Wednesday, 15 December 2021

भारताची राज्यघटना प्रश्नसंच 1/12/2019


१)  सध्या भारतीय संघराज्यात किती घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत ?

   1) 28 व 7    2) 26 व 9   
3) 27 व 8       4) 29 व 6

उत्तर :- 1

२)  17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या ‘भाषावार प्रांतरचना आयोगाचे’ अध्यक्ष कोण होते ?

   1) न्या. एस.के. दार
  2) एस.के. पाटील 
  3) ब्रिजलाल बियाणी 
  4) काकासाहेब गाडगीळ

   उत्तर :- 1

३)  कोणत्याही संघराज्य क्षेत्राचे क्षेत्र वाढविण्याबाबतचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येत जर त्यास  ?

   1) राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असली व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायासह

   2) राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असली व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय

   3) राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय परंतु संबंधित संघराज्य क्षेत्राच्या अभिप्रायासह

   4) राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय।

उत्तर :- 2

४)  घटक राज्यांची पुनर्रचना किंवा त्यांच्या सीमा बदलण्याबाबतच्या खालील विधानांपैकी कोणते विधान चूक आहे ?

   1) संसदेला तो अधिकार दिला आहे.
   2) संसद साध्याबहुमताने तसा कायदा करू शकते.

   3) विधेयकाची शिफारस करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी संबंधित विधीमंडळांची मते ‘आजमावली’ आहेत.

   4) सीमा बदलण्यासाठी संबंधित घटकराज्यांची संमती आवश्यक आहे.
उत्तर :- 4

५)  आंध्रप्रदेशाच्या राज्य पुनर्रचना विधेयक 2013 व्दारे तेलंगणा राज्याची स्थापना प्रस्तावित आहे. ज्यामध्ये खालीलप्रमाणे रचना

     असेल –
 
I        II

        अ) लोकसभा मतदार संघ    i) 07

        ब) जिल्हे        ii) 22

       क) राज्यसभा मतदारसंघ    iii) 17

       ड) विधान परिषदेतील जागा    iv) 40
          v) 10

  अ  ब  क  ड

         1)  i  v  ii  iii 
         2)  iii  ii  i  iv
         3)  iii  v  i  iv
         4)  iv  iii  i  iii

उत्तर :- 3

६) कलम 3 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अप्रस्तुत ठरते ?

   अ) कलम 3 नुसार संसद एक राज्यातून भूप्रदेश अलग करून नवे राज्य निर्माण करू शकते.

   ब) संसद राज्यांच्या सीमा व नाव बदलू शकते.

   क) नवीन राज्य निर्माण करण्याबाबतचे विधेयक केवळ राष्ट्रपतींच्या पूर्वशिफारशीनेच संसदेत सादर करता येते.

   ड) अशा प्रकारच्या विधेयकासंदर्भात राज्य विधीमंडळाचा सल्ला स्वीकारणे बंधनकारक आहे.

        वरीलपैकी कोणता / ते पर्याय चूकीचा / चे आहे / आहेत ?

   1) अ      2) ब      3) क      4) ड

उत्तर :- 4

७) भारतात राज्य निर्मितीच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनेत अंतर्भुत नाहीत ?

   अ) दोन किंवा अधिक राज्ये एकत्रित करून नव्या राज्याची निर्मिती करता येते.

   ब) कोणत्याही राज्याचे नाव अथवा सीमा बदलण्याकरीता संबंधीत राज्य विधी मंडळाची स्पष्ट सहमती आवश्यक असते.

   क) कोणतेही राज्य, केंद्रशासित प्रदेश म्हणून रुपांतरीत करता येईल.

   ड) संबंधीत राज्य शासनाचे मत मागवून केंद्र शासन, नवीन राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करू शकते.

   1) क, ड    2) ब, क, ड   
3) अ, ड       4) ब, ड

उत्तर :- 2

८) ‘नागपूर करार’ बाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?

   1) विधिमंडळाचे किमान एक अधिवेशन नागपूर येथे घ्यावे.

   2) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर येथे असावे.

   3) सरकारी नोक-यात लोकसंख्येच्या प्रमाणात भरती करावी.

   4) मराठवाडयातील काँग्रेस नेत्यांचा ‘नागपूर करारास’ विरोध होता.

उत्तर :- 4

९) राज्यांची पुनर्रचना किंवा संघ – राज्य संबंधाबाबत कोणती समिती आणि आयोग संबंधित आहे  ?

