1) ‘देवघर’ या शब्दाचे लिंग कोणते?
1) स्त्रीलिंग 2) पुल्लींग
3) नपुंसकलिंग 4) यापैकी नाही
उत्तर :- 3
2) सर्वनामाची खालीलपैकी कोणती विभक्ती होत नाही.
1) पंचमी 2) संबोधन
3) सप्तमी 4) षष्ठी
उत्तर :- 2
3) अबब ! केवढा हा उंचच उंच कडा. – वाक्याचा प्रकार सांगा.
1) विधानार्थी 2) प्रश्नार्थी
3) उद्गारवाची 4) होकारार्थी
उत्तर :- 3
4) “हवा कोंदट असल्यास मनुष्याची प्रकृती बिघडते.”
वरील वाक्यातील विधेय विस्तारक कोणते ?
1) हवा कोंदट असल्यास 2) मनुष्याची
3) प्रकृती 4) बिघडते
उत्तर :- 1
5) पुढील पर्यायातू ‘भावे प्रयोग’ ओळखा.
1) रामाने रावणास मारला 2) रामाकडून रावण मारला गेला
3) राम रावणास मारील 4) रामाने रावणास मारले
उत्तर :- 4
6) पुढीलपैकी कोणता सामासिक शब्द समाहार व्दंव्द समासात आढळत नाही?
1) केरकचरा 2) नीलकंठ
3) घरदार 4) मीठभाकर
उत्तर :- 2
7) दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल ?
1) संयोग चिन्ह 2) अपूर्ण विराम
3) स्वल्पविराम 4) यापैकी नाही
उत्तर :- 1
8) पुढीलपैकी कोणता शब्द ‘साधित’ शब्द नाही ?
1) भांडखोर 2) बेजबाबदार
3) थोरवी 4) इमारत
उत्तर :- 4
9) ‘बांगडी फुटणे’ या शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखा.
अ) पराभूत होणे ब) काळोख होणे
क) वैधव्य येणे ड) भांडण होणे
1) अ फक्त बरोबर बाकी सर्व चूक 2) ब फक्त बरोबर बाकी सर्व चूक
3) क फक्त बरोबर बाकी सर्व चूक 4) ड फक्त बरोबर बाकी सर्व चूक
उत्तर :- 3
10) ‘तटिनी’ कुणाला म्हणतात ?
1) ताटातुटीला 2) नदीला
3) अटीतटी करणा-याला 4) तरटांनी बांधलेल्या झोपडीला
उत्तर :- 2
No comments:
Post a Comment