1) ‘हळद लागणे’ या वाक्प्रचाराचा पुढीलपैकी कोणत्या घटनेशी संबंध आहे?
1) विवाह 2) बाळाचा जन्म 3) वैधव्य 4) गृहप्रवेश
उत्तर :- 1
2) पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. – ‘दुस-यावर उपकार करणारा.’
1) परावलंबी 2) पुरोगामी 3) पराधीन 4) परोपकारी
उत्तर :- 4
3) व्याकरणाच्या नियमानुसार बरोबर शब्द कोणता ते लिहा.
1) आकुंचन 2) आंकुचन 3) आकूंचन 4) अकुंचन
उत्तर :- 1
4) ‘श’, ‘ष’, ‘स’, ही .................. व्यंजने आहेत.
1) अर्धश्वर 2) कठोर 3) घर्षक 4) मृदू
उत्तर :- 3
5) ‘यशोधन’ या शब्दाचा संधी प्रकार ओळखा.
1) स्वरसंधी 2) व्यंजनसंधी 3) विसर्गसंधी 4) पूर्वरूपकसंधी
उत्तर :- 3
6) ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन, विभक्ती यानुसार कोणताही बदल घडून येत नाही, अशा शब्दांना ............. म्हणतात.
1) अविकारी 2) विकारी 3) पद 4) यापैकी नाही
उत्तर :- 1
7) खालील शब्दांपैकी ‘भाववाचक नाम’ ओळखा.
1) माधुर्य 2) फुले 3) हसवणारा 4) सुंदर,
उत्तर :- 1
8) ‘आपण’ या सर्वनामाचा अर्थ जेव्हा ‘स्वत:’ असा होतो, तेव्हा ते ................. सर्वनाम असते.
1) पुरुषवाचक 2) दर्शक 3) आत्मवाचक 4) प्रश्नार्थक
उत्तर :- 3
9) ‘रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती’ या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत पुढील कोणते विधान बरोबर आहे.
1) हे गणनावाचक संख्याविशेषण आहे 2) हे क्रमवाचक संख्याविशेषण आहे
3) हे पृथकत्ववाचक संख्याविशेषण आहे 4) हे अनिश्चितवाचक संख्याविशेषण आहे
उत्तर :- 4
10) खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही.
1) पेरणे 2) उपरणे 3) वेचणे 4) उपणणे
उत्तर :- 2
No comments:
Post a Comment