2. 48
3. 720
4. 20
उत्तर : 48

14. इ.स. 1920 साली रेल्वे मार्गाच्या विस्ताराच्याबाबतीत भारताचा जगात ------ क्रमांक होता.
1. 4
2. 7
3. 2
4. 5
उत्तर : 4

15. ------ हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.
1. दिनबंधु
2. दिन मित्र
3. दलित मित्र
4. दलित बंधु
उत्तर : दिनबंधु

16. गोपाल गणेश आगरकर यांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला?
1. मानवतावाद
2. समाजवाद
3. बुद्धीप्रामाण्यवाद
4. सर्वकषवाद
उत्तर : बुद्धीप्रामाण्यवाद

17. गोपाल गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत?
1. मराठा
2. केसरी
3. ज्ञानप्रकाश
4. दर्पण
उत्तर : केसरी

18. शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला?
1. आर्य समाज
2. सत्यशोधक समाज
3. प्रार्थना समाज
4. ब्राम्हो समाज
उत्तर : सत्यशोधक समाज

19. 'सार्वजनिक सत्यधर्म' हे पुस्तक कोणी लिहिले?
1. लोकहितवादी
2. आगरकर
3. विठ्ठल रामजी शिंदे
4. महात्मा फुले
उत्तर : महात्मा फुले

20. महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते होते -----
1. अॅनी बेझंट
2. लोकमान्य टिळक
3. बॅरिस्टर खापरडे
4. डॉ. बी.एस. मुंजे
उत्तर : लोकमान्य टिळक
____________________________

1] कोणता दिवस भारतात ‘शहीद दिन’ म्हणून पाळला जातो?

A.   31 मार्च

B.   21 मार्च

C.   23 मार्च

D.   29 मार्च

💁‍♂ स्पष्टीकरण : (C) 23 मार्च
क्रांतीकारक भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांना श्रद्धांजली देण्यासाठी भारतात दरवर्षी 23 मार्चला ‘शहीद दिन’ पाळला जातो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2] कोणती व्यक्ती 2019 सालासाठी ‘100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल इन क्लायमेट पॉलिसी’ या जागतिक यादीत समाविष्ट केले गेलेले केंद्रीय मंत्री आहेत?

A.   राजनाथ सिंग
B.   पियुष गोयल
C.   डॉ. हर्ष वर्धन
D.   (B) आणि (C)

💁‍♂ स्पष्टीकरण :(D) - (B) आणि (C)
‘100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल इन क्लायमेट पॉलिसी’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या हवामानविषयक बदलांमुळे उद्भवलेल्या समस्यांना हाताळणार्‍या जगातल्या 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत सात भारतीयांचा समावेश केला गेला आहे.

अॅलेक्झांड्रिया ओकासिओ-कोर्टेझ (अमेरिकेच्या काँग्रेसच्या सदस्या) या यादीत अग्रस्थानी आहे.

तर यात समाविष्ट केल्या गेलेल्या सात भारतीयांची नावे - पियुष गोयल (रेल्वेमंत्री), डॉ. हर्ष वर्धन, मुक्ता तिलक, ज्योती किरीट पारीख, सुनिता नरैन, वंदना शिव, उपेंद्र त्रिपाठी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

3] ……. रोजी ‘जागतिक क्षयरोग दिन’ पाळला जातो.

A.   29 मार्च
B.   24 मार्च
C.   23 मार्च
D.   25 मार्च

💁‍♂ स्पष्टीकरण : (B) 24 मार्च
दरवर्षी 24 मार्च या दिवशी जगभरात ‘जागतिक क्षयरोग दिन (World TB Day)’ पाळला जातो.

या दिनानिमित्त क्षयरोगाचे (TB) जागतिक ओझे प्रदर्शित केले जाते तसेच प्रतिबंधात्मक व निगा राखण्याचे प्रयत्न याविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाते.

यावर्षी हा दिवस “इट्स टाइम” या संकल्पनेखाली पाळण्यात आला.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

4] कोणत्या देशाने ‘SAFF महिला फुटबॉल अजिंक्यपद 2019’ या स्पर्धेचे जेतेपद जिंकले?

