Monday, 9 December 2019

तुम्हाला हे माहितीच हवे - भारतातील सर्वात मोठे 10 चर्चित घोटाळे

⭐️ देशाच्या स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंत देशात अनेक मोठे घोटाळे झाले आहे. परंतु आज आम्ही आपणास अशा घोटाळ्यांची माहिती देत आहोत ज्याची जगभरात चर्चा झाली.

1⃣ जीप घोटाळा : हा देशातील सगळ्यात पहिला घोटाळा होता. भारताला स्वांतत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने लंडनमधील एका कंपनीसोबत 2000 जीपचा करार केला होता. हा करार 80 लाखांचा होता. मात्र 155 जीपच मिळू शकल्या. या घोटाळ्यात भारतीय उच्चायुक्त व्ही.के.मेनन यांचा हात असल्याचे वृत्त समोर आले होते.

2⃣ कोळसा घोटाळा : या घोटाळ्यात कोळशाचे चुकीच्या पद्धतीने वाटप झाले. कोणतीही सनदी प्रक्रिया न करता कोळशाच्या ब्लॉकचा लिलाव करण्यात आला, ज्यामुळे 1.86 लाख कोटींचे नुकसान झाले. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात हा घोटाळा झाला.

3⃣ तेलगी स्टॅम्प घोटाळा : बनावट मुद्रांक शुल्क घोटाळ्यात अब्दुल करीम तेलगीने देशाला जवळपास 20 हजार कोटींचा चुना लावला होता. अब्दुल करीम तेलगीने बनावट स्टॅम्प पेपर छापले होते. या बनावट स्टॅम्प पेपरची बँका आणि अनेक संस्थांना त्याने विक्री केली होती.

4⃣ बोफोर्स तोफ घोटाळा : 1987 मध्ये स्वीडनची एक कंपनी बोफोर्स एबी कडून लाच घेतल्याप्रकरणी राजीव गांधीसकट अनेक मोठे नेते अडकले होते. प्रकरण असे होते की भारतीय 155 मिमी च्या फिल्ड हॉवीत्जरच्या बोलीवर या नेत्यांनी जवळपास 64 कोटींचा घपला केला होता.

5⃣ 2जी स्पेक्ट्रम घोटाळा : 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा भारतातील सर्वात मोठा घोटाळा आहे. हा एकूण 1.76 लाख करोड रुपयांचा घोटाळा झाला. माजी दूरसंचार मंत्री ए राजा आणि कनिमोळी यांना या घोटाळ्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

6⃣ कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा : कॉमनवेल्थ घोटाळ्यामध्ये जवळपास 70 हजार कोटींचा घोटाळा उघड आला होता. घोटाळ्याचे सूत्रधार होते आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि त्यांचे सहकारी.या घोटाळ्यात यंत्रसामग्री निश्चित किमतीपेक्षा दुपटीने खरेदी करण्यात आली होती.

7⃣ सत्यम घोटाळा : सत्यम घोटाळा कॉर्पोरेट जगतातील आतापर्यंतचा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. आयटी कंपनी 'सत्यम कंम्प्यूटर सर्विस'ने रियल इस्टेट आणि शेअर मार्केटच्या माध्यमातून जवळपास 14 हजार कोटींची आफरातफरी केली होती.

8⃣ चारा घोटाळा : 1996 मध्ये चारा घोटाळ्यात 900 कोटींचे नुकसान झाले, जी त्या काळची सर्वात मोठी रक्कम होती. या घोटाळ्यात बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव मुख्य आरोपी आहेत.

9⃣ हवाला स्कँडल : हवाला स्कँडल 1996 मध्ये जनतेसमोर आले. यात ज्यांची नावे समोर आली ते सरकार चालवत होते. अनेक नेत्यांवर आरोप लागले की, ते हवालाच्या दलालांकडून लाच घेत होते. या घोटाळ्यात भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी यांचे नाव समोर आले होते.

🔟 स्टॉक मार्केट घोटाळा : स्टॉक ब्रोकर केतन पारेखने स्टॉक मार्केटमध्ये 1,15,000 कोटींचा घोटाळा केला होता. डिसेंबर, 2002 मध्ये त्याला अटक करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment