Saturday, 14 December 2019

भूगोल प्रश्नसंच 14/12/2019

1) साठवून ठेवलेल्या पाण्यातील शेवळांची वाढ थांबविण्यासाठी कोणत्या पदार्थाचा मोठया प्रमाणात वापर करण्यात येतो ?
   1) कॉपर सल्फेट      2) शिसे      3) कोबाल्ट    4) कॅडमियम
उत्तर :- 1

2) खालील परिस्थितीत तुषार सिंचन पध्दत चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही ?
   1) वा-याचा जास्त वेग    2) जास्त रोपांची घनता  3) कमी रोपांची घनता  4) उताराची जमीन
उत्तर :- 1

3) प्रवाही जलसिंचनात शेवाळ जे नत्र स्थिरीकरणामुळे स्विकारले जाते, तेच ठिबक सिंचन प्रणालीत मुळीत पसंत केले जात नाही
     कारण –
   1) ठिबक सिंचन प्रणाली वापरल्यामुळे शेवाळ नत्र स्थिरीकरण करू शकत नाही.
   2) ठिबक सिंचनाच्या पाईपमध्ये शेवाळ वाढू शकत नाही.
   3) ठिबक तोटया बंद पडू शकतात.
   4) यापैकी काहीही नाही.
उत्तर :- 3

4) महाराष्ट्र सुवर्णजयंती नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा व स्वच्छता योजना :
   अ) महाराष्ट्र सुजल निर्मल अभियानांतर्गत सुरू केलेली आहे.
   ब) अनुसूचित जाती व नवबौध्द कुटुंबांना वैयक्तिक घरगुती नळ जोड व स्वच्छता गृहासाठी ही सुरू केलेली योजना आहे.
   क) या योजनेंतर्गत 75 टक्के अनुदान राज्यसरकार देते तर उर्वरित 25 टक्के रक्कम संबंधित लाभधारक अथवा नागरी स्थानिक
         संस्थेने खर्च करावी लागते.
   वरीलपैकी कोणती / ते विधान / ने बरोबर आहे / त ?
   1) फक्त अ    2) फक्त अ आणि ब    3) फक्त ब आणि क    4) अ, ब आणि क
उत्तर :- 2

5) समपातळी (कंटूर) बांधाची शिफारस ................... असणा-या भागासाठी आणि ज्या जमिनीमध्ये पाणी झिरपते व 6 टक्के पर्यंत
     उतार असतो अशा शेत जमिनीत करतात. 
   1) 600 मि.मी. पेक्षा कमी पर्जन्यमान    2) 600 मि.मी. पेक्षा जास्त पर्जन्यमान
   3) 1000 मि.मी. पेक्षा अधिक पर्जन्यमान    4) 700 मि.मी. पेक्षा जास्त पर्जन्यमान
उत्तर :- 1

1) ठिबक सिंचन प्रणालीमध्ये वाळूच्या गाळणीची गरज खालील घटक सिंचनाच्या पाण्यातून काढण्यासाठी होते ?
   अ) शेवाळ    ब) पाण्यात विरघळलेले क्षार   
   क) काडी-कचरा    ड) अतिसुक्ष्म मृदा कण
   1) अ आणि ब    2) अ आणि क    3) ब आणि क    4) क आणि ड
उत्तर :- 2

2) गैबीयनच्या संदर्भात कोणत्या बाबी सत्य आहेत ?
   अ) ते हाताळण्यासाठी लवचिक आहेत.    ब) त्यांचे बांधकाम कमी खर्चाचे असते.
   क) अपधावासाठी ते अपाय असतात.    ड) ते सहज फुटू शकतात.
   1) अ आणि ब    2) ब आणि क    3) अ आणि क    4) अ आणि ड
उत्तर :- 1

3) ............................ जमिनीसाठी तुषार सिंचन उपयुक्त आहे.
   1) खार    2) उथळ व उताराच्या 
   3) आम्लधर्मी    4) अल्कधर्मी
उत्तर :- 2

4) ....................... सांडवा पाणी आडवून पाणी साठवण्यासाठी उपयोगात आणता येत नाही.
   1) आघात    2) आघात प्रवेश    3) घसरणी    4) आपत्कालीन
उत्तर :- 3

5) एप्रिल 2002 मध्ये स्विकारलेल्या राष्ट्रीय जल नितीची ही उद्दिष्टये आहेत :
   अ) जल संसाधनांच्या नियोजनासाठी चौकट तयार करणे.    ब) एकात्मिक जल संसाधनांचा विकास.
   क) उत्तरेतील नद्या दक्षिणेतील नद्यांशी जोडणे.      ड) भूजल व्यवस्थापन.
   1) अ आणि ब फक्त बरोबर आहेत      2) क आणि ड फक्त बरोबर आहेत
   3) अ, ब आणि ड फक्त बरोबर आहेत    4) वरील सर्व बरोबर आहेत
उत्तर :- 3

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...