A.   भारत
B.   बांग्लादेश
C.   पाकिस्तान
D.   भुटान

💁‍♂ स्पष्टीकरण : (A) भारत
नेपाळमध्ये ‘SAFF महिला फुटबॉल अजिंक्यपद 2019’ या स्पर्धेचे जेतेपद भारताने जिंकले आहे.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान नेपाळचा पराभव करून सलग पाचव्यांदा जेतेपद पटकावले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
5] 18 मार्च 2019 रोजी मोझांबिकमध्ये भारतीय नौदलाने मानवतावादी सहाय्य पुरविण्यासाठी एक मोहीम सुरू केली. त्यामागचे कारण काय आहे?

A. मोझांबिकमध्ये विक्रमी अत्याधिक पाऊस पडला.
B. मोझांबिकला ‘इदाई’ चक्रीवादळाने तडाखा बसला.
C. मोझांबिकमध्ये त्सुनामीने धडक दिली
D. यापैकी नाही

💁‍♂ स्पष्टीकरण :  (B) मोझांबिकला ‘इदाई’ चक्रीवादळाने तडाखा बसला मोझांबिक या आफ्रिकी देशाच्या किनाऱ्याला दिनांक 15 मार्च 2019 रोजी ‘इदाई (Idai)’ चक्रीवादळाने तडाखा दिल्यानंतर स्थानिकांना मानवतावादी सहाय्य पुरविण्यासाठी भारतीय नौदलाची जहाजे पोहचली.

भारतीय नौदलाच्या पहिल्या ट्रेनिंग स्क्वाड्रनमधली ‘INS सुजाता’, ‘INS सारथी’ आणि ‘INS शार्दुल’ ही तीन जहाजे बैरा बंदराकडे वळवण्यात आली.

ही जहाजे दक्षिण हिंद महासागरात तैनात होती.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

[प्र.१] सरहिंद कालवा कोणत्या राज्यात आहे?

१] पंजाब  ✅✅
२] जम्मू काश्मीर
३] हिमाचल प्रदेश
४] उत्तराखंड

------------------------------------------------------------

[प्र.२] कोणत्या नदीच्या वायव्येस पंजाब हिमालय पसरला आहे?

१] सिंधू
२] सतलज ✅✅
३] चिनाब
४] रावी

----------------------------------------------------------

[प्र.३] हेमवती, सिरपा, लोकपावनी, सुवर्णावती या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

१] कावेरी✅✅
२] कृष्णा
३] गोदावरी
४] इरावती

------------------------------------------------------------

[प्र.४] जारवा हि जमात कोठे आढळते?

१] निकोबार
२] छोटे अंदमान✅✅
३] अरुणाचल प्रदेश
४] लक्षद्वीप

------------------------------------------------------------

[प्र.५] खालील नद्यांचे खोरे त्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लावा.
अ] गंगा नदी खोरे
ब] महानदी खोरे
क] कृष्णा नदी खोरे
ड] नर्मदा नदी खोरे

पर्याय
१] अ-ब-क-ड
२] अ-क-ब-ड ✅✅
३] अ-क-ड-
४] ड-ब-क-अ

-------------------------------------------------------------

[प्र.६] खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य पर्याय निवडा.
अ] ऑस्ट्रेलियाकडून भारताला खाद्यतेलाची आयात करावी लागते.
ब] महाराष्ट्र व पश्चिम बंगाल हे वृत्तपत्रांच्या कागद निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत.

१] फक्त अ योग्य
२] फक्त ब योग्य
३] दोन्ही योग्य ✅✅
४] दोन्ही अयोग्य

------------------------------------------------------

[प्र.७] खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य पर्याय निवडा.
अ] रावतभाटा हा औष्णिक विद्युत प्रकल्प राजस्थान राज्यात आहे.
ब] कुदनकुलम प्रकल्पाला अमेरिकेचे सहाय्य लाभले आहे.

