1) खालीलपैकी किती संमतिदर्शक अव्यये आहे.
हां, जी, जीहां, ठीक, बराय, हाँ, अच्छा
1) सर्व 2) सहा 3) पाच 4) चार
उत्तर :- 1
2) ‘मी निबंध लिहीत असे’ या वाक्यातील काळ ओळखा.
1) अपूर्ण भूतकाळ 2) रीती वर्तमानकाळ
3) रीती भूतकाळ 4) रीती भविष्यकाळ
उत्तर :- 3
3) “हंस” या शब्दाचा विरुध्दलिंगी शब्द शोधा.
1) हंसी 2) हंसा 3) हंसीण 4) हंसीका
उत्तर :- 1
4) रामाहून गोविंदा मोठा आहे.
अधोरेखित शब्दातील विभक्ती प्रत्ययाचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे ?
1) कर्ता 2) संप्रदान 3) अपादान 4) करण
उत्तर :- 3
5) वाक्यप्रकार ओळखा.
आई वडिलांचा मान राखावा.
1) आज्ञार्थी 2) विध्यर्थी
3) संकेतार्थी 4) वरीलपैकी कोणतेही नाही
उत्तर :- 2
6) ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ या वाक्यात विधेय कोणते आहे?
1) गावा 2) आमुच्या
3) आम्ही 4) जातो
उत्तर :- 4
7) ‘तुम्ही कामे केलीत’, हे वाक्य कोणत्या प्रयोग प्रकारातील आहे ?
1) कर्तृ – कर्मसंकर 2) कर्मकर्तरी
3) कर्तृ – भावसंकर 4) कर्मृ – भावसंकर
उत्तर :- 1
8) खालील शब्दाचा समास ओळखा. – ‘सादर’
1) विभक्ती – तत्पुरुषस 2) सहबहुव्रीही
3) व्दंव्द 4) नत्र बहुव्रीही
उत्तर :- 2
9) वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास खालीलपैकी कोणत्या विरामचिन्हाचा वापर कराल.
1) पूर्णविराम 2) अर्धविराम
3) स्वल्पविराम 4) अपूर्णविराम
उत्तर :- 4
10) पुढील शब्दातील तद्भव शब्द ओळखा.
1) जल 2) गाव
3) एजंट 4) मंजूर
उत्तर :- 2
No comments:
Post a Comment