   अ) जे.व्हि.पी. समिती      ब) दार आयोग   

   क) राज गोपालाचारी समिती    ड) सरकारिया आयोग

   1) फक्त अ, ब, क    2) फक्त अ, ब, ड      3) फक्त अ, क, ड    4) फक्त ब, क, ड

उत्तर :- 2

१०) व्दैभाषिक मुंबई राज्याची निर्मिती .............. या दिवशी झाली.

   1) 1 मे 1960    
   2) 1 नोव्हेंबर 1956
    3) 1 मे 1966   
    4) 1 जून 1975

उत्तर :- 2

११) संघराज्यात नवीन प्रदेशाच्या प्रवेशाबाबत कोणत्या घटनादुरुस्त्या संबंधित आहेत ?

   अ) 10 वी घटनादुरुस्ती   
   ब) 12 वी घटनादुरुस्ती   
   क) 14 वी घटनादुरुस्ती   
   ड) 16 वी घटनादुरुस्ती

   1) फक्त अ, ब, क
   2) फक्त अ, क, ड  
  3) फक्त अ, ब, ड  
  4) फक्त ब, क, ड

उत्तर :- 1

१२)  2000 साली भारतीय संघराज्यात उत्तराखंड, छत्तीसगढ व झारखंड या तीन नवीन राज्यांची जवळपास एकाचवेळी निर्मिती  झाली. परंतु या तीन राज्यांचे निर्मिती अधिनियम जेव्हा वास्तव्यात आले तेव्हा त्यांचा कालानुक्रम काय होता ?

   1) उत्तराखंड, छत्तीसगढ, झारखंड   

      2) झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगढ

   3) छत्तीसगढ, उत्तराखंड, झारखंड    

4) उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगढ

उत्तर :- 3

१३)  राज्य पुनर्रचना अधिनियम, 1956 नुसार संपूर्ण देशाचे विभाजन खालीलप्रमाणे झाले होते –

   1) 22 राज्ये आणि 9 केंद्रशासित प्रदेश

   2) 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश

   3) 17 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेश

    4) 4 प्रकारची राज्ये

उत्तर :- 2

१४) नवीन राज्याच्या स्थापनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

   1) संविधानाने संसदेला राज्यांच्या प्रदेशाची फेररचना त्यांच्या अनुमती किंवा सहमतीविना करण्याचा अधिकार दिला आहे.

   2) या संबंधीचे विधेयक संसदेत राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही.

   3) प्रभावित राज्य किंवा राज्ये मतप्रदर्शन करू शकतील परंतु संसदेच्या ईच्छाशक्तीला विरोध करू शकत नाही.

   4) संसदेमध्ये असा ठराव केवळ विशेष बहुमताने मंजूर होऊ शकतो.

उत्तर :- 4

१५) ‘क्ष’ या ब्रिटीश महिलेस खालीलपैकी कोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व मिळेल ?

   1) ती पुणे विद्यापीठात प्राध्यापिका आहे   

2) तिने भारतीय पुरषाशी विवाह केला आहे

   3) ती भारतात ब्रिटीश शिष्टमंडळास आली आहे

4) ती ब्रिटीश वकिलातीत नोकरी करीत आले

उत्तर :- 2

१६) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?

   1) बेरुबरी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला होता.

   2) केशवानंद भारतीय खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला होता.

   3) सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटनादुरुस्तीव्दारे दोन वेळा बदल करण्यात आलेले आहेत.

   4) वरील एकही नाही.

उत्तर :- 4

१७) पुढील राज्यांचा निर्मितीनुसार क्रम लावा ?

      1) झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगढ
      2) उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगढ
      3) छत्तीसगढ, झारखंड, उत्तराखंड                 4) छत्तीसगढ, उत्तराखंड, झारखंड

उत्तर  :- 4

१८) खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते ?

   1) महाराष्ट्र    2) आंध्रप्रदेश 
  3) गुजरात     4) राजस्थान

   उत्तर :- 2

१९) भारतातील भाषावार प्रांतरचनेच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या भागाचा अधिक पुढाकार होता ?

   1) मराठवाडा
   2) महाराष्ट्र  
   3) आंध्रप्रदेश 
  4) कर्नाटक

   उत्तर :- 3

२०) खालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यात सामील झाला ?

   1) मराठवाडा 
   2) कोकण   
   3) विदर्भ    
   4) पश्चिम महाराष्ट्र

   उत्तर :- 3

No comments:

Post a Comment