१] फक्त अ योग्य
२] फक्त ब योग्य
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य ✅✅

----------------------------------------------------------

[प्र.८] खालीलपैकी कोणते वृक्ष हिमालयात आढळत नाहीत?
अ] फर
ब] महोगनी
क] स्प्रुस

१] फक्त अ
२] फक्त ब✅✅
३] फक्त क
४] वरील सर्व

-----------------------------------------------------------

[प्र.९] कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या वनांशी संबंधित आहे?
१] उष्णकटिबंधीय आर्द्र वने
२] उष्ण निम वाळवंटी वने
३] उष्णकटिबंधीय शुष्क वने
४] उष्णकटिबंधीय उपआर्द्र वने ✅✅

----------------------------------------------------------

[प्र.१०] उष्णप्रदेशीय पानझडी वनांच्या बाबतीत अयोग्य विधान निवडा.
अ] या वनांत साग, साल, पळस हे वृक्ष आढळतात.
ब] २०० सेमी पर्यंत पाउस पडतो.
क] यांना "मौसमी वने" असेही म्हणतात.
ड] जहाजबांधणीसाठी यांचा उपयोग होतो.

१] अ अयोग्य
२] ब अयोग्य
३] अ, ब आणि क अयोग्य
४] वरीलपैकी एकही नाही. ✅✅

------------------------------------------------------------

१) खालील पैकी कोणाचा अखिल भारतीय कांग्रेस पक्षाच्या स्थापनेत सहभाग होता ?
अ) श्री. डब्ल्यू . सी. बॅनर्जी
ब)  श्री. दिनशॉ वाच्छा
क) श्री. विल्यम वेडेरबर्न
ड) वरील सर्व.✅

२) खालीलपैकी कोणती संघटना कांग्रेस प्रणित नाही?
अ) कांग्रेस सेवा दल
ब)  युक्रांद✅
क) एन एस यू आय
ड) आय एन टी यू सी

३) कांग्रेस पक्षातील हाय कमांड म्हणजे खालीलपैकी कोण असते?
अ) पक्षाध्यक्ष
ब) पक्ष उपाध्यक्ष
क) कांग्रेस कार्यकारी समिती ✅
ड) यापैकी नाही

४) खालीलपैकी योग्य विधाने निवडा.
१) राष्ट्रीय कॉंग्रेस ही लोकशाही तत्वावर आधारित असलेली संघटना होती.
२) १८८५ साली राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली.
३) राष्ट्रीय सभेवर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असला तरी दुसऱ्या महायुद्धात भारताने इंग्रजांना मदत करावी या गांधीजींच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रीय सभेने ठराव संमत केला होता.

अ) फक्त १ व ३
ब) फक्त १ व २
क) फक्त २ व ३
ड) वरील सर्व ✅

५) कॉंग्रेसमधील जहाल व मवाळ गटातील प्रमुख पूरक असलेले पर्याय निवडा ? 
१) विचारसरणीत  भिन्नता 
२) आंदोलन मार्गातील भिन्नता 
३) मागण्यात  भिन्नता 
४) स्वराज्य व स्वातंत्र्य मुद्यावर मतभेद 

अ) १, ३ व ४
ब) २, ३ व ४
क) १, २ व ३✅
ड) १, २ व ४

६)  खालीलपैकी कोणते उद्दिष्ट कॉंग्रेसच्या स्थापनेशी संबंधित नाही ?
   
अ) भारतीय लोकाचा असंतोष कमी करणे.
ब) इंग्रज प्रशासनाच्या चुका दुरुस्त करणे 
क) विविध प्रश्नावर लोकमत तयार करणे 
ड) जहाल व मवाळामध्ये समन्वय प्रस्थापित करणे✅

७) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राष्ट्रीय सभा बरखास्त करण्यात यावी असे खालीलपैकी कोणाचे मत होते ?

अ) सी. राजगोपालाचारी  
ब) आचार्य कृपलानी 
क) महात्मा गांधी ✅
ड) जयप्रकाश नारायण 

८) खालीलपैकी कोणती योजना कांग्रेस कार्यकाळातील नाही ?
अ) मनरेगा
ब) किसान विकास पत्र
क) सुकन्या समृद्धी✅
ड) अन्न सुरक्षा

९) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पूर्ण भारतात किती जागा मिळाल्या ?
अ) ४४ ✅
ब) ४८
क) ५२
ड) ६१

१०) खालीलपैकी कोणत्या कॉंग्रेस नेत्याने भारत देशाचे गृहमंत्रीपद भूषवले नाही?
अ) पी. चिदंबरम
ब) पी.व्ही. नरसिंहाराव
क) इंदिरा गांधी
ड) पृथ्वीराज चव्हाण ✅

_____________________________

No comments:

Post a Comment