Thursday, 12 December 2019

भूगोल प्रश्नसंच 12/12/2019

1) भारतात सर्वात अधिक साक्षरता असलेल्या 10 जिल्ह्यांची साक्षरता 95%  पेक्षा अधिक आहे. या दहा जिल्ह्यांबाबत पुढील दोन
     विधानातील कोणते योग्य नाही ?
   अ) त्यातील 6 जिल्हे केरळ राज्यातील आहेत.
   ब) त्यातील 3 जिल्हे मिझोराम मधील आहेत.
   1) अ      2) ब      3) दोन्ही      4) एकही नाही
उत्तर :- 4

2) 2011 च्या जनगणनेनुसार खालील विधाने पहा.
   अ) बिहार, पश्चिम बंगाल व केरळ ह्या राज्यांनी प्रति चौ.कि.मी. माणसांच्या 1000 हा आकडा ओलांडला आहे.
   ब) अरुणाचल प्रदेश, मिझोराम व सिक्कीम ह्या राज्यांची प्रति चौ.कि.मी. माणसांची घनता 100 पेक्षा कमी आहे.
   1) अ आणि ब बरोबर    2) अ बरोबर ब चूक
   3) अ चूक ब बरोबर    4) अ आणि ब चूक
उत्तर :- 3

3) खालील विधानांचा विचार करा.
   अ) भारतामध्ये 6 वर्षाखालील लोकसंख्येची टक्केवारी 2001 मध्ये 15.9%  पासून 2011 मध्ये 12.1%  एवढी घटली.
   ब) 2011 च्या जनगणनेनुसार जम्मू आणि काश्मिर राज्य सोडून भारतातील इतर सर्व राज्यांत 6 वर्षांखालील लोकसंख्येची
       टक्केवारी घटली आहे.
        वरीलपैकी कोणते / कोणती विधान / विधाने बरोबर आहे / आहेत ?
   1) फक्त अ    2) फक्त ब    3) अ आणि ब दोन्हीही    4) अ किंवा ब दोन्हीही नाही
उत्तर :- 2

4) खाली दिलेली विधाने सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील मुलांच्या लोकसंख्येशी संबंधित आहेत, वाचून योग्य पर्याय
     निवडा.
   अ) मुलांची लोकसंख्या 2001 मध्ये 14.1 टक्के इतकी होती ती घटून सन 2011 मध्ये 11.9 टक्के इतकी झाली.
   ब) ही लोकसंख्या घट ग्रामीण आणि शहरी भागात दोन्हीकडे झालेली आहे.
   क) शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात ही घट जास्त झाल्याचे दिसते.
   1) केवळ विधान अ आणि क बरोबर आहेत.      2) केवळ विधान ब आणि अ बरोबर आहेत.
   3) केवळ विधान क आणि ब बरोबर आहेत.      4) सर्व विधाने बरोबर आहेत.
उत्तर :- 4

5) कोणत्या राज्यांच्या गटामध्ये 2001 ते 2011 मध्ये लोकसंख्येची वाढ सर्वात कमी झाली  ?
   1) केरळ, गोवा, हरियाणा      2) नागालँड, केरळ, मिझोराम
   3) नागालँड, केरळ, गोवा      4) केरळ, गोवा, मेघालय
उत्तर :- 3

1) राज्यांची त्यांच्या 2011 मध्ये नोंदविण्यात आलेल्या दशवर्षीय लोकसंख्या वाढीच्या टक्केवारीच्या तुलनेत, उतरत्या क्रमाने
     मांडणी करा.
   1) उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, जम्मू व काश्मिर
   2) बिहार, उत्तर प्रदेश, मेघालय, जम्मू व काश्मिर
   3) मेघालय, अरूणाचल प्रदेश, बिहार, जम्मू व काश्मिर
   4) अरूणाचल प्रदेश, बिहार, मेघालय, जम्मू व काश्मिर
उत्तर :- 3

2) 1921 ची जनगणना सोडली तर बाकी सर्व जनगणना वर्षात महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढली. खालीलपैकी कोणते घटक
     1921साली लोकसंख्या वाढीचा दर कमी होण्यास कारणीभूत झाले ?
   अ) प्लेग सारख्या रोगाचे फैलाव    ब) अन्नधान्याची कमतरता
   क) दुष्काळ        ड) महाराष्ट्रात इतर राज्यांत स्थलांतर
   1) फक्त अ    2) फक्त अ आणि ब    3) फक्त क आणि ड    4) फक्त ड
उत्तर :- 2

3) खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यात लोकसंख्येची घनता जास्त (451 – 600) होती ?
   1) नाशिक, सातारा  2) नागपूर, सोलापूर    3) नागपूर, कोल्हापूर    4) पुणे, सोलापूर
उत्तर :- 3

4) 2012 च्या लोकसंख्येनुसार जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. तिस-या व चौथ्या क्रमांकांवरील देश क्रमाने कोणते ?
   1) इन्डोनेशिया आणि ब्राझील    2) इन्डोनेशिया आणि पाकिस्तान
   3) यु.एस.ए. आणि ब्राझील    4) यु.एस.ए. आणि इन्डोनेशिया
उत्तर :- 4

5) संयुक्त राष्ट्रसंघाच्या लोकसंख्या निधीच्या, ‘जागतिक लोकसंख्या अहवाल 2011 नुसार’ भारताची लोकसंख्या 2025 मध्ये
     ............... इतकी होईल जेणेकरून चीनच्या 1.39 अब्ज लोकसंख्येच्या पुढे जाऊन जगातील लोकसंख्येच्या बाबतीत तो सर्वात
     मोठा देश ठरेल.
   1) 1.44 अब्ज    2) 1.46 अब्ज    3) 1.45 अब्ज    4) 1.47 अब्ज
उत्तर :- 2

1) लोकसंख्या संक्रमणाच्या दुस-या टप्प्यावर
   1) जन्मदर उच्च परंतु मृत्यूदर वेगाने घटतो.      2) जन्मदर कमी परंतु मृत्यूदर वेगाने वाढतो.
   3) मृत्यूदर अधिक राहतो परंतु जन्मदर वेगाने घटतो.    4) वरील एकही नाही
उत्तर :- 1

2) प्रकाशामध्ये (दृश्य) .......................... असतात.
   1) लघु लांबीच्या व उच्च वारंवारीता लहरी    2) दीर्घ लांबीच्या व निम्न वारंवारीता लहरी
   3) लघु लांबीच्या व निम्न वारंवारीता लहरी    4) दीर्घ लांबीच्या व उच्च वारंवारीता लहरी
उत्तर :- 1

3) .................... हे सर्वोत्तम आणि व्यापारी दृष्टया सर्वाधिक वापरले जाणारे भौगोलिक माहिती प्रणालीतील प्रतिमा प्रक्रियण  
     कार्यक्रम सामग्रीसंच आहे.
   1) इरदास (ERDAS)    2) एक्सले (EXCEL)   
   3) मॅटलॅब (MATLAB)    4) फोटोस्मार्ट (PHOTOSMART)
उत्तर :- 1

4) त्रिमिती दृश्य तयार करण्यासाठी दोन व्दिमितीय छाया चित्रांचे सुमारे ...............% आच्छादन त्रिमितीदर्शी खाली मांडावे लागते.
   1) 60      2) 90      3) 45      4) 30
उत्तर :- 1

5) ................. छायाचित्रण हे सर्वसाधारणरित्या एकेरी भिंग मांडणीच्या छायात्रिकाव्दारे घेतात अशा छायाचित्रांचा वापर सुदूर
     संवेदन आणि भू मानचित्र अभ्यासात होतो.
   1) तिरकस    2) समतल   
   3) विस्तृतकोन    4) लंब रूप
उत्तर :- 4

1) जर जमिनीवरून वाहून जाणा-या पाण्याच्या प्रवाहाचा वेग दुप्पट झाल्यास जमिनीची धुप करण्याची शक्ती मूळ वेगाच्या किती
     पटीने वाढेल ?
   1) एकपट    2) दुप्पट      3) चारपट    4) आठपट
उत्तर :- 3

2) कोणत्या पट्टा पीक पध्दतीमध्ये कडधान्य अथवा गवत यांचे पट्टे शेतामध्ये कायम स्वरुपी ठेवले जातात ?
   1) समतल पट्टा    2) वारा प्रतिबंधक पट्टा  3) वरील दोन्ही    4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 4

3) पृथ्वी वरील पाण्याबाबत काय बरोबर नाही ?
   अ) समुद्रात पृथ्वीवरचे 2/3 पाणी आहे परंतु हे पाणी माणसाला उपयुक्त नाही.
   ब) ताजे पाणी (मीठ नसलेले) केवळ 2.7 टक्के आहे.
   क) केवळ 1 टक्के ताजे पाणी मानवास उपयुक्त आहे.
   ड) सुमारे 70 टक्के ताजे पाणी हिमनद्या व बर्फाच्या स्वरुपात अंटार्टिका, ग्रीनलँड व पर्वतरांगात आहे. त्याच्या ठिकाणामुळे ते
         दुरापास्त आहे.
   1) ब आणि क    2) क आणि ड    3) ब आणि ड    4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 4

4) कोरडवाहू शेतीमध्ये पीक उत्पादन वाढीसाठी खतांची कार्यक्षमता यामुळे वाढविता येईल :
   अ) माती परीक्षण व मातीची प्रतिक्रिया नुसार खतांचा वापर.
   ब) जमिनीमध्ये बियाण्याच्या 5 से.मी. बाजूला किंवा खाली खत देणे.
   क) पेरणीच्यावेळी स्फुरद आणि पालाश खत वापरणे आणि नत्र खतांचा दोन हप्त्यात विभागून वापर करणे.
   1) अ, ब    2) ब, क      3) अ, क      4) अ, ब, क
उत्तर :- 4

5) तुषार सिंचनाच्या समानता गुणांकावर खालील घटक परिणाम करतात  ?
   अ) तुषार तोटयामधील अंतर    ब) पीक भूमिती
   क) संच चालवण्याच्या कालावधी    ड) वा-याची स्थिती
   1) अ आणि ब    2) अ आणि क    3) अ आणि ड    4) क आणि ड
उत्तर :- 3

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...