1) पुढे दिलेल्या पर्यायातून नामसाधित विशेषण ओळखा.
1) रांगणारे मूल 2) पिकलेला आंबा 3) पेणचे गणपती 4) वरचा मजला
उत्तर :- 3
2) पुढीलपैकी ‘ला’ आख्यात ओळखा.
1) बसला 2) बसू 3) बसतो 4) बसावा
उत्तर :- 1
3) ‘तुला जसे वाटेल तसे वाग’ – या वाक्यातील अधोरेखित वाक्य रीतीदर्शक ................. आहे.
1) क्रियाविशेषण वाक्य 2) विशेषण वाक्य
3) प्रधानवाक्य 4) नामवाक्य
उत्तर :- 1
4) पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) शब्दयोगी अव्यये नामांना जोडू नयेत नाही.
ब) शब्दयोगी अव्यये विकारी शब्द आहेत.
1) अ बरोबर 2) ब बरोबर 3) अ आणि ब बरोबर 4) अ आणि ब चूक
उत्तर :- 4
5) गुरुजी म्हणाले, की ‘प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे’ या वाक्यातील गौणवाक्य कोणते ?
1) गुरुजी म्हणाले 2) प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे
3) प्रत्येकाने नियमितपणे 4) नियमितपणे शाळेत यावे
उत्तर :- 2
6) अयोग्य जोडी निवडा.
अ) विरोधीदर्शक - उंहू
ब) शोकदर्शक - अगाई
क) मौनदर्शक - गुपचित
1) अ 2) ब 3) क 4) यापैकी नाही
उत्तर :- 4
7) ‘मी पुस्तक वाचत असे’ या वाक्यातील काळ ओळखा.
1) रीती भूतकाळ 2) रीती वर्तमानकाळ 3) पूर्ण वर्तमानकाळ 4) साधा वर्तमानकाळ
उत्तर :- 1
8) ‘कवी’ या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप लिहा.
1) कविता 2) कवयित्री 3) कवित्री 4) कवियित्री
उत्तर :- 2
9) पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे वचन हे एकवचनासारखेच राहते.
अ) कागद ब) आज्ञा क) उंदीर ड) विद्या
1) ब, क, ड 2) अ, ब, क, ड 3) अ, क, ड 4) अ, ब, ड
उत्तर :- 2
10) ‘मुलांना’ या शब्दाचे सामान्यरूप काय होईल ?
1) मुला 2) मुलां 3) मुलींना 4) मुलाला
उत्तर :- 2
No comments:
Post a